आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही

Mulich urlya nahit

रोज आरश्या समोर आपला
अमूल्य वेळ खर्च करावा
चोपडून पावडर तोंडाला नूसतीच
चेहरा आपला साजेसा करावा
.
डिओ मारून अंगावर भसाभस
हिरो गिरी करत घराबाहेर पडावं
दिसता सूंदर रूपवान मूली
तिला नजरेनंच नूसतं छेडावं
.
कधी तिकडून आला पोसिटीव रिप्ले
आपण स्वप्नांचा दूनियेत ऊडावं
दोन शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी तिच्या सोबत
रोज तिच्या नजरेआडं च आपण पडावं
.
गाठून रस्त्यात तिला एकटी
आपल्या मनातलं बोलून द्याव
मी ओलरेडी एन्गेज आहे ऐकून
सालं मनाच खच्चीकरणचं होऊन जावं
.
जिला पहाव विचारून तिला
ति कूठेना कूठे तरी “पटलेली” असते
“मी एन्गेज आहे” शब्द ऐकून
प्रेमाची पतंगच कटलेली असते
.
म्हणून बडबडतो स्वत:शी एक
कि प्रेमाच्या खेळात कधीच का मूरलो नाही
कारण आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही
आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही

Check Also

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू …

Leave a Reply