Amazon Big Sell

रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

Railway Timetable & Live Status on Whatsapp

रेल्वे प्रवासापूर्वी आपल्या ट्रेनचं लाईव्ह स्टेट्स म्हणजे सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी आता आयआरसीटीसी आणि मेकमायट्रीप यांनी एकत्र येऊन रेल्वे वेळ आणि स्थितीची व्हॉट्सअॅपवर सोय केली आहे!

याद्वारे आपल्याला ट्रेन नंबर पाठवताच त्या ट्रेनची वेळ, वेळेवर निघाली/पोहोचली आहे का याबद्दल लगेच व्हॉट्सअॅपवरच मेसेज येईल! पुढील स्टेशन, कोणतं स्टेशन गेलं यासारखी माहिती जे यापूर्वी वेबसाइट/फोन कॉलवर मिळायची ती आता व्हॉट्सअॅपवर मिळेल!

Railway Timetable & Live Status on Whatsapp

ट्रेनची सद्यस्थिती व्हॉट्सअॅपवर कशी पाहायची ? :

  1. मेकमायट्रिपचा 7349389104 हा क्रमांक तुमच्या फोनवर Contacts मध्ये सेव्ह करा.
  2. व्हॉट्सअॅपवर जाऊन तिथे तुम्हाला माहिती हव्या असलेल्या गाडीचा क्रमांक टाका
    उदा. आम्ही सोलापूर पुणे रेल्वेचा १२१७० क्रमांक टाकला आहे. तर त्याबद्दल लगेच माहिती पुढच्या मेसेज द्वारे आलेली दिसत आहे.

यासोबत PNR क्रमांकाद्वारे तुमच्या तिकिटाची सुद्धा माहिती मिळेल! तुमचा PNR क्रमांक त्या नंबरवर मेसेजद्वारे पाठवा.

 

Railway Timetable – तरीही समजा काही कारणास्तव ही सेवा चालत नसेल तर तुम्ही खालील वेबसाइटवर जाऊन सुद्धा लाईव्ह स्टेट्स पाहू शकता…

Check Also

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI – Unified Payment Interface) यूपीआय ही एक अशी व्यवस्था …