Samajik Vishamta Marathi Nibandh

Samajik Vishamta Marathi Nibandh

सामाजिक विषमता

 

‘ आम्ही सारे बांधाव आहोत. आम्ही एकाच देशाचे नागरिक आहोत, ‘ अशी प्रतिज्ञा आपण सारे दररोज शाळेत घेत असतो.पण खरोखरच आपले वर्तन त्यानुसार आहे का ? प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न (question) विचारला पाहिजे व आपले आचरण चापचून पहिले पाहिजे.
भारत हा एक विशाल देश आहे.या देशात विविध धर्माचे, जातीचे पंथांचे लोक राहतात.

किंबहुना या विविधतेचा आपल्याला अभिमान वाटतो. पण काही वेळेला आपले वर्तन हे याच्याशी विसंगत असते,लाजिरवाणे असते. माझी जात श्रेष्ठ, इतर माझ्यापुढे कनिष्ठ असे काहींना वाटते. काही लोकांना इतरांचा स्पर्श, इतरांची सावलीही रुचत नाही. हे असे का घडते ? यामागे कोणते कारण असावे ? खरे तर सामाजिक जणीव सुव्यवस्तित राहावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी कामांची विभाजणी केली. यावरून आपण वेगवेगळ्या जाती मनू लागलो.

कालांतराने या जाती जन्मावरून वाट्याला येऊ लागल्या. मग त्यांतून समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ ठरू लागली. हेच सामाजिक विषमतेचे मूळ आहे.
एक गोस्ट नक्की की, कामाची विभागणी. ही केवळ सोय आहे. कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. दुसरी महत्वाची गोस्ट म्हणजे कोणतेही काम कमी प्रतीची नाही, हलके नाही.

सामाजिक विषमता

असे काम करणाऱ्याला कनिष्ठ मानणे अगदी चूक आहे, हे जाणूनच आपल्या घटनेने सर्वाना सामान हक्क दिले आहेत प्रत्येकाला आपल्या विकासाची सामान संधी आहे.
जाती, धर्म,पंथ, वर्ण यावरून समाजात जशी विषमता केली जाते तशीच विषमता, तसाच भेदभाव काही वेळेला आर्थिक स्तितीवरूनही केला जातो.

अनेकदा धनिक स्वतःला गरिबांपेक्षा श्रेष्ठ समजत. मालक नोकराला तुच्छ लेखतात. काही ठिकाणी आजही जमीनदार आपल्या सेवकांना गुलामाप्रमाणे वागवतात. सावकार ऋणकोंची गालचोपी करतात. अशा तऱ्हेचे वर्तन समाजाची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीने घटक ठरते.

Social Inequality

Samajik Vishamta Marathi Nibandh

स्त्री-पुरुष भेदभावही काही समाजात आढळतो.स्त्रीला ‘ पायातली वाहन ‘ असे मानले जाते हे ही त्या समाजातील लाजिरवाणे आहे. हिसुद्धा सामाजिक विषमता आहे. तेव्हा अशा प्रकारची कोणतीही विषमता समाजविकासाला घटक आहे, हेच प्रत्येकाने लक्ष्यात ठेवले पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. कोणीही ‘ कानूस ‘ होऊ नये , असे कवयित्री बहिणाबाई चौधरी विनविते. आपण जगावे व इतरांनाही जगू द्यावे.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply