बटाट्याची भाजी रेसिपी | Potato Rassa Bhaji Recipe in Marathi

Potato Rassa Bhaji Recipe in Marathi : मित्रांनो जवळपास प्रत्येक कुटुंबाची आणि कुटुंबातील प्रत्येकाची आवडती बटाट्याची रस्सा भाजी, महाराष्ट्रीयन कुटुंबात मोठ्या आवडीने बनवली व खाल्ली जाते. चिरलेले कांदे कापलेल्या बटाट्यात एकत्रित केले जातात आणि मसाला टाकून चविष्ट बटाटा रस्सा भाजी बनवली जाते.

आजच्या या लेखात आपण बटाटा रस्सा भाजी कशी करायची आणि बनवायचीबटाट्याची भाजी रेसिपी काय आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरू करूया.

Potato Rassa Bhaji Recipe in Marathi

बटाट्याची भाजी रेसिपी – Potato Rassa Bhaji Recipe in Marathi

सामुग्री

सर्वात अगोदर आपण बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री कुठली आहे याविषयी जाणून घेऊया. तर बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी पुढील प्रमाणे सामग्री आवश्यक आहे.

  • तेल 3 मोठे चमचे
  • 2 बारीक चिरलेले कांदे
  • एक चमचा आलं पेस्ट
  • एक बारीक चिरलेली मिरची
  • एक लहान चमचा धने पावडर
  • एक चमचा गरम मसाला
  • एक चमचा हळद पावडर
  • एक चमचा काश्मिरी मिरची पावडर
  • चवीनुसार मीठ
  • एक चमचा कसुरी मेथी
  • एक चिरलेला टमाटा
  • दोन मोठे चमचे दही
  • चार ते पाच बटाटे
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • कोशिंबीर
  • हिरवी मिरची

कृती

वर देण्यात आलेली सामुग्री जमावल्यानंतर आपण बटाट्याची भाजी बनवण्यास सुरुवात करू शकतात. रुचकर बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी ची महाराष्ट्रीयन कृती पुढीलप्रमाणे आहे.

  • यासाठी सर्वात आगोदर गॅसवर एक कढई ठेवा. कढाईत तीन मोठे चमचे तेल टाका.
  • तेलात दोन बारीक चिरलेले कांदे टाका.
  • चमच्याच्या साह्याने तेल आणि कांदे चांगल्या पद्धतीने मिश्रित करून घ्या. काही मिनिटात कांद्यांना लाल रंग येऊन जाईल.
  • यानंतर यात एक लहान चमचा आलं पेस्ट टाका.
  • यानंतर एक बारीक चिरलेली मिरची टाकावी व पुन्हा चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण एकत्रित करावे.
  • काही वेळ सर्व मिश्रण तेलात तळून घ्यावे
  • यानंतर एक चमचा धने पावडर कढईत टाकावी.
  • सोबतच एक चमचा गरम मसाला, एक चमचा हळद, एक चमचा काश्मिरी लाल मिरची, एक चमचा कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकावे.
  • आता पुन्हा एकदा सर्व मिश्रण चमच्याच्या साह्याने एकत्रित करून घ्यावे.
  • मिश्रण एकत्रित केल्यानंतर यात एक चिरलेला टमाटा टाकावा. आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करावे.
  • आता कढई वरच्या बाजूने झाकून द्यावी व 5 मिनिटांपर्यंत अन्न शिजु द्यावे.
  • पाच मिनिटांनंतर दोन मोठे चमचे दही टाकावे आणि चमच्याच्या साह्याने पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यावे.
  • आता यानंतर चार ते पाच उकडलेले बटाटे त्यावरील साल काढून कापून घ्यावे व त्यांना देखील कढईत टाकावे. कढईत असलेला सर्व मसाला बटाट्यांना लागेल अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने एकत्रित करावे.
  • आवश्यकतेनुसार एक कप पाणी टाकावे.
  • यानंतर बारीक कापलेली कोशिंबीर बटाट्यांवर गार्निशिंग करावी.
  • काही वेळ कढईत बटाटे शिजू द्यावेत. व जेव्हा भाजी तयार झालेली वाटू लागेल तेव्हा गॅस बंद करून भाजी ताटात सर्व्ह करावी.
  • बटाट्याची ही भाजी आपण लाल मिरची आणि कोशिंबीर च्या साह्याने गार्निश करू शकतात. यानंतर आपली बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे.

FAQ

उरलेली बटाट्याची भाजी कशी ठेवावी (साठवायची)?

अनेकांचा हा प्रश्न असतो की जर बटाट्याची भाजी उरली तर काय करावे? उरलेली भाजी तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता. योग्यरित्या संग्रहित केलेली भाजी फ्रीजमध्ये 2-3 दिवस टिकून राहते. परंतु आपणास लवकरात लवकर ही भाजी संपवण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे. कारण अधिक काळ भाजी पडून राहिल्यास ती शिळी होते व अशी भाजी खाल्यास आरोग्य संबंधी समस्या वाढतात.

मी बटाटा रस्सा भाजी चा तिखटपणा कमी जास्त करू शकतो का?

होय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीची मसाला पातळी कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला सौम्य भाजी आवडत असेल तर लाल तिखटाचे प्रमाण कमी करा किंवा सौम्य प्रकार वापरा. याउलट, जर तुम्हाला भाजी तिखट आवडत असेल तर लाल तिखटाचे प्रमाण वाढवा किंवा काही हिरव्या मिरच्या घाला.

कांदा आणि लसूण शिवाय बटाट्याची भाजी बनवली जाऊ शकते का?

होय, जर तुम्ही कांदा-लसूण-नसलेल्या आहाराचे पालन करीत असाल, तरीही तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता. रेसिपीमधून फक्त कांदे आणि लसूण वगळा. वापरलेल्या मसाल्यांच्या मिश्रणामुळे भाजीच्या चवित फार फरक येणार नाही.

मी बटाट्याची भाजी कशी सर्व्ह करू?

बटाट्याची भाजी पारंपारिकपणे पुरी किंवा चपाती सोबत सर्व्ह केली जाते. याशिवाय तुम्ही ते भात किंवा जीरा तांदूळ (जिरे तांदूळ) सोबतही खाऊ शकता. सर्व्ह करण्यापूर्वी ताज्या कोथिंबीरीने सजवा.

तर मंडळी अशा पद्धतीने अतिशय कमी वेळात सहज सोप्या पद्धतीने आपण महाराष्ट्रीयन बटाटा रस्सा भाजी (Potato Rassa Bhaji Recipe in Marathi ) बनवू शकता. या भाजीत कापलेले टमाटे टाकल्यास भाजीला छान रंग येतो. याशिवाय आपण भाजी घट्ट करण्यासाठी व भाजीला अधिक स्वाद येण्यासाठी त्यात शेंगदाण्याचे पावडर देखील टाकू शकतात.

उपलब्ध असल्यास भाजी मध्ये ताजे हिरवे वाटाणे देखील टाकले जाऊ शकतात. काही जण उकडलेले बटाटे न वापरता साधे बटाटे देखील वापरतात परंतु उकडलेले बटाटे टाकल्यास भाजी लवकर तयार होते. आणि बटाटे देखील नरम राहतात.

आपणास ही बटाट्याची भाजी रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.