पंडित जवाहरलाल नेहरू माहिती मराठी pandit jawaharlal nehru information in marathi

Pandit nehru information in marathi: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच चाचा नेहरू म्हणूनही संबोधले जाते. त्यांचा वाढदिवस 14 नोव्हेंबरला ‘बालदिन’ म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जाते. चाचा नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असत.

महात्मा गांधी त्यांना आपले शिष्य मानत असत. आजच्या या लेखात आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची मराठी माहिती (pandit jawaharlal nehru information in marathi) प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करुया…

Pandit jawaharlal nehru information marathi

बालपण व प्रारंभिक जीवन

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 ला अलाहाबाद शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू आईचे नाव स्वरूपाराणी होते. मोतीलाल नेहरू हे अलाहाबादमधील एक प्रसिद्ध वकील होते.

जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. या शिवाय त्यांना दोन बहिणी होत्या. मोठ्या बहिणीचे नाव विजया लक्ष्मी होते, पुढे जाऊन विजया या संयुक्त संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. याशिवाय नेहरू यांच्या लहान बहिणीचे नाव कृष्णा हाठीसिंह होते, व त्या एक प्रसिद्ध लेखिका होत्या

जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण

नेहरू यांचे सुरुवाती शिक्षण घरीच झाले. परंतु नंतर त्यांनी जगातील सर्वोच्च विद्यालयामध्ये शिक्षण प्राप्त केले. 15 वर्षाच्या वयात पंडित नेहरू यांनी इंग्लंड च्या हैरो स्कूल मध्ये आपले शिक्षण केले.

यानंतर त्यांनी केंब्रिज मधील ट्रिनिटी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला व तेथून त्यांनी कायद्याचे शिक्षण करून डिग्री मिळवली. 7 वर्षे लंडन मध्ये राहून त्यांनी फेबियन समाज आणि आयरिश राष्ट्रवादाची माहिती प्राप्त केली.

Nehru marathi mahiti

पंडित जवाहरलाल नेहरु यांचे करीयर

1912 साली पंडित नेहरू भारतात परत आले. व त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. 1917 मध्ये ते होमरूल लीग शी जुळले. याच्या दोन वर्षानंतर त्यांनी राजनीतीत प्रवेश केला.

1916 साली पंडित नेहरू यांचा विवाह कमला कौर यांच्याशी करण्यात आला. कमला कौर या देखील नेहरू प्रमाणेच काश्मीर पंडित कुटुंबाच्या होत्या. पुढे पंडित नेहरू व कमला नेहरू यांना एक मुलगी झाली ज्यांचे नाव इंदिरा नेहरू होते व आपल्या लग्नानंतर त्यांनी आपले नाव बदलून इंदिरा गांधी केले. इंदिरा गांधी यांची मराठी माहिती वाचा येथे.

1919 साली पहिल्यांदा त्यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली. त्या वेळी महात्मा गांधी यांनी रौलट कायद्याविरोधात आंदोलन सुरू केले होते. नेहरू गांधीजींच्या सक्रिय परंतु शांतीपूर्ण असहकार आंदोलनाने प्रभावित झाले. गांधीजींनाही, देशाविषयी प्रेम असणाऱ्या युवा नेहरू मध्ये भारताचे भविष्य दिसले.

पंडित नेहरू यांनी विदेशी वस्त्रांचा त्याग करून खादी ला वापरले. 1920-1922 मध्ये ते पूर्णपणे राजनीती मध्ये आले. असहकार आंदोलनादरम्यान त्यांना अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती

पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष

जवाहरलाल नेहरू यांनी 1926-28 पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये महासचिव म्हणून कार्य केले. या दरम्यान पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस समितीने वार्षिक सत्राचे आयोजन केले. या सत्रात दोन गट पडले. पहिल्या गटात प्रमुख नेते पंडित नेहरू व सुभाष चंद्र बोस हे होते. त्यांनी देशात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. याशिवाय दुसऱ्या गटात मोतीलाल नेहरू व इतर नेत्यांनी ब्रिटिश शासनाच्या अधिपत्याखालीच शासनाची मागणी केली.

यानंतर गांधीजींनी मध्यस्ती करीत डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे काँग्रेस चे वार्षिक अधिवेशन भरवले. या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष निवडण्यात आले व सर्वांनी एका मताने पूर्ण स्वराज्याची मागणी केली. या सत्रा दरम्यान पूर्ण स्वराज्याची मागणी करीत एक प्रस्ताव पारित करण्यात आला.

या घटनेच्या एका वर्षानंतर 26 जानेवारी 1930 मध्ये पंडित नेहरू यांनी लाहोर मध्ये स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला. याच वर्षी गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरु केली या चळवळीचा परिणाम म्हणून इंग्रजांना भारतीयांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. यानंतर 1936, 1937 आणि 1946 मध्ये पंडित नेहरू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आणि राष्ट्रवादी आंदोलनात गांधीजी नंतर दुसरे महत्त्वाचे नेता बनून गेले. पंडित नेहरू सोबत महात्मा गांधी व इतर प्रमुख नेत्यांना 1942 च्या भारत छोडो आंदोलनात अटक करण्यात आली. 1947 मध्ये भारत पाकिस्तान विभाजनाच्या वेळी त्यांनी इंग्रजांशी झालेल्या चर्चेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची निवड

1947 मध्ये भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाच्या पंतप्रधान पदासाठी निवडणूक करण्यात आली. या निवडणुकीत सरदार वल्लभभाई पटेल व आचार्य कृपलानी यांनी बहुमत मिळाले. परंतु पंडित नेहरू व महात्मा गांधी हे फार चांगले मित्र होते, दोघांमध्ये कौटुंबिक संबंध ही चांगले होते. म्हणून गांधीजींच्या आग्रहावर पंडित जवाहरलाल नेहरु यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अनेक योजना लागू केल्या. विज्ञान व उद्योग क्षेत्रात प्रगती घडवून आणली. त्यांच्या नितींमुळेच देशात कृषी आणि उद्योग क्षेत्रात प्रगती झाली.

याशिवाय पंडित नेहरू काही कार्यांमध्ये विफल ही ठरले. जसे पाकिस्तान आणि चीन मध्ये भारताचे संबंध न सुधारणे. पाकिस्तान सोबत काश्मीर मुद्द्यावर करार. वर्ष 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले याचे पूर्वानुमान लावण्यात नेहरू असफल ठरले. या युद्धात भारताला खूप नुकसान झाले.

जवाहरलाल नेहरू यांनी जर वल्लभ भाई पटेल यांचे म्हणणे ऐकले असते तर आज कश्मीर चा मुद्दा राहिला नसता. परंतु चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण काश्मीर चा हा मुद्दा 2019 साली भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेख 370 समाप्त करून दूर केला.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू

1962 मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताचे खूप नुकसान झाले. याच्या दोन वर्षानंतर 27 मे 1964 मध्ये हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांची मृत्यू भारत देशासाठी मोठा आघात होती.

पंडित नेहरू यांना 1995 साली मरणोपरांत देशाच्या सर्वोच्च सन्मान भारत रत्नांने सन्मानित करण्यात आले.

Related Posts

One thought on “पंडित जवाहरलाल नेहरू माहिती मराठी pandit jawaharlal nehru information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *