Amazon Big Sell

मीही एकदा पडलो होतो प्रेमात

Mihi ekda padlo hoto premat

मीही एकदा पडलो होतो प्रेमात

शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात कळत नाहीच ,
’काय बघितलं होत कुलकर्णीच्या हेमात ?’
कुल्कार्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोन ,
नाकावरती सोडावाटर आणि मागे दोन वेण्या !
वाऱ आल तर उडून जाईल अशी तिची काय ,
रूप पक्क काकूबाई ..पण अभ्यासावर माया !
ग्यादरिंग मध्ये एकदा गायाल होत तिने गान ,
तेव्हापासून तिच्या घरी वाढल येन जान !
नारळी पौर्णिमेला तीन मला नारळी भात वाढला होता ,
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता !
नको त्या वयात प्रेम करण्याची माझी मस्ती झिरून गेली,
शाळेमधली प्रेमकहाणी शालेमाढेच विरून गेली !
थोड्याच दिवसात वेगळ व्यायची वेळ आली होती ,
मित्राकडून कळल ,हेमाच्या वडिलांची बदली झाली होती !
फुलपाखरू दरम्यानच्या काळात बराच पाणी वाहून गेल ,
पुढे हेमाच काय झाल ? हे विचारायचं राहून गेल !
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली,
ओळखलंच नाहीच मी ,म्हटल्यावर खुद्कन गालात हसली !
आईशपथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय सोलिड बदल
झाला होता चवळीच्या शेंगाला जणू आंब्याचा मोहोर आला होता !
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती ,
मागे उभ्या नवर्याने हातात भाजीची पिशवी धरली होती !
सोडवाटर जाऊन आता कॉन्ताकट लेन्स आले होते ,
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते !
मंगळसूत्र भिरवत म्हणाली, ‘ हे आमचे हे ‘,
“बराच वेळ हात अवघडलाय जरा भाज्या घे “!
म्हणून ,आयुष्यात माणसाने चुकू नये प्रेमात ,
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात !!

Asha Transcription

About admin

Check Also

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू …

Leave a Reply

Your email address will not be published.