rajiv gandhi arogya yogana

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

योजनेचे नाव :राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय :शासन निर्णय क्र. रांगायो-2010/प्र.क्र.240/आ-6 दि. 31 मे, 2011
योजनेचा प्रकार :योजनांतर्गत योजना
योजनेचा उद्देश :राज्यातील दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
 • • दारिद्रय रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक
 • • दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली) कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून),
 • • औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा अशा एकुण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे.
योजनेच्या प्रमुख अटी :—–
आवश्यक कागदपत्रे :लाभार्थ्यांची ओळख राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा राज्य शासन ‍निर्धारीत करील अशा इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे तसेच सदर ओळखपत्र मिळेपर्यंत योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांकडे असलेली वैध शिधापत्रिका व केंद्र/राज्य शासनाने वितरीत केलेले कोणतेही एक ओळखपत्र (छायाचित्रासह) उदा. आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना इ. आणि औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा अशा एकुण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतकरी कुटुंबांसाठी त्यांच्याकडे असलेली शुभ्र शिधापत्रिका अथवा 7/12 उताऱ्याच्या आधारे योजनेंतर्गत उपचार अनुज्ञेय आहेत.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • • योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पध्दतींवरील उपचारासाठी कुटुबांतील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष/प्रतिकुटुंब रु.1.50 लाख एवढी आहे.
 • • मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रति वर्ष/प्रति कुटुंब रु.2.50 लाख आहे.
अर्ज करण्याची पद्धत :योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्रामार्फत रुग्णास अर्ज करता येतो.
१०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :रुग्ण भरती झाल्यापासुन तात्काळ किंवा त्या दिवशी 12 ते 24 तासात.
११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, वरळी, मुंबई
 • पदनामदुरध्वनीई-मेल
  मुख्य कार्यकारी अधिकारी(022) 24912291[email protected]
  उपमुख्य कार्यकारी अधिकारी(022) 24999202[email protected]
  सहाय्यक संचालक24999201[email protected]
  वित्तीय सल्लागार24999201[email protected]
१२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • www.jeevandayee.gov.in
 • टिप :- दि. 7 जुन, 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार सदर योजना 1 ऑक्टोबर, 2016 रोजी संपुष्टात येऊन दि. 2 ऑक्टोबर, 2016 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.त्याबाबतचा शासन निर्णय दि. 4 ऑगस्ट, 2016 रोजी निर्गमित करण्यात आला असून या नवीन योजनेबाबतची सविस्तर माहिती आपले सरकार या ई-पोर्टल वर उपलब्ध करण्याकरिता यथावकाश कळविण्यात येईल

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..