संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या (22021062)
योजने बद्दलचा शासन निर्णय : शालेय शिक्षण विभाग क्र.एसएएन-1076/20573(5659)दि.29/9/1976,शालेय शिक्षण विभाग क्र.एसकेई 1098/4240/(229/98) माशि-8 दिनांक 20 ऑक्टोबर 1998 अन्वये संस्कृत शिष्यवृत्तीच्या संचात व दरात सुधारणा करण्यात आली आहे.
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्याना संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्याना संस्कृत भाषेच्या गुणवत्ता शिष्यवृत्या केंद्र शासनाकडून दिल्या जातात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी आहे.
योजनेच्या प्रमुख अटी : इयत्ता 8 वी मधील वार्घिक परीक्षमध्ये संस्कृत या विषयात प्राप्त केलेल्या गुणवत्तेवर इयत्ता 9 वी व 10वी आणि 10 वीच्या गुणवत्तेवर इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
आवश्यक कागदपत्रे :
  • जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.
  • 1) महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र,
  • 2) इयत्ता 8 वी मधील वार्घिक परीक्षमध्ये संस्कृत या विषयात प्राप्त केलेल्या गुणवत्ते नुसार प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : मंजूर /मान्य संचा नुसार इ.9 वी ते इ.12 वी (इ.8वी च्या वार्षिक परिक्षेमधील गुणांनुसार ) प्रमाणित दराने
अर्ज करण्याची पद्धत : सदरची योजना विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे स्तरावरून राबविण्यात येते. याबाबतचे प्रस्ताव शाळेत प्रवेश घेतल्यापासून 1 महिण्याच्या आत संबधित शाळेमार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर केले जातात. व संबधित शिक्षण उपसंचालक यांचे मागणीनुसार तरतूदीची मागणी संचालनालयाकडे केली जाते. व विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मागणीनुसार आवश्यक तरतूद संचालनालयाच्या स्तरावरून संगणक प्रणालीवर उपलब्ध करून दिली जाते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : विभागीय शिक्षण उपसंचालक (पुणे,कोल्हापूर,मुंबई,नाशिक,औरगाबाद,लातूर,अमरावती,नागपूर)
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply