Amazon Big Sell

Ratio & Proportion Problems

गुणोत्तर व प्रमाण नमुना प्रश्न

(1) खुर्ची व टेबल यांच्या किमतींचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रु.
आहे, तर खुर्चीची किंमत किती?
(1) 126 रु. (2) 189 रु. (3) 252 रु. (4)315 रु.

स्पष्टीकरण : खुर्चीची किंमत x रु. आहे असे मानल्यास –
x = 441×3/7 = 189 किंवा 441 ला 7 ने भागून 3 ने गुणावे. 441/7 x 3 = 63 x 3 = 189. त्यामुळे एकदम उत्तर मिळेल.

(2) सुमा, क्षमा व पमा यांची वये अनुक्रमे 12, 18 व 9 वर्षे असल्यास त्यांच्या वयांचे
गुणोत्तर काढा.
(1) 6: 9:9 (2)6:3:3 (3)4: 6:3 (4)4:3:6.

स्पष्टीकरण : इष्ट गुणोत्तर 12 : 18:9 म्हणजे 4 : 6 : 3 हे होय. म्हणून चौकटीत
3 हा अंक लिहिला आहे.

(3) 30 सेकंदांचे 4 मिनिटांशी गुणोत्तर किती?
(1) 1:2 (2) 1:4 (3) 1:8 (4) 1: 6.

स्पष्टीकरण : गुणोत्तर काढण्यासाठी परिमाणे एकच असणे आवश्यक असते. म्हणून या उदाहरणात 4 मिनिटांचे सेकंद करून घेणे आवश्यक आहे.

4 मिनिटे = 240 सेकंद. म्हणून इष्ट गुणोत्तर

30 : 240 = 1 : 8.

(4) जर 5x = 6y = 3z = 9m, तर x, y, z, m यांपैकी कोणत्या अक्षराची किंमत सर्वात
अधिक आहे?
(1) m (2)z (3)y (4) x.

स्पष्टीकरण : अशा प्रकारे सारखीच किंमत असणाऱ्या निरनिराळ्या पदांपैकी ज्या
पदातील अक्षराचा अंकगुणक सर्वांत लहान असतो, त्या अक्षराची किंमत सर्वांत अधिक असते. येथे 3z हे असे पद आहे.

(5) 10 किलो साखरेला 180 रु. पडतात, तर 4 किलो साखरेची किंमत किती?
1)64रु 2)68रु 3) 70 रु 4) 72 रु.
स्पष्टीकरण 4 किलो साखरेची किंमत x रु. असेल, तर
x/180=4/10
x =4/10×180 = 72 रु.

(6) कादर, अली व हाफिज यांच्या वयांचे गुणोत्तर 2: 3:4 असे आहे. अलीचे वय
13 वर्षे असेल, तर कादर व हाफिज यांची वये काय?
(1) 24 वर्षे (2) 20 व 10 वर्षे (3) 10 व 15 वर्षे (4) 10 व 20 वर्षे,

स्पष्टीकरण : कादरचे वय x वर्षे मानल्यास, x/15=2/3

Therefore x= 15×2/3=10
हाफिजचे वय y वर्षे मानल्यास, = y/15=4/3

y= 15×4/3=20

कादरचे वय 10 वर्षे व हाफिजचे वय 20 वर्षे

(7) आई व मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे
गुणोत्तर 9 : 4 होते; तर आईचे आजचे वय किती वर्षे?
(1) 40 (2) 50 (3) 30 (4) यांपैकी नाही,

स्पष्टीकरण : आई आणि मुलगा यांची आजची वये अनुक्रमे 2x व x वर्षे मानू.
त्यांची चार वर्षांपूर्वीची वये अनुक्रमे 2x-4 व x-4 वर्षे असली पाहिजेत.
2x-4/x-4=9/4

8x-16=9x-36
8x-9x= -36+16

-x = -20 x=20

आईचे आजचे वय = 2x= 2×20 = 40 वर्षे. म्हणून

(B) 1, 10 आणि 25 या संख्या प्रमाणात आहेत, तर ४ = किती?
(1) 10 (2)8 (3)4 (4) 2.

स्पष्टीकरण x, 10 व 25 प्रमाणात आहेत, म्हणून
x/10= 10/25

25x=100

x=100/25=4

Asha Transcription

Leave a Reply