nisarg mazha mitra

निसर्ग-खरा मित्र

निसर्ग-खरा मित्र

[ मूददे : मित्र कोणास म्हणतात?- निसर्ग माणसाला काय काय देतो?- माणसाच्या आरोग्याची काळजी घेतो-निसर्ग हाच खरा मित्र.]

जो आपल्या हिताचा निरपेक्ष विचार करतो, तो माणसाचा खरा मित्र असतो. या दृष्टीने
विचार केला, तर निसर्गच माणसाचा खरा मित्र आहे.
‘आपले सारे जीवनच निसर्गावर अवलंबून आहे. झाडे माणसाला सावली देतात, फळे
देतात, निवान्यासाठी लाकूड देतात, वस्त्रांसाठी कापूस देतात. नदी माणसाची तहान भागवते.
वारा माणसाला श्वास देतो. सूर्य उष्णता व प्रकाश देतो. सागर माणसाला मीठ आणि मासे
देतो. ही धरणी आपल्याला जगण्यासाठी अन्न देते. माणसाच्या सुखमय जीवनाला
निसर्गाचा सर्वतोपरी हातभार लागला आहे.
निसर्गाने माणसाच्या आरोग्याचीही सदैव काळजी घेतली आहे. विविध औषधी
पना वनस्पती निसर्गातून मिळतात. नद्या, सागरांच्या साहाय्याने माणूस जलप्रवास करू शकतो.
विविध असाध्य रोगांपासून माणसांची मुक्तता करण्यासाठी आज वैद्यकीय क्षेत्रात
वनस्पतींवर नाना प्रयोग केले जातात. अशा प्रकारे निसर्ग हा माणसाचा खरा मित्र आहे.

Leave a Reply