विद्यार्थ्याना फी माफी

विद्यार्थ्याना फी माफी

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000 पेक्षा अधिक नाही. अशा इ.11वी व 12 वी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्याना फी माफी (योजनेतर योजना) (2202 1474)
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • 1) आर्थिकदृष्टया मागास वर्गीय विद्यार्थ्याना शुल्क सवलत ही योजना सन 1959 पासून राज्यात राबविली जाते. त्यामध्ये शासन निर्णय समाज कल्याण विभाग क्र ईबीसी / 1763 दि 19/6/ 1964 अन्वये सुधारित नियम आमलांत आले.
  • 2)शासन निर्णय शिक्षण व सेवा योजना विभाग क्रएफईडी /1083/ 151672 / साशी 5 दि 24/8/83 अन्वये राज्यातील शासन मान्य अनुदानित माध्यमिक शाळेतील मुलीना इ 10वी पर्यतचे ( इ 5वी ते इ 10 वी ) शिक्षण मोफत करण्यात आले.
  • 3) शा.नि..ईबीसी1084/54576/(2630)/साशि-5 दि.1/10/1985 अन्वये विना अनुदानित शाळा व महाविद्यालयांना लागू करण्यात आला आहे.
  • 4)उपरोक्त योजनेचा लाभ इ 11वी व 12वी मधील विद्यार्थी घेतात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन शासनाने शासन निर्णय ई बी सी 1092/ 1221/ साशी 5 दि.30 मार्च 1993 अन्वये ई बी सी योजनेखाली फी सवलतीबाबतची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु 15000/- निश्चित केली होती. शासन निणर्य ईबीसी 2011/53/11/व्ही.व्ही-5 दि.30/5/2014 अन्वये उत्त्पन्न मर्यादा रु.1,00,000/- करण्यात आलेली आहे.
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश :
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मागास वर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणा पासुन वंचित राहु नये .म्हणून सदर योजना राबविण्यात येते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गा साठी
योजनेच्या प्रमुख अटी : ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000 पेक्षा अधिक नाही. 75 टक्के उपस्थिती व समाधानकारक प्रगती आवश्यक आहे .
आवश्यक कागदपत्रे :
  • जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते
  • 1)महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र,
  • 2) रु.1,00,000/- पर्यतचा उत्पन्नाचा दाखला प्रमाणीत केलेला.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : इ 11वी व 12वी मधील विद्यार्थ्याना (मुले)प्रवेश शुल्क, सत्र शुल्क व शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने केली जाते.
अर्ज करण्याची पद्धत : शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत सवलतीबाबत अर्ज शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना सादर करणे आवश्यक आहे.( शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याचेकडून आवश्यक असण्याऱ्या तरतूदीची मागणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याच्याकडे करणे.,शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) याचे मागणीनुसार आवश्यक तरतूद संगणक प्रणलीवर शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक याचे मार्फत वितरित करण्यात येते.)
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिने
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply