मी मराठी

Mi Marathi Kavita

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म,पंत,जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।
आमुच्या मनामनात दंगते मराठी ।
आमुच्या रगारगात रंगते मराठी ।
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी ।
आमुच्या नसानसात नाचते मराठी ।
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी ।
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी ।
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी ।
आमुच्या घराघरात वाढते मराठी ।
येथल्या फुलाफूलात हासते मराठी ।
येथल्या दिशादिशात दाटते मराठी ।
येथल्या नगानगात गर्जते मराठी ।
येथल्या दरीदरीत हिँडते मराठी ।
येथल्या वनावनात गुंजते मराठी ।
येथल्या तरूलखात सादते मराठी ।
येथल्या कळीकळीत लाजते मराठी ।
येथल्या नभानमधुन वर्षते मराठी ।
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी ।
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी ।
येथल्या चराचरात राहते मराठी ।
पाहुने जरी असंख्य पोसते मराठी ।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी ।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।

admin

Leave a Reply

Next Post

स्वाभिमान विकू नकोस

Thu May 16 , 2019
Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू दे. धावताना कधी कधी ठेच हि लागणारच. रस्ताही कधी कधी शत्रू होऊन वागणारच. तू मात्र स्वतः कधी अपमानित होऊ नकोस. स्वाभिमान कुणालाही कधीच विकू नकोस. बगळ्याची नजर तुझी वादळापासून सावध रहा. मंजिल दूर असली तरी […]
WhatsApp chat
%d bloggers like this: