sai baba story in marathi: साई बाबा ज्यानाच शिर्डीचे साईबाबा म्हणूनही ओळखले जाते. ते एक भारतीय फकीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना शिर्डी चे साईबाबा म्हटले जाते. साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक चमत्कार केले. त्यांचे भक्त हिंदू मुस्लिम दोन्ही समुदायात आहेत. परंतु ते मात्र हिंदू होते की मुस्लिम हे अजून स्पष्ट नाही. आजच्या या लेखात आपण साईबाबांची कथा व त्यांची संपूर्ण मराठी माहिती मिळवणार आहोत. ही sai baba information in marathi तुमचे ज्ञान वाढवून तुम्हाला साईबाबा विषयी अधिक जाणण्यास मदत करील. तर चला सुरू करुया…
sai baba information in marathi
साई बाबांचे प्रारंभिक जीवन
साई बाबांचा जन्म 28 सप्टेंबर 1835 ला महाराष्ट्रातील पथरी येथे झाला. साईबाबांचे जन्म स्थान, जन्म दिवस आणि खरे नाव या विषयी पक्की माहिती उपलब्ध नाही आहे. त्यांनी आपल्या जीवन काळात स्वतः विषयी खूप कमी माहिती सांगितली. येवढेच नव्हे तर त्यांनी आपला धर्मही सांगितला नाही. म्हणूनच त्यांना मानणाऱ्या हिंदू व मुस्लिम दोन्ही अनुयायांची संख्या सारखीच होती. श्रद्धा व सबुरी अर्थात संयम हे त्यांच्या विचारांचे सार आहे. त्यांच्या नुसार कोणताही व्यक्ती अपार धैर्य आणि खऱ्या भक्तीचा मार्गानेच परमेश्वर प्राप्ती करू शकतो.
सांगितले जाते की 16 वर्षाच्या वयात साईबाबा अहमदनगर जिल्ह्याजवळ असलेल्या शिर्डी या गावी पोहोचले. येथे त्यांनी एका लिंबाच्या झाडाखाली कठोर तपस्या केली. गावातील लोक त्यांची तपश्चर्या पाहून चकित झाले. लोकांनी पहिल्यांदाच कठोर थंडी उष्णता व पावसात ध्यान करणारा एक युवा पहिला होता. काही लोक त्यांना पागल समजून दगड मारू लागले. यानंतर साईबाबा अचानक गावातून गायब झाले. जवळपास तीन वर्षे ते शिर्डी पासून दूर होते.
साईबाबा मराठी कथा
साईबाबांचे शिर्डीत पुनरागमन
1858 मध्ये साईबाबा पुन्हा शिर्डीत आले. या वेळी त्यांची वेशभूषा थोडी बदलली होती. त्यांनी पायापर्यंत सफेद वस्त्र आणि डोक्यावर एक कापडी टोपी घातली होती. त्यांच्या एक भक महल्सापती नुसार ते जेव्हा गावात आले तेव्हा त्यांचे लांब केस व खेळाडू प्रमाणे वस्त्र होते. त्यांच्या वेशभूषे वरून ते एक मुस्लिम सुफी संत वाटत होते. गावातील बहुसंख्य लोकसंख्या हिंदू असल्याने त्यांचा उचित सत्कार नाही झाला. sai baba in marathi.
जवळपास पाच वर्षे ते एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसले होते. ते कोणाशी जास्त बोलत नसत. आणि शेवटी त्यांनी एका पडक्या मशिदीला आपले घर बनवले व एकाकी जीवन जगायला लागले. तेथे येणारे लोक त्यांना भिक्षा देत असत. साई बाबा देखील त्यांनी पेटवलेल्या धूनी मधून निघालेली राख लोकांना प्रसाद च्या रूपाने देत असत. लोकांचे मानणे होते की त्या राख मध्ये चिकित्सा करणारी शक्ती होती.
हळू हळू गावातील लोक त्यांच्याकडे येऊ लागले. सन 1910 पर्यंत साईबाबांचे प्रसिद्ध मुंबई पर्यंत पसरली. दूरदूरहून लोक त्यांना भेटायला येऊ लागले. त्यांनी संताची उपाधी मिळाली. साईबाबा आपले संपूर्ण आयुष्य शिर्डीतच राहिले.
काही लोकांचे मानणे आहे की साई बाबांकडे अद्भुत दैवी शक्ती होत्या, त्यांच्या मदतीने ते अनेक लोकांची मदत करीत असत. परंतु साईबाबांनी कधीही ही गोष्ट स्वीकारली नाही. ते म्हणायचे की मी तर लोकांचा एक गुलाम आहे व त्यांची सेवा करणे माझी मजबुरी आहे. साईबाबा संपूर्ण आयुष्य एका फकिराच्या वेशभूषेत राहिले. ते जमिनीवर झोपत असत भिक्षा मागून जीवन यापन करीत असत.
पानफुटी वनस्पती मराठी फायदे वाचा येथे
सबका मालिक एक (सर्वांचा मालक एक आहे)
साईबाबांनी ‘सबका मालिक एक’ चा नारा दिला होता. त्यांची प्रसिद्धी संपूर्ण भारतात पसरली होती. हिंदू-मुस्लीम सद्भावना कायम ठेवण्यासाठी त्यांनी दोघे धर्मांना एकमेकांचे अनुसरण करण्यास सांगितले. ते नेहमी म्हणत असत की माझ्यावर विश्वास ठेवा तुमची प्रार्थना स्वीकार केली जाईल. या शिवाय त्यांच्या जिभेवर नेहमी ‘अल्लाह मालिक’ हा शब्द असे.
साई बाबांचा मृत्यू
साई बाबांनी आपल्या मागे कोणताही अध्यात्मिक वारीस किंवा अनुयायी सोडला नाही. साई बाबांची मृत्यू 15 ऑक्टोंबर 1918 ला शिर्डी याच गावात झाली. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय 83 वर्षे होते.
साईबाबांच्या चमत्कारिक कथा: (sai baba chamatkar in marathi)
1) पाण्यापासून दिवा लावणे
साईबाबांना त्यांची मशीद व इतर मंदिरांसाठी दिवे लावण्यात खूप आनंद येत असे. परंतु दिव्यातील तेला साठी त्यांना गावातील व्यापाऱ्याकडे आश्रित रहावे लागत असे. गावातील व्यापारी त्यांना मोफत देऊन थकून गेले व एक दिवस त्यांनी साईबाबांची क्षमा मागत तेल नाही आहे असे म्हणून तेल देण्यास नकार दिला. त्यांना काहीही न बोलता साईबाबा आपल्या मशिदीत परत आले. आता त्यांनी मातीच्या दिव्यांमध्ये पाणी भरले व वात पेटवून दिली. त्यांनी लावलेले दिवे मध्यरात्रीपर्यंत जळत राहिले. याची माहिती जेव्हा गावातील व्यापाऱ्यांना कळाली. तेव्हा ते साईबाबांकडे क्षमा मागायला आले. साईबाबांनी त्यांना क्षमा करत पुन्हा कधीही खोटे न बोलण्यास सांगितले. अशा पद्धतीने साईबाबांनी आपल्या चमत्काराने पाणीचे दिवे लावले.
2) पावसाला थांबवणे
एकदा रायबहादूर नावाचा एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत साईबाबांचे दर्शन करायला शिर्डी आला. जसे ही ते पती-पत्नी बाबांचे दर्शन करून परत निघायला लागले, तसा जोरदार पाऊस सुरू झाला. जोरदार वीज कडाडू लागली आणि वादळ येऊ लागले. साईबाबांनी प्रार्थना केली “हे अल्लाह, पाऊस थांबून द्या, माझे मुले घरी जात आहेत त्यांना शांततेने जाऊ द्या”. साईबाबांच्या प्रार्थनेनंतर पाऊस थांबला पती-पत्नीस सकुशल घरी गेले.
३) बुडत्या मुलीला वाचवणे
एकदा गावातील बाबू नावाच्या एका व्यक्तीची तीन वर्षाची मुलगी विहिरीच्या पाण्यात पडली. जेव्हा गावातील लोक तिला वाचवण्यासाठी विहिरीकडे पळाले. तेव्हा त्यांनी पाहिले की मुलगी हवेत लटकली होती. जसे कोणत्यातरी अदृश्य हाताने तिला पकडून ठेवले आहे आणि हळूहळू ती वर आली. साई बाबांना ती मुलगी खूप आवडत असे. या घटनेनंतर गावातील लोक “ये सब बाबा की लीला हैं” असे म्हणू लागले.
तर मित्रांनो ही होती sai baba marathi mahiti आशा करतो की sai baba information in marathi and marathi story तुम्हाला उपयुक्त ठरली असेल. साईबाबांच्या या मराठी कथा तुम्हाला कश्या वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.
3 thoughts on “[कथा] साईबाबा संपूर्ण मराठी माहीती | Sai Baba story information Marathi”