Mi pahileli jatra marathi nibandh

me/mi pahileli jatra nibandh, aamchya gavachi jatra essay in Marathi

मी पाहिलेली जत्रा

दरवर्षी दिवाळीत आम्ही मामाकडे जातो. यंदा चैत्री पौर्णिमेला गावात जत्रा होती. जत्रेच्या आदल्या दिवशीच आम्ही गावात जाऊन पोहोचलो.
देवीची पूजा करण्यासाठी भल्या पहाटे आम्ही घरातले सर्वजण देवळाकडे निघालो.

आईने व मामीने मिळून प्रसाद करून घेतला होता. भल्या पहाटे चौघडा वाजू लागला व पूजेला सुरुवात झाली. तासभर पूजा चालली. गावकऱ्यांनी देवीचे देऊळ देवळाबाहेरची दीपमाळ, देवळाचे आवार रंगुन छान सुशोभित केले होते.
देवळाबाहेर भरपूर दुकाने होती. दुकानांतून पूजेचे सामान होते. मुलांसाठी भरपूर खेळणी होती, घरगुती सामान होते. काही दुकाने स्त्रियांना लागणाऱ्या गोष्टींनी भरलेली होती. झटपट फोटो काडून देणारा स्टुडिओही होता.

मिठाईची व खाद्य वस्तूंचीही दुकाने होती.
जत्रेत मजा करण्यासाठी मामाने आम्हाला पैसे दिले होते. आम्ही गरम जिलबी व भजी यांचा आस्वाद घेतला.

थोड्या अंतरावर वरखाली जागारे पाळणे व
‘मेरी गो राऊंड’ असे खेळवालेही होते. आम्ही एका पाळण्यात बसलो. झटपट फोटो काढणाऱ्या स्टुडिओत जाऊन गाडी चालवताना स्वतःचे फोटोही काढले.

जत्रेतील गर्दी वाढत होती. आसपासच्या खेडेगावातील बरीच मंडळी आली होती. ते शेतीविषयक वस्तूंची खरेदी करत होते. दूर अंतरावर गुरांचाही बाजार भरलाहोता. चक्कर मारून आम्ही देवाकडे परतलो, कारण भोजन व्हायचे होते. राजी
देवळावर रोषणाई केली जाणार होती. भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
शहरातील वातावरणापेक्षा एक वेगळेच निर्मळ वातावरण या जत्रा जगायला अनुभवायला मिळाले होते.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

One comment

  1. So nice

Leave a Reply