प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० – डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्हेंबर, इ.स. २००७ पर्यंत २५०० प्रयोग पार पडले होते.
त्यांनी कलासंगम या संस्थेची स्थापना केली.
प्रमुख चित्रपट
- मुद्रांक (इ.स. २००८)
- अदला बदली (इ.स. २००८)
- हि पोरगी कोणाची (इ.स. २००४)
- वाजवा रे वाजवा
- गोष्ट धमाल नाम्याची (इ.स. १९८४)
- नसती उठाठेव
- लेक चालली सासरला
- जावयाची जात
- आपली माणसं
- सतीची पुण्याई
- स्त्रीधन
- बिन कामाचा नवरा
- थोरली जाऊ
- जगा वेगळी प्रेम कहाणी (इ.स. १९८४)
- देवता (इ.स. १९८३)
- आयत्या बिळावर नागोबा (इ.स. १९७९)
- दुनिया करी सलाम (इ.स. १९७५)
- नवरा माझा ब्रम्हचारी (इ.स. १९७४)
- माहेरची माणसं
- चोराच्या मनात चांदणं
- श्री सिद्धेश्वर माझा पाठीराखा
- पैजेचा विडा
- कडकलक्ष्मी (इ.स. १९८०)
- दे धडक बेधडक