[जीवन चरित्र] रजनीकांत मराठी माहिती | Rajinikanth biography in marathi

Rajinikanth biography in marathi: सुपरस्टार रजनीकांत हे एक असे नाव आहे ज्यांना भारतातच नव्हे तर जगभरात ओळखले जाते. रजनीकांत दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेता आहेत. रजनीकांत नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड आहे. आज आपण रजनीकांत यांची मराठी माहिती (rajinikanth in marathi) व जीवन चरित्र पाहणार आहोत.

Rajinikanth biography in marathi

Rajinikanth biography in marathi

जन्म व बालपण

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 ला कर्नाटकातील बेंगळूर येथे झाला. रजनीकांत यांचे कुटुंब एक मराठी कुटुंब होते. मराठी कुटुंबात जमल्याने त्यांचे नाव शिवाजीराव ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव रामोजी राव गायकवाड व आईचे नाव जिजाबाई होते. रामोजी गायकवाड एक पोलिस कॉन्स्टेबल होते.

लहान असताना त्यांच्या घराची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. रजनीकांत आपल्या चार भाऊ बहिणीमध्ये सर्वात लहान होते. 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.

त्यांचे प्रारंभिक शिक्षण गवर्नमेंट माँडल प्रायमरी स्कूल गविपुरम, बेंगळूर येथे झाले. यानंतर चे शिक्षण आचार्य पाठशाला पब्लिक स्कूल मधून प्राप्त केले. या शाळेत असताना ते नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असत.

रजनीकांत यांचे करीयर

रजनीकांत भारतीय सिनेमातील सर्वात प्रभावी अभिनेत्यांमधून एक आहेत. भारतीय चित्रपटातील योगदानामुळे त्यांना भारतातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्म भूषण देण्यात आला आहे.

परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुपरस्टार रजनीकांत यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर करीयरच्या सुरुवाती काळात एक कारपेंटर ची नोकरी केली. यांनतर हमाल चे कामही केले. याच दरम्यान बेंगळूर परिवहन मंडळात जागा निघाल्या. येथे रजनीकांत यांना यश मिळाले. ते कंडक्टर बनले. रजनीकांत यांना आर्थिक सहायता मिळाली. परंतु त्यांच्या आयुष्याचे ध्येय हे नव्हते. कंडक्टर चे काम करीत असताना तिकीट काढतांना लोकांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत, विशिष्ट पद्धतीने वाजवली जाणारी शिटी इत्यादी गोष्टी लोकांना भावत असत.

Birthday Wishes for wife in marathi << READ HERE

सुपरस्टार रजनीकांत मराठी माहिती

रजनीकांत यांचे चित्रपट करीयर

रजनीकांत यांना चित्रपटात अभिनय करण्याची आवड होती. ज्यामुळे त्यांनी 1973 साली अॅक्टींग मध्ये डिप्लोमा करण्यासाठी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश केला. याच इन्स्टिट्यूट मध्ये एका नाटका दरम्यान चित्रपट निर्देशक बालचांदर यांची नजर त्यांच्यावर पडली. खऱ्या हिऱ्याची ओळख जोहरीलाच असते. या म्हणीनुसार त्यांनी रजनीकांत या हिऱ्याची ओळख करून त्यांच्यासमोर एका चित्रपटात अभिनय करण्याचा प्रस्ताव ठेवला. रजनीकांत यांनी हा प्रस्ताव स्वीकारीत होकार दिला. “अपूर्वा रागंगाल” हा त्यांच्या अभिनयाचा प्रथम चित्रपट होता. यांनतर रजनीकांत यांनी तामिळ भाषा शिकली. व येथूनच त्यांच्या फिल्मी करीयर ची सुरुवात झाली.

अभिनयाशिवाय रजनीकांत यांनी पटकथा लेखक फिल्म निर्माता आणि एक पार्श्व गायक म्हणूनही भूमिका साकारल्या. रजनीकांत यांनी जवळपास 190 चित्रपटात अभिनय केला. ज्यामध्ये तामिळ, कन्नड, तेलगू, हिंदी, इंग्रजी व बंगाली चित्रपट समाविष्ट आहेत.

रजनीकांत यांचे वैयक्तिक जीवन

रजनीकांत यांनी 24 फेब्रुवारी 1981 ला आंध्रप्रदेशातील तिरुपती मध्ये लता रंगाचारी नावाच्या मुलीशी विवाह केला. लता ही इथिरज कॉलेज ची विद्यार्थिनी होती. लता यांनी आपल्या कॉलेज मॅगझिन साठी रजनीकांत यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. येथेच त्यांची प्रथम भेट झाली होती. विवाहानंतर रजनीकांत यांना दोन मुली ऐश्वर्या व सौंदर्या झाल्या.

ऐश्वर्या चा विवाह अभिनेता धानुष यांच्याशी करण्यात आला. व सौंदर्या या तामिळ चित्रपटाच्या प्रोड्यूसर व डायरेक्टर आहेत त्यांचा विवाह बिझनेसमन अश्विन रामकुमार यांच्याशी झाला.

2007 साली रजनीकांत हे आशिया खंडातील सर्वात जास्त कमाई करणारे अभिनेता बनले होते. त्यांनी शिवाजी द बॉस या चित्रपटासाठी 26 करोड भारतीय रुपये घेतले होते. रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा आंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की दक्षिणेतील लोकांनी त्यांच्यासाठी एक मंदिराचे निर्माण केले आहे.

हास्य व अँक्शन प्रत्येक रोल अतिशय चांगल्या पद्धतीने करणारे महान अभिनेता रजनीकांत यांचे सध्याचे वय 63 वर्ष आहे व ते अजुनही एकानंतर एक सुपरहिट चित्रपट बनवत आहेत.

मित्रांनो आशा करतो की ही Rajinikanth information in marathi तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल व त्यांचा जीवन परिचय वाचून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *