Amazon Big Sell

साने गुरुजी Marathi Essay

साने गुरुजी Marathi Essay

sane guruji marathi essay

बाल वयात मुलांच्या मनावर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्याची सोबत करतात. हे लक्षात घेऊन आई-वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करायला पाहिजेत. पूजनीय साने गुरुजी यांना सुदैवाने तसेच आई-वडील लाभले होते.

त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाला हे गाव रत्नागिरी जिल्हात येते. त्यांचे पूर्ण नाव पांढूरंग सदाशिव राणे, पण त्यांना घरी पंढरी म्हणत. त्यांची आई यशोदाबाई, वडील सदाशिवराव हे पंढरीचे योग्य तर्हेने संगोपन करत. ते प्रथम पालगड च्या शाळेत शिकले. त्यांचे वडील त्यांच्या शिक्षणात फार दक्ष होते.
तसेच यशोदाबाईने लहानपणी त्यांच्या वर फार मोलाचे संस्कार केले. सालस, गुणी, कष्टाळू आणि सात्विक मनोवृत्ती असलेल्या पंढरीची पुढे ‘गुरुजी’ हीच ओळख झाली. लहान वयातील शारीरिक-मानसिक जडण-घडण करण्याची जबाबदारी हि मुख्यत: आई वरच पडते. त्यांची आई तशीच होती.त्या म्हणायच्या” पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मन घाण होऊ नये म्हणूनही जप हो !” , खोटे कधी बोलू नको, ‘ कोणत्याही प्रकारचे काम करण्याची लाज बाळगू नको ”, ” दिन दुबळ्याना मदत करण्यास पुढे हो” अस्या अनेक गोष्टी त्यांना लहानवयात रुजवण्यात आल्या. त्या प्रेम करीत,पण चुकी झाल्यास कठोर शिक्षा देत असत.त्यामुळे मोठेपणी ते सत्यनिष्ठ, परोपकारी, प्रामाणिक बनले.
पालगडचे पाच वर्ग शिक्षण झाल्या नंतर ते मामा कडे पुण्याला गेले, तेथे त्यांनी अनेक धार्मिक पोथी-पुराने यांचे वाचन केले पण आईकडे जाण्याच्या ईच्छेने ते परत पालगडला आले. त्यासाठी त्याना खूप बोलणी खावी लागली. पण ते भरपूर कामे करून आईची मदत करीत असत त्यामुळे घरच्यांचा राग दूर करत. नंतर ते इंग्रजी शिक्षणा करीता आत्याकडे दापोलीला राहिले तेथे त्यांनी आपली वाचनाची हौस भागविली. संस्कृत, ईंग्रजी, मराठी अशी अनेक पुस्तके त्यांना तेथे वाचनास मिळत.
त्यानंतर त्याना महिती पडले कि औध ला मोफत शिक्षण, व जेवण मिळते. तेव्हा घरच्या परवानगीने ते औंध ला गेले.काही दिवसातच तेथे प्लेग ची साथ आल्यामुळे ते परत आले. नंतर ते पुण्याला गेले, १९२२ मध्ये बी.ए. ची पदवी उत्तीर्ण झाले.पुढे अमळनेरला तत्वज्ञान मंदिरात काम करीत एम.ए.झाले नंतर खानदेश एजुकेशन सोसायटी शाळेत नोकरी मिळाली. मुलांना शिकविण्याची त्यांची पद्धत आणि त्यामागची कळकळ पाहून उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्धी झाली. काही दिवस वसती गृहाचे काम चालविले. मुलांना चांगले संस्कार देण्याची त्याना संधी मिळाली . थोर पुरुष्या चे चरित्रे लिहिली. त्यावेळीच त्यांच्या मनात आपण देश्यासाठी काही तरी करावे असे वाटू लागले.
नेत्यांची भाषणे, गांधीजींच्या चळवळी जनतेला मिळणारे संदेश या सर्व गोष्टींने त्यांच्या मनावर देश्या विषयीच्या भावना बळावल्या.नंतर १९३० मध्ये त्यांनी शाळा सोडली.आणि ते आश्रमात दाखल झाले. सत्याग्रहाच्या कामात भाग घेऊन भाषणे करू लागले त्यांच्या भाषणाने तरुणांना भाराऊन टाकले. त्यांच्या अंमळनेरच्या भाषणात त्यांवर खटला भरण्यात आला त्याना १५ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली.
त्यातही त्यांनी लोकशिक्षण, लेखन, स्फूर्ती गीते चालूच ठेवले.” स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई” ”दुखी सारख्या कथा,” ”खरा सत्याग्रही” , क्रांती, आस्तिक, अश्या कथा कादम्बरी, नाटके त्यांनी लिहिलीत. त्यांची ”शामची आई ” हि कादम्बरी फार प्रसिद्ध झाली, स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत राहून त्यांनी देश्याच्या स्वांतंत्र्यासाठी अंनेकांना प्रेरणा दिली.
”आधी केले मग सांगितले” या विचारांचे ते होते. समाजात एकोपा राहावा असे त्याना वाटे. ”साधना साप्ताहिकांचे संपादन” ” कुमार संमेलनाचे अध्यक्षपद, मंदिर प्रवेशाच्या निमित्ताने पंढरपुरला प्राणांतिक उपोषण असे समाज कार्य करताना त्यांनी कुमारांना संदेश म्हणून सांगितले ” देशी- विदेशी वाड्मयाचा अभ्यास करा, अनुवाद करा. सर्वत्र हिंडून वाड्मय गोळा करा, आणि देश , समाज याची सेवा करा. सेवा दलात त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले होते. ते मनाने फार हळवे होते देशाच्या स्वातंत्र्या नंतर घडलेल्या काही घटनांनी अस्वस्थ झालेले गुरुजी अखेर ११ जून १९५० साली देवाघरी गेलेत.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply