इतिहास प्रश्नोत्तरे 3

Mpsc History Marathi Question Bank

सायमन कमिशन भारतात कधी आले ?
१९२८

‘मॅक्सवेल-झूमफील्ड’ चौकशी समितीचे संबंध
कोणत्या आंदोलनाशी आहेत ?
बारडोली आंदोलन

आचार्य नरेंद्र देव यांनी कोणत्या पार्टीची स्थापना
केली ?
काँग्रेस सोशेलिस्ट पार्टी

‘साबरमती आश्रम’ची स्थापना महात्मा गांधींनी कुठे
केली होती?
अहमदाबाद

विनायक दामोदर सावरकर कोणत्या क्रांतिकारी
संघटनेशी संबंधित होते ?
अभिनव भारत

‘पोवेर्टी अॅण्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया’ हे पुस्तक
कोणी लिहिले होते ?
दादाभाई नौरोजी

‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ची स्थापना कुठे झाली?
लंडन

भारताच्या स्वातंत्र्यतेची घोषणा कधी करण्यात आली?
२० फेब्रुवारी, १९४७

भारतीय स्वातंत्रतेची घोषणा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने केली?
क्लेमेंट अॅटली

१९१६ चा लखनौ पॅक्ट कोणाकोणात झाला ?
काँग्रेस आणि मुस्लीम लीग

हंटर समितीची नियुक्ती कोणत्या घटनेच्या चौकशीसाठी केली जाते?
जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी

बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’ ही पदवी कोणत्या चळवळीच्यावेळी देण्यात आली होती ?

होमरूल चळवळ

भारतीय राष्ट्रीय आंदोलन जहालपंथियांच्या प्रभावाखाली कधीपासून आले होते ?
१९०६ नंतर

लंडनमध्ये जनरल ओ डायर यांना कोणत्या
क्रांतिकारकाने गोळी मारली होती ?
ऊधम सिंह

‘भारत सोडा आंदोलन सुरू केल्यानंतर महात्मा
गांधींना नजरकैद करून कुठे ठेवले गेले ?
आगा खान महाल (पुणे)

भारताची फाळणी टाळण्याची अंतिम शक्यता कधी
समाप्त झाली ?
कॅबिनेट मिशनला अस्वीकार केल्यानंतर

‘गुरु रामसिंह’ कोणत्या आंदोलनाच्या अग्रणी होते?
कुका आंदोलन

‘सिमलाचे संन्यासी’ या नावाने कोण प्रसिद्ध आहेत?
ए. ओ. ह्यूम

‘मुंबईचे त्रिमूर्ती’ या नावाने कोण ओळखले जातात?
फिरोजशाह मेहता, के. टी. तेलंग, दादाभाई नौरोजी

‘रिक्रूटिंग सार्जट’ कोणास म्हटले जाते ?
महात्मा गांधी

कोणत्या योजनेने सर्वप्रथम अल्पसंख्याकांच्या समस्या
सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्र मार्गामध्ये मोठा अडथळा आणला होता ?

ऑगस्ट प्रस्ताव

मुसलमानांनी असहयोग आंदोलनात भाग घेण्याचे मुख्य कारण कोणते ?
खिलाफत आंदोलनात मिळालेला सहयोग

जालियनवाला बाग हत्याकांड, (१९१९) च्या विरोधात
कोणत्या भारतीयाने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणी
परिषदेचा राजीनामा दिला ?
शंकरन नायर

कोणत्या राष्ट्रीय नेत्यांनी पाकिस्तानच्या प्रश्नावर
मुस्लीम लीगचे समर्थन करताना १९४२ मध्ये
काँग्रेसचा राजीनामा दिला ?
चक्रवर्ती राजगोपालाचारी

‘कामागाटामारू’ ही घटना कोणत्या वर्षी घडली?
१९१४

मुस्लीम लीगने आपल्या कोणत्या अधिवेशनात
‘डिव्हाईड अॅण्ड क्विट’ची घोषणा दिली ?
कराची अधिवेशन, १९४३

भारताच्या स्वाधीनतेच्यावेळी महात्मा गांधी काँग्रेसमध्ये होते की नाही ?
ते काँग्रेसचे सदस्य नव्हते

१८५७ च्या उठावाच्या कोणत्या नेत्याचे नाव धोंडूपंत
होते?

नानासाहेब पेशवे

बहादूरशाह दुसरा’ याला १८५७ च्या बंडादरम्यान
कोणी पकडले ?
हडसन

तेलंगणा प्रांतातील कोणत्या गावात विनोबाजींनी भूदान चळवळ सुरू केली?
पोचमपल्ली

विल्यम कर्झन वायली यांची हत्या कोणी केली?
मदनलाल धिंग्रा

आझाद हिंद सेनेच्या कोणकोणत्या नेत्यांवर दिल्लीच्या
लाल किल्ल्यावर खटला चालवला होता?

शाहनवाज खान, गुरुदयालसिंह ढिल्लॉन आणि प्रेम सहगल

१९०६ मध्ये कोलकाता अधिवेशनात कोणी ‘स्वराज’
हे काँग्रेसचे मुख्य उद्दिष्ट घोषित केले?
दादाभाई नौरोजी

सतत दोन वर्षांमध्ये काँग्रेस अधिवेशनाचे इंग्रज अध्यक्ष कोण होते ? त्यांचे नाव काय ?
१९८८ जॉर्ज यूल (अलाहाबाद अधिवेशन –
पहिले इंग्रज अध्यक्ष), १९८९ सर विल्यम्।
वेंडरबर्न (मुंबई अधिवेशन)

‘जर अस्पृश्यतेचा कलंक आपल्या माथ्यावर असेल
तोपर्यंत आपल्याला स्वराज्य मिळणार नाही’ हे वाक्य
कोणाचे आहे?
महात्मा गांधी

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात हिंदीला सर्वप्रथम
राष्ट्रभाषा म्हणून प्रस्तुत केले गेले ?
बेळगाव अधिवेशन, १९२४

गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाची तुलना नेपोलियनच्या अल्वा ते पॅरिस यात्रेशी कोणी केली?
सुभाषचंद्र बोस

कोणत्या विदेशी व्यक्तीला काँग्रेसचे दोनवेळा अध्यक्ष
बनण्याचा गौरव प्राप्त झाला होता ?

विल्यम वेडरबर्न

कोणत्या कारणासाठी इंग्रज सरकारने महात्मा गांधींना कैसर-ए-हिंद’ हा बहुमान दिला ?
पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला अभूतपूर्व मदत केल्यामुळे

गांधी-आयर्विन कराराला भारतीय इतिहासात
स्थान आहे. या कराराला दुस-या कोणत्या
नावाने ओळखले जाते?
दिल्ली करार

अॅटली मंत्रिमंडळाने १९४६ मध्ये ‘कॅबिनेट मिशन
ची नियुक्ती केली होती. या मिशनचे अध्यक्ष कोण होते
सर जॉन पॅथिक लारेन्स

‘मी ब्रिटिश साम्राज्याचे विघटन करण्यासाठी पंतप्रधान
पद स्वीकारलेले नाही’ असे कोण म्हणाले?
विन्स्टन चर्चिल

१९०८ मध्ये लोकमान्य टिळकांना किती वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली ?
सहा वर्षे

मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना टिळकांनी
कोणता ग्रंथ लिहिला ?
गीतारहस्य

भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना कोणी
म्हटले ?
सर व्हेलेंटिन चिरोल

ब्रिटिश भारतातील कोणत्या नेत्याला ‘भारतीय क्रांतीचे
जनक’ म्हणतात ?
बाळ गंगाधर टिळक

‘ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते ?
राजा राममोहन राय

१९०० साली भारताचा व्हाईसरॉय कोण होता?
लॉर्ड कर्झन

पहिले महायुद्ध कधी संपले ?
११ नोव्हेंबर, १९१८

बारडोली साराबंदीच्या चळवळीचे नेतृत्व कोणी
केले ?
वल्लभभाई पटेल

वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे पुढारी कोण होते?
पं. जवाहरलाल नेहरू

रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य होण्याचा मान
कोणास मिळाला?
दादाभाई नौरोजी

”राज्यसंस्थेचा खरा आधार लोकांच्या अंतःकरणाची
मिळवणी, त्यांच्या भावनांचे खतपाणी व त्यांच्या
निष्ठेची जोपासना” हा असतो हे विचार कोणी मांडले?
दादाभाई नौरोजी

राजाराम मोहन रॉय यांनी सतत १८ वर्षे सतीप्रथेविर
लढा दिल्याने तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड बेटिकने
सतीची चाल बंद करण्याचा कायदा केव्हा केला?
१८२९ मध्ये

Check Also

इतिहास प्रश्नोत्तरे 2

Mpsc History Question Bank वंगभग चळवळीच्या काळात स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री …

Leave a Reply