प्रदूषण-एक भयंकर संकट 

प्रदूषण-एक भयंकर संकट

pradushan marathi essay
प्रदूषण हे एवढे मोठे संकट आहे की, सारे विष्व आता याबाबतखडबडून जागे झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी ‘वसुंधरा दिन’ पळून ‘वसुंधरा बचाव’ हा संदेश सर्वाना दिला जातो.वसुंधरेमुळे आपण या जगात सुखासमाधानाने राहू शकतो, याचा विसर या वसुंधरापुत्रांना पडला आहे आणि ते आपल्याप्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढत आहेत. प्रदूषण हेमानवनिर्मित आहे; पण या मानवाला त्याची जाणीवच नाही.

माणूस आपल्या बुद्धीने नव्या नव्या गोष्टी सुरु करतो, पणत्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण आहे का, याचाविचार तो करत नाही. उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्यानेजंगल तोड केली त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. जमिनीची धूपवाढली.

माणसे आपल्या अचाट बुद्धिमत्तेने अनेक कारखाने सुरुकेले,अनेक प्रकारची वाहने शोधून काढली. त्यामुळे प्रदूषणवाढले. माणसाला अत्यंत आवश्यक असते ती शुद्ध हवा. दूषितहवेमुळे अनेक आजार वाढतात. माणसे, पशु, पक्षी मृत्युमुखीपडतात. कित्यक दुर्मिळ वनस्पती नष्ट होतात.

गिरण्या-कारखान्यांतील दूषित पाणी नद्यांमध्येसोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते. अशा प्रदूषित पाण्यामुळेगावेच्या गवे रोगग्रस्त होत आहेत. माणसाला आपले सर्वस्ववाहणाऱ्या नदीला प्रदूषित करताना माणसाला मात्र थोडीहीखंत वाटत नाही.

माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्गहाती आल्यासारखे वाटते. अनेक गोष्टींसाठी त्याने प्लास्टिकआवरणांचा उपयोग सुरु केला; पण त्यामुळे घनकचरा वाढूलागला. प्लास्टिक कुजत नसल्याने हा कचरा नष्ट होऊ शकतनाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. शेतीतील पिकांवर कीड पाडूनये,म्हणून औषधे फवारली जातात. अशा औषधांमुळेवातावरण प्रदूषित होतोच; पण अशा अन्नध्यांचा माणसाच्याप्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो.

हवा व पाणी यांच्या होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणेच आणखीएक प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनिप्रदूषण. आपल्याभोवती सततकर्कश आवाज होत असतात. कर्कश आवाजात लावलेली कर्णेआसमंताची शांतता नष्ट करतात. त्यामुळे मनाची शांतताही नष्टपावते. अशा वातावरणात लोक कार्यक्षमतेने कामे करू शकतनाहीत एवढेच न्हवे, तर त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. त्यांची आयुर्मर्यादा घटते.

या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य बिघडतआहे. एवढेच न्हवे, तर त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. माणसाला जिवंत राहायचे असेलतर, तर प्रदूषण नाहीसे करावे लागेल

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply