Prathmik arogya kendra

प्राथमिक आरोग्‍य केंद्रे

Prathmik arogya kendra

 

उपकेंद्राप्रमाणेच उपरोक्‍त कार्य व त्‍या व्‍यतिरिक्‍त प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमार्फत तातडीच्‍या वैद्यकिय सेवांची उपलब्‍धता, बाहयरुग्‍ण कक्ष, ६ खाटांचे आंतररुग्‍ण कक्ष, शस्‍त्रक्रिया सेवा, (कुटुंब कल्‍याण स्‍त्री शस्‍त्रक्रि) प्रयोगशाळा सेवा, विविध राष्‍ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्‍याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्रांकडून संदर्भित केलेल्‍या रुग्‍णांवर उपचार या आरोग्‍य सेवा दिल्‍या जातात. प्रत्‍येक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये १५ कर्मचारी कार्यरत असतात. यामधील स्‍वच्‍छता व वाहन सेवा कंत्राटी पध्‍दतीने देण्‍याबाबत शासनाचे निर्देश आहेत.

जिल्‍हा परिषदांना महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद आणि पंचायत समितीच्‍या अधिनियम १९६१ च्‍या कलम १८३ नुसार आस्‍थापना अनुदाने देण्‍यात येतात.

वरील अधिनियमातील कलम १८७ नुसार हस्‍तांतरीत विकास योजनांच्‍या अंमलबजावणीसाठी जिल्‍हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने देण्‍यात येतात. खाली नमूद करण्‍यात आलेल्‍या योजनांच्‍या कार्याचा विस्‍तार करण्‍यासाठी जिल्‍हा परिष्‍दांना योजनांतर्गत अनुदाने शासनामार्फत मंजूर करण्‍यात येतात.

  1. प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍थापना
  2. प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र यांच्‍या इमारतीची बांधकामे/देखभाल दुरुस्‍ती
  3. प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे बळकटीकरण
  4. उपकेंद्राची स्‍थापना
  5. विभागीय असमतोल- प्राथमिक आरोग्‍य केंद्र , उपकेंद्र यांची स्‍थापना व बांधकामे

आरोग्‍य संस्‍था स्‍थापन करण्‍यासाठी केंद्र सरकारचे लोकसंख्‍येचे निकष्‍

क्रमसंस्‍थालोकसंख्‍येचा निकष
बिगर आदिवासीआदिवासी
उपकेंद्र५०००३०००
प्राथमिक आरोग्‍य केंद्र३००००२००००

महाराष्‍ट्रातील प्राथमिक आरोग्‍य सेवा व सुविधा

अ.क्र.

जिल्‍हा

प्राथमिक आरोग्‍य केंद्रउपकेंदे

आदिवासी

बिगर आदिवासीएकुणआदिवासीबिगर आदिवासीएकुण
ठाणे५१२७७८३४६१४६४९२
रायगड४९५२१९२६९२८८
रत्‍नागिरी६७६७३७८३७८
ठाणे मंडळ५४१४३१९७३६५७९३११५८
धुळे१४२७४१९११४१२३२
नंदुरबार५६५८२७८१२२९०
जळगांव७५७७१६४२६४४२
नाशिक५२५११०३३००२७७५७७
अहमदनगर८७९६४८५०७५५५
नाशिक मंडळ१३३२४२३७५७३३१३६३२०९६
पुणे८८९६६१४७८५३९
१०सोलापूर७७७७४३१४३१
पुणे मंडळ१६५१७३६१९०९९७०
११सातारा७१७१४००४००
१२कोल्‍हापूर७३७३४१३४१३
१३सांगली५९५९३२०३२०
१४सिंधुदुर्ग३८३८२४८२४८
कोल्‍हापूर मंडळ२४१२४११३८११३८१
१५औरंगाबाद५०५०२७९२७९
१६जालना४०४०२१३२१३
१७परभणी३१३१२१४२१४
१८हिंगोली२२२४१३२१३२
औरंगाबाद मंडळ१४५१४५८३८८३८
१९लातूर४६४६२५२२५२
२०उस्‍मानाबाद४२४२२०६२०६
२१बीड५०५०२८०२८०
२२नांदेड१४५१६५९२२८५३७७
लातूर मंडळ१४१८९२०३९२१०२३१११५
२३अकोला३०३०१७८१७८
२४वाशिम२५२५१५३१५३
२५अमरावती११४५५६९५२३८३३३
२६यवतमाळ१९४४६३११८३१७४३५
२७बुलढाणा५२५२२८०२८०
अकोला मंडळ३०१९६२२६२१३११६६१३७९
२८नागपूर४५४९२६२९०३१६
२९वर्धा२७२७१८११८१
३०भंडारा३३३३१९३१९३
३१गोंदिया१९२०३९१२५११३२३८
३२चंद्रपूर५०५८६४२७५३३९
३३गडचिरोली४५४५३७६३७६
नागपूर मंडळ७६१७५२५१५९११०५२१६४३
एकुण३१५१४९६१८११२०५५८५२५१०५८०

उपकेंद्र-

उपकेंद्रामार्फत प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्‍याण, माता बाल संगोपन विषयक सल्‍ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्‍ठरोग व हिवतापाच्‍या रुग्‍णांना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्‍य शिक्षण इत्‍यादी सेवा पुरविण्‍यात येतात. प्रत्‍येक उपकेंद्रामध्‍ये आरोग्‍य सेवक (पुरुष) व (स्‍त्री) तसेच एक अंशकालीन स्‍त्री परिचर अशा ३ पदांस शासनाने मान्‍यता दिली आहे.

Check Also

Arogya Sanstha

आरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप आरोग्याच्या पायाभूत सुविधा आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठीची प्रमाणके : बिगर आदिवासी …

Leptospirosis

लेप्‍टोस्‍पायरोसीस हा लेप्‍टोस्‍पायरा या रोगजंतुमुळे होणारा आजार आहे. महाराष्‍ट्रात कोकण विभागात हा आजार विशेषकरुन आढळतो. …

Polio

पोलिओ हा मज्‍जासंस्‍थेवर पारिणाम करणारा आजार असून त्‍यामुळे गंभीर आजार, अर्धांगवायू किंवा मृत्‍यु देखील होऊ …

Kavil A & E

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..