Sant Goroba Kumbhar

Sant Goroba Kumbhar

संत गोरोबा कुंभार

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी भक्तिचा मार्ग सोपा करून सांगितला. सर्व जाती जमातीतल्या भक्तांना नामस्मरणाची संधी उपलब्ध करून दिली. कर्मकांड मोडीत काढले. जे आतापर्यंत वंचित होते, ज्यांना देव धर्माचा उच्चार करता येत नहता, असे अठरा पगड जाती-जमातीतले लोक भक्त बनलेअध्यात्माची दारे सर्वांसाठी खुली झाली. भक्तिचा मळा बहरला. सुसंगतीने भावपिसारा फुलला.

समाजात चैतन्य पसरले. आजही असंख्य वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नित्यनेमाने जातात. संसारातील प्रश्न बाजूला ठेवून विठ्ठल भक्तीत स्वतःला विसरतात. महाराष्ट्र हा सुसंस्कृत व नीतिमान प्रदेश आहे. इतर प्रदेशांच्या तुलनेने इथे मानवी मूल्य खोलवर रुजलेली आहेत, हे लक्षात येईल आणि याचे सारे श्रेय संतांना द्यावे लागेल.

संतांनी विचार आणि आचरणातून भक्तिचा मार्ग दाखविला. लोकजागरण केले. केवळ भक्ती आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाचे साधन हाती घेऊन समाजाचा उद्धार होऊ शकतो, हे त्यांनी पटवून दिले. विशेष म्हणजे हा भक्तिमार्गाचा आदर्श विविध जाती जमातीतल्यासंतांनी सांगितला.

अनेक संतांनी यात पुढाकार घेतला. यात गोरोबा कुंभार समाजाचे होते तर सेना महाराज नाभिक होते. महार जातीचे चोखोबा होते.ब्राह्मण ज्ञानेश्वर होते. जनाबाई दासी होत्या. चांगदेव योगी होते. सावता महाराज माळी होते,नरहरी महाराज सोनार, नामदेव शिंपी होते.

सुमारे आठशे वर्षांपूर्वी या संतांनी भक्तिचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. अध्यात्माची ओळख करून
दिली. जातपात विसरून अध्यात्माच्या झेंड्याखाली सारे वातावरण भक्तिमय करू पाहणाऱ्या संतांचे हे कार्य आपण लक्षात घेतला पाहिजे, तरच संतांचे
मोठेपण सर्वांना कळू शकेल.
या संत परंपरेत गोरोबा कुंभार हे एक महत्त्वाचे संत आहेत. सर्व संतांत ते वयाने मोठे होते म्हणून तत्कालीन संत त्यांना आदराने गोरोबा काका म्हणत.

गोरोबांच्या ध्यानीमनी विठ्ठलाचे नामस्मरण होते. ते एकदा भजनात रंगले की, सारे काही विसरत. ते ईश्वराशी एकरूप होत. भजन अनेकजण करतात, परंतु गोरोबांची विठ्ठलभक्ती वेगळी होती. नामस्मरणाचे जणू त्यांना वेडच लागले होते. त्यांनी आपल्या व्यवसायाचेच भजनीकरण केले होते. त्यांची व्यवसायावर जशी निष्ठा होती त्याचप्रमाणे व्यवसायात
काम करताना ईश्वरावरही श्रद्धा होती. श्रेष्ठ भक्तिभाव याचे प्रतीक गोरोबा होते म्हणूनच ते सर्वांचे श्रद्धास्थान ठरले. ज्ञानेश्वर-नामदेवांनीसुद्धा गोरोबांचे मोठेपण मान्य केले आहे.

संत गोरोबा कुंभार(Sant Goroba)

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा नदीच्या काठावर तेर हे गाव वसलेले आहे. तेर हे गोरोबांचे जन्मगाव. त्यांचा जन्म इ.स. १२६७ साली म्हणजेच
शालीवाहन शके ११८९ साली आषाढ शुद्ध दशमीला झाला. त्यांच्या वडिलाचे नाव महादू होते. आईचे नाव रखमाबाई होते. तेर व ढोकी ही दोन्ही गावे
जवळजवळ असल्याने गोरोबांचा जन्म तेरढोकीत झाला, असे काही जण म्हणतात.

महादू कुंभार कष्टाळू होता. घरची परिस्थिती साधारण होती. ते पंढरीच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. आषाढी कार्तिकी एकादशीला ते पंढरपूरला विठ्ठलदर्शनासाठी नेमाने जात. त्यांनी पंढरची वारी कधी चुकविली नाही.
ईश्वराचे नामस्मरण करताच कुंभार काम करत. व्यवसायाला त्यांनी ईश्वराच्या नामस्मरणाची जोड दिली होती. महादूच्या हातून तयार होणाऱ्या मडकी-
गाडग्यांना ग्राहकांची खूप मागणी होती. प्रत्येकांची मागणी पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करायचा. महादूंनी धंद्यात खोटेपणा कधी केला नाही. योग्य
भावात माल विकायचा. मागणीचा गैरफायदा कधी घेतला नाही.’

महादू आणि रखमाबाई यांच्या भक्तिमय वातावरणात गोरोबा लहानाचा मोठा होत होता. संसारात फुलणाऱ्या या गोजिरवाण्या फुलाला पाहून आई-
वडिलांना खूप समाधान वाटे. ‘विठ्ठलाची कृपा’ समजून ते दोघेही समाधानवृत्तीने धंद्यात लक्ष घालत. लहानलहान कामे करून गोरोबांनी कुंभारकीचा धंदा
शिकून घेतला. गोरोबा वयाने मोठा झाला होता.

व्यवसाय करण्यास लायक झाला होता. गोरोबा स्वतःशीच विचार करू लागला. त्याला वाटले, ‘आता
आपण कुंभारकीचा व्यवसाय करू शकतो. थकलेल्या आई-वडिलांना हे अवघड काम झेपणार नाही, त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला पाहिजे.’ गोरोबांनी
मनात विचार केला. एके दिवशी ते आपल्या वडिलांना म्हणाले, ‘बाबा,आता तुम्ही विश्रांती घ्या. माती गाढवावर घेऊन येणे, त्याचा चिखल करणे, चाकावर चिखलाचा गोळा ठेवून त्यास जसा पाहिजे तसा आकार देऊन मडके तयार करणे, अशी कामे मी आता करू शकतो. ही कष्टाची
कामे तुम्हाला झेपणार नाहीत. आता मी मोठा झालो आहे. अशी अवघड कामे तुम्ही अजून किती दिवस करत राहणार? बाबा, मला परवानगी द्या.

उद्यापासून मी सारी कामे करीन… तुम्ही विश्रांती घ्या… देवाचं नामस्मरण करा….’

गोरोबाचा प्रत्येक शब्द वडिलांच्या हृदयाला जाऊन भिडत होता. गोरोबाचा हेतू कळला. त्याच्यातली समज पाहून त्याच्या विचाराचे वडिलांना कौतुक वाटले. ते क्षणभर भारावल्यागत झाले. त्यांचा उर आनंदाने भरून आला. कामाचे ओझे हलके झाले किंवा व्यवसायातून निवृत्ती मिळते म्हणून आनंद झाला नाही तर गोरोबां व्यवसायाची जबाबदारी आनंदाने स्वतःच्या शिरावर घ्यायला तयार झाला.

आपण होऊन त्यांनी आपले कर्तव्य बजावलं
म्हणून वडिलांना आनंद झाला होता. त्यांना आपलं जीवन सार्थकी लागल्याचा भास झाला. मुले नीतिमान आणि कर्तबगार निघाली की, आई-वडिलांना असाच आनंद वाट्याला येत असतो. वडिलांनी गोरोबाला जवळ घेतले. आपल्या उराशी डोके घेऊन केसावरून हात फिरवू लागले. पिता पुत्राची ही अविस्मरणीय भेट होती. नात्यातल्या समाधानी वृत्तीचा तो कळसबिंदू होता.

महादू म्हणाले, “गोरोबा, तुझं म्हणणं ठीक आहे; पण हा व्यवसाय एकट्याने कसा करणार? यात मदतीला एखादा माणूस असावाच लागतो.’ आतापर्यंत तुझी आई मला मदत करीत होती. तीही आता थकली आहे.एक सांगू?”
‘सांगा बाबा…”तुझ्या दोन हाताचे चार हात झाले पाहिजेत. प्रपंचात दोघांनी मिळून कष्ट घेतले तर व्यवसायात प्रगती होते.’ गोरोबाला वडिलांचा विचार पटला. गोरोबा लग्नास तयार झाला.

लगेच तेथून जवळच असलेल्या ढोकीच्या दोरोबा कुंभाराची मुलगी संती सोबत गोरोबाचा विवाह संपन्न झाला. गोरोबा संती व्यवसायात रमली. ईश्वराच्या नामस्मरणात समरस झाली होती.

मुलांचा संसार पाहून आई वडिलांना आनंद झाला. वडील खूप थकले होते. एके दिवशी त्यांनी गोरोबाला जवळ बोलावून घेतले. त्याचा हात हातात घेतला. हात कुरवाळत वडिलांनी मनोदय व्यक्त केला. ते म्हणाले, “तुला सारे कळते… तू समजूतदार आहेस. तू व्यवसाय छान करशील! पण
एक लक्षात ठेव… विठ्ठलाच्या नामस्मरणाचा विसर कधी पडू देऊ नकोस…
पंढरीची वारी कधी चुकवू नकोस…’ गोरोबांनी मान डोलावली. थकलेल्या आई वडिलांनी एक दिवस जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे दुःख पचवतच गोरोबा संती व्यवसायात लक्ष घालू लागले. विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले.

गोरोबाच्या व्यवसायाची ख्याती तेर परिसरात पसरली होती. ‘माठ घ्यावा तर गोरोबांकडूनच’ अशी लोकांची धारणा झाली होती. व्यवसायातील निष्ठेमुळेच त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला होता. ओठात सारखा विठ्ठलाचा जप असल्यामुळे मनातली भावभक्ती कारागिरीतही उतरली होती.

त्यांनी व्यवसायालाच विठ्ठलाचे रूप दिले होते. समाधानवृत्तीने केलेल्या कृतीत जिवंतपणा असतो, याचा अनुभव प्रत्येकाला गोरोबांनी तयार केलेले मडके पाहून येऊ लागला. मागणी वाढत होती. गोरोबा प्रत्येकाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत. सकाळी झोपेतून उठले की, प्रातःविधी, स्नान आटोपून ते कामाला लागत. अंधार होईपर्यंत ते काम करीत. त्यांना कामाचा कंटाळा येत नव्हता. कामालाच त्यांनी देवरूप समजल्यामुळे ते सदैव व्यवसायात मग्न राहत.

संती गोरोबांच्या सुखी संसारात एक गोंडस, कोमल फूल उमलले. फुलाचा सुगंध सर्वत्र दरवाळावा तसा गोरोबा संतीच्या आनंदाला उधाण आल होत. विठ्ठल पावला’ असे त्यांना वाटले. त्यांचा विठ्ठलावर सारा
भरवसा होता. त्यांच्यामागे ‘विठ्ठल’ उभा आहे, अशी त्यांची धारणा होती. एकदा गोरोबा घरातल्या देवघरात विठ्ठलापुढे ध्यानस्थ बसले होते. गोरोबांनी भजन म्हटले. त्यांची भक्ती जगावेगळी होती.

ईश्वराच्या नामस्मरणापुढे त्यांना दुसरे काही सुचत नव्हते. काही दिसत नव्हते. संती बाळाला घेऊन आली आणि गोरोबा शेजारी जाऊन बसली. ती सुद्धा दोन्ही हात जोडून विठ्ठलाला भजत होती. बाळ मात्र आपल्याच तंद्रीत होता.

एवढ्यात गोरोबांनी डोळे डघडले. दोन्ही हात मनोभावे जोडले. शेजारी पाहतात तर काय सती बाळाला घेऊन बसली होती. गोरोबा बाळाकडे कौतुकाने पाहत राहिले. जणू काही त्याच्यातही विठ्ठलाचे रूप दिसत होते.

लगेच बाळाला जवळ घेत म्हणाले, “लबाडा, आता मला कळल तू… इयं का आलास ते… हा घे प्रसाद-विठ्ठलाचा प्रसाद” संती मात्र गोरोबाच्या भक्तिने आणि संसारातील सुखाने भारावली होती. मनातल्या मनात विठ्ठलाचे आभार मानत होती. भानावर येत गोरोबा म्हणाले, ‘चला कामाला लागू या. भरपूर काम करायची आहेत.’

संत हे आपल्याच तद्रीत जीवन जगत असतात. त्यांना सामान्य यांचे नियम लाग पडत नसतात, एकाचवेळी मनुष्य स्वभावाचा सारा वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहावयास मिळतात. व्यवहारी, संसारी
संत सहसा नसतातच, अशी अनेकांची समजूत असते. ते विठ्ठलाचे बेडे असल्यामुळे व्यावहारिक पातळीवर संतांचे वागणे चटकन नजरेत भरण्यासारखे असते. परंतु संत ससारात इतके मिसळून जातात की, त्यांचे मिसळणे सुद्धा पाहणाऱ्याला नवल वाटावे.

एकदा अशीच घटना घडली. गोरोबा झोपेतून उठले, तेच विठ्ठल नामाचा जयघोष करीत. गाढ झोपेतच कदाचित गोरोबाच्या नामस्मरणाला विराम असावा. श्वासासारखा ओठात विठ्ठलाचा जप होता. सदैव विठ्ठलाचे ओठात नाव घेणारे गोरोबा झोपेतून उठले. त्यांनी संतीकडे निरखून पाहिले.
ते म्हणाले, ‘चल उठ… उजाडलं बघ… खूप कामं हायीत… तीन-चार
दिवसांवर बाजार हाय… तवा माल तयार ठेवला पाहिजे… उठ, बाळ
उठला की, तुला काम करू देणार नाही.’

संती लगीबगीने उठली. कामाला लागली. कुलकर्यांचा रांजण त्यांना घरी नेऊन द्यायचा होता. ती रांजण खांद्यावर घेत गोरोबाला म्हणाली,
“घरात लक्ष ठेवा. बाळ उठेल बघा… मी रांजण देऊन येते.” गोरोबांनी होकारार्थी मान डोलावली. गोरोबांनी मातीचे आळे तयार केले. त्यात पाणी ओतले. आळ्यात उतरले. चिखल तुडवू लागले.

बाळ झोपेतून उठला व ओक्साबोक्सी रडू लागला. त्याच्या आवाजाकडे गोरोबाचे लक्ष गेले. त्याची तंद्री भंगली. बाळाचे रडणे त्यास स्पष्ट ऐकू येऊ लागले. ते घरात गेले आणि त्यांनी बाळाला उचलून घेतले. त्यास खांद्यावर बसवून ते पुन्हा चिखल तुडवू लागले. ते भजनाच्या नादी लागले. भजन एवढे रंगले की, खांद्यावर असलेला बाळ ही हात हलवून त्यास साथ देऊ लागला. टाळ्या वाजवू लागला.

असे हे भक्तिमय दृष्य पाहून रस्त्याने जाणारे वाटसरू थोडा वेळ थांबून, ही भावसमाधी पाहून अभिवादन करू लागले. विठ्ठल विठ्ठल म्हणतच ते पुढे जाऊ लागले. एकीकडे कामात दंग असलेला कारागीर दिसत होतातर दुसऱ्या बाजूला भक्तिने बहरलेला मळा मनोभावे खुणावीत होता.

भक्तिमय वातावरणात जणू प्रत्येकालाच विसर पडावा, असे ते दृष्य होते. इतक्यात संती आली. तिचे गोरोबाकडे लक्ष गेले. विठ्ठलाच्या नादाने वेडा झालेला गोरोबा बाळाला खांद्यावर घेऊन नाचत होता. विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. संतीला हे भावनाप्रधान दृष्य पाहून ती खूपच आनंदित झाली.

तिने पुन्हा पुन्हा हे दृष्य डोळाभर पाहून घेतले. ती मनोमन सुखावली. बाळाने संतीला पाहताच आनंदाने तिच्या अंगावर झेप घेतली. गोरोबाचे लक्ष गेले
म्हणून बरे झाले नसता, बाळ चिखलात पडला होता. गोरोबाने एका हाताने बाळास अलगद उचलून घेतले. यामुळे गोरोबाची भावतंद्री भंगली. त्यास राग आला; परंतु क्षणभरच. संतीच्या चेहऱ्यावरचा आनंदीभाव पाहून गोरोबा नरमला. शेजारी पखालजी उभा होता. त्याने पखाल रांजणात ओतली. संसारी गोरोबाचे आगळेवेगळे रूप पाहून त्यास त्याचे कौतुक वाटले.

पखालजी म्हणाला,’ गोरोबा… आता तुमचं लेकरूबी भजनाच्या नादी लागलंय की…’
गोरोबा म्हणाले, ‘हे बघा… ही संतीची कृपा आहे. संती सारं सांभाळते म्हणून मी विठ्ठलाचे भजन करू शकतो. तिची साथ नसती तर मी काहीच करू शकलो नसतो.’

गोरोबाचे बोलणे ऐकतच पखालजी निघून गेला. संती थांबली. थोडावेळच. तिने बाळाला उचलून घेतले आणि घरात जायला निघाली. ‘चल… इठ्ठल इठ्ठल म्हण… तुला दूध देते बघ..’ असे
बोबडे बोल बोलतच ती घरात निघून गेली. गोरोबा मात्र संतीकडे, बाळाकडे पाहतच चिखल तुडवू लागले. विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले.
विठ्ठलवेडे गोरोबा गोरोबाची विठ्ठल भक्ती श्रेष्ठ दर्जाची होती. त्यांनी व्यवसायालाच देवरूप केले होते. ओठात एकाच नामाचा उच्चार असे तो म्हणजे विठ्ठलाचा. विठ्ठलाच्या ध्यासाने जणू त्याला वेडच लावले होते.

नामस्मरणाच्या नादातच ते हाती घेतलेले काम पूर्णकरीत. कामाशी व विठ्ठलाशी समरस होऊन माठ तयार होत असल्यामुळे त्यांच्या कारागिरीचे खूपच कौतुक होत असे. उत्पादनापेक्षा लोकांची मागणी जास्त होती. त्यांनी तयार केलेला माठ, रांजण इ. आजूबाजूच्या खेड्यांपर्यंत पोचले होते. मागणी जास्त असे म्हणून त्यांनी कामात कुचराई केली नाही. व्यवसायातली नेकी त्यांनी कायम ठेवली.

गोरोबा स्वतःतच सदैव मग्न असत. त्यांना संतीची साथ होती. नामस्मरणाबरोबरच त्यांचे कामातही लक्ष आहे, याचे तिला खूप अप्रूप वाटे. इमानदारीने केलेल्या व्यवसायात भरभराट असते, याची तिला खात्री पटली. ती मनोभावे गोरोबांना मदत करीत होती. गोरोबा संतीच्या लग्नानंतर बारा वर्षांनी बाळ जन्मले होते.

मकरेंद्र त्यांचे नाव ठेवले. गुटगुटीत बाळ रांगू लागलं की, संतीला त्याचे खूप कौतुक वाटे. त्यास दोन्ही हाताने वर उचलून ती पटापटा मुके घेई. गोरोबा असे दृष्य पाहून आनंदित होत. परंतु ते आनंदाचे प्रदर्शन करीत नसत. बाळाच्या आगमनाने घरातील वातावरण आणखीनच अधिक फुलून गेलं होतं. तिथं कशाची कमतरता नव्हती.

हे सारे विठ्ठल कृपेने घडत आहे, असा त्यांचा समज होता. सकाळ होताच गोरोबा कामाला लागले. त्यांनी मातीचे आळे केले. त्यात पाणी ओतले. ते आळ्यात उतरले. विठ्ठलाचा जयघोष करीत चिखल तुडवू लागले. संती बाळाला घेऊन अंगणात आली. बाळाला ओसरीवर ठेवून त्याच्यासमोर चार खेळणी टाकली. बाळ खेळण्यात रंगला. संतीने पाणी आणण्यासाठी घागर कमरेवर घेतली.

ती गोरोबाला म्हणाली, “हे बघा.जरा बाळाकडं ध्यान ठेवा. मी पाणी घेऊन येते.”

गोरोबा आपल्याच तंद्रीत होते. ते डोळे मिटून भजन करीत होते.भजनाच्या तालावर पायाचा ठेका धरून ते नाचू लागले. ते तल्लीन झाले.
केशवाचे ध्यान धरूनी अंतरी मृतीके पाझरी नाचतसे…’
अशी त्यांची अवस्था बनली. त्यांच्या ओठातून शब्द सहजपणे बाहेर पडू लागले. त्या शब्दांना अर्थ होता. लय होती. नाद होता. आणि त्यात निष्ठा होती माणसातील भावनिक एकरूपतेचे ते दर्शन होते. गोरोबाचे नाचणे त्या बाळाने पाहिले. त्या इवलाश्या बाळाला गोरोबाची भक्ती कशी कळणार! एखादा बाप मुलाची समजूत काढण्यासाठी किंवा त्यास खेळवण्यासाठी जसा अभिनय करतो तसे गोरोबा करीत आहेत, असा भास त्या चिमुकल्या बाळास झाला असावा.

गोरोबांचे नाचणे पाहून बाळाने त्याच्याकडे झेप घेतली. तो आळ्याकडे येऊ लागला. गोरोबांनी डोळे मिटलेले होते. त्यांचे लक्ष विठ्ठलाकडेच होते. रांगत येत असलेला बाळ त्यांना कसा दिसणार? बाळ रांगतच येत असलेला आळ्यात उतरला. तो चिखलात मिसळला. अभंगाच्या ठेक्यावर पायांनी चिखल तुडवणाऱ्या गोरोबाच्या पायाखाली लहान मुल सापडले. गोरोबा नाचतच होते.

बाळाने रडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे रडणे त्यांनी ऐकलेच नव्हते. गोरोबाचे भजन रंगात आले होते.
‘म्हणे गोरा कुंभार, कोणी नाही दुजे’
अशी समाधी त्यांना लागली. देहभान हरपल्यामुळे बाळ पायाखाली रगडले गेले. विठ्ठलाच्या नामात दंग असणाऱ्या गोरोबाला बाळाची आर्त
किंकाळी कशी ऐकू येणार? बाळ रक्तबंबाळ झाले.

चिखलातून लाल रक्त स्पष्ट दिसत होते. पायाखालचा चिखल लाल झाला होता. इतक्यात संती पाण्याची घागर घेऊन आली. दारात पाऊल टाकताच संतीने बाळाचा शोध घेतला. इकडे तिकडे अधाशासारखी तिची नजर घरभर फिरली. शेवटी तिचे लक्ष आळ्याकडे गेले. चिखलाचा रंग लाल झालेला पाहून तिच्या काळजात धस्स झाले.

बाळ चिखलात मिसळल्याचे लक्षात येताच, तिने जोरात हंबरडा फोडला. ती ओक्साबोक्सी रडू लागली. तिची मर्मभेदक किंकाळी ऐकून गोरोबाची समाधी भंग पावली. ते रागात आले. विठ्ठलाच्या नामस्मरणात अडथळा निर्माण झाल्याने गोरोबा आळ्यातून बाहेर आले आणि हातातल्या चिपळ्या संतीच्या अंगावर फेकणार अशा अवस्थेत धावत गेले.

आता गोरोबा आपल्याला मारणार हे लक्षात येताच संती म्हणाली,
“तुम्हाला विठ्ठलाची आन आहे, जर तुम्ही माझ्या अंगाला हात लावलात
तर?”

संतीने विठ्ठलाची शपथ घालताच उगारलेले हात हवेतच थांबले.गोरोबाचे लक्ष चिखलाकडे गेले. त्यांना त्यांची चूक लक्षात आली. विठ्ठलाच्या नादात आपण बाळ गमावल्याचे कळले. ते खूपच अस्वस्थ झाले. ‘मी पोर तुडविले… मी पोर तुडविले… गोरोबा स्वतःशीच बोलू लागले.

ते देवाला म्हणू लागले. ‘देवा… असे निर्दयी काम माझ्या हातून का करवून घेतलंस…
देवा पांडुरंगा… घरातलं रांगतं पोर घेऊन का गेलास? विठ्ठला… माझ्या भक्तिचा हाच तुझा प्रसाद का?”
गोरोबाचा पूर्ण विश्वास देवावर होता. ते विठ्ठलवेडे होते. काही झाले तरी मार्ग दाखवणारा विठ्ठलच आहे, अशी त्यांची धारणा होती.

संतीने विठ्ठलाची आन घातल्यामुळे ते संसारातून विरक्त बनले. ते पुन्हा विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले. विठ्ठलास सर्वेसर्वा मानून त्यातच रमू लागले.

आता माझी लाज राखे पंढरीनाथा।
तुजवीण अनंता आणिक नाही।।
अनाथाचा नाथ दीनांचा कैवारी।

पाव झडकरी आपल्या दासा।।

गोरोबा डोळे मिटून विठ्ठलासमोर उभे राहिले आणि आपले दुःख मोकळे केले.कीर्तन संपले. सर्वांनी एकदाच विठ्ठलनामाचा गजर केला. सर्व भक्तमंडळी उत्साहाने ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत होती. हात उंचावून टाळ्या वाजवत होती.

ज्ञानेश्वरांचे लक्ष गोरोबांकडे गेले. त्यांचे दुःख ज्ञानेश्वरांना कळत होते. संती रामीला वाईट वाटत होते. प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होते. देव हा भक्ताचा पाठीराखा असतो. प्रसंगी त्याच्या मदतीला धावून जातो आणि दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढतो.
आता विठ्ठलच गोरोबाच्या मदतीला धावून आले. गोरोबांची अडचण त्यांच्या लक्षात आली. ते प्रसन्न झाले आणि पाहता पाहता गोरोबांच्या
हातात चैतन्य सळसळले.

‘हातांना बोटे फुटली’ हात पूर्ववत झाले. गोरोबांची भक्ती सार्थकी लागली. ते जोरजोराने टाळ्या वाजवू लागले. विठ्ठल नामाचा गजर करू लागले. नाचू लागले. गोरोबांना विठ्ठलाने हात दिले. त्यांना हात फुटल्याची बातमी सर्वत्र कळली. गोरोबांना फुटलेले हात पाहण्यासाठी सारे पंढरपूर गोळा झाले. त्यांच्या मदतीला प्रत्यक्ष विठ्ठलच धावून आला, याची खात्री सर्वांना पटली.

गोरोबा संत आहेत, श्रेष्ठ भक्त आहेत. सारी भक्तमंडळी त्यांच्याकडे आदराने पाहू लागली. गुरुस्थानी मानू लागली.. गोरोबांची भक्ती फळाला आली होती. संती मात्र अस्वस्थ होती. ती
बाळाची भुकेली होती. तिने मनोभावे विठ्ठलाची मूर्ती डोळ्यापुढे उभी करून प्रार्थना केली. ती विठ्ठलाला म्हणाली, “मी तुझ्या भक्ताची बायको आहे.गोरोबा तुझ्याच तंद्रीत असताना माझा बाळ गेला. माझा बाळ मला परत दे… तू तर सर्वांची माऊली आहेस. संतीची भक्ती खरीच होती.

संसारात नाना विघ्न आली असतानाही ती विठ्ठलाच्या नादी लागली. विठ्ठलाला शरण गेली. तिच्या समर्पणाची नोंद विठ्ठलाने घेतली आणि तिचा बाळ तिच्या हवाली केला. चार-पाच वर्षांनंतर बाळ तिला परत मिळाला होता, रामीने हे दृश्य पाहिले. सर्वांना आनंद झाला. सारी विठ्ठलाची कृपा समजून सर्वांनी विठ्ठलास दंडवत घातले.

हि माहिती अवडल्यास जरूर शेअर करा

Check Also

Sant Tukaram

Sant Tukaram

संंत तुकाराम Sant Tukaram  संत तुकाराम( तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध …

Leave a Reply