Sant Kabir

Sant Kabir

Sant Kabir

संत कबीर

Sant Kabir 

भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता, याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप विठ्ठलाची लेकरे आहेत.संत रविदास कबिरांना मोठा भाऊ मानत असत.[संदर्भ हवा ]

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते.

भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.

कबीरांविषयी मराठीतील पुस्तके

 • आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर (संजय एस. बर्वे)
 • कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
 • कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
 • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
 • कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ, प्रा. रतनलाल सोनग्रा)
 • कबीरवाणी (संत कबीरांच्या दोह्यांचा अर्थ, डॉ. नलिनी हर्षे)
 • कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे ( स.ह. जोशी; गजानन बुक डेपो प्रकाशन)
 • कबीरायन (कादंबरी, डॉ. भारती सुदामे)
 • कहत कबीर (डॉ. मोहन विष्णू खडसे)
 • कहत कबीर (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक २-११-२०१५)
 • कहै कबीर दीवाना (ओशो)
 • कहै कबीर मैं पूरा पाया (ओशो)
 • भक्त कबीराच्या गोष्टी (शंकर पां. गुणाजी)
 • भक्तीत भिजला कबीर (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – भारती पांडे)
 • भारतीय परंपरा आणि कबीर (पद्मजाराजे पटवर्धन)
 • भारतीय साहित्याचे निर्माते – कबीर (प्रभाकर माचवे)
 • माझे माझ्यापाशी काही नाही (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – भारती पांडे)
 • मृत्यु अमृताचे द्वार (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – मीना टाकळकर)
 • म्हणे कबीर दिवाणा (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – भारती पांडे)
 • संत कबीर (मूळ लेखक प्रेमचंद ‘महेश’, मराठी अनुवाद – विद्याधर सदावर्ते)
 • संत कबीर – एक दृष्टा समाजसुधारक (डाॅ. मानसी विजय लाटकर)
 • संत कबीर यांची अमृतवाणी (गजानन बुक डेपो प्रकाशन)

संदर्भ

उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणजे संत कबीर . संत कबीर यांच्या जन्म वर्षाबद्दल विवाद आहेत. कोणी ते इ.स. १३७० मध्ये तर कोणी १३७८ मध्ये जन्मले असे म्हणतात.

त्यांच्या जन्माविषयी परंपरागत कथा सांगितली जाते ती अशी –

ज्येष्ठ पौर्णिमेस एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्मला पण उजळ माथ्याने त्याचे पालनपोषण करणे शक्य नाही म्हणून तिने काशीतील एका सरोवराच्या ( लहरतारा ) काठी त्याला टाकून दिले. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एका मुस्लिम जोडप्याला तो सापडतो.  त्या मुस्लिम जोडप्यांचे नाव निरू व निमा असते. त्यांनी त्या मुलाचे चांगले पालनपोषण केले आणि पुढे हाच मुलगा कबीर या नावाने प्रसिद्ध झाला.

कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्या बद्दलची कोणतीही ठाम महिती नाही पण असे म्हणतात कि त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा  आणि कमाली नावाची एक मुलगी होती.

कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिला पण त्यांचा मृत्यू काशीत नसून मगहर येथे झाला, हे स्वतःच त्यांनी सांगितले आहे.

“सकल जनम शिवपुरी गंवाया।

मरती बार मगहर उठि आया।”

त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते. मगहर मध्येच मुस्लिम प्रथेनुसार त्यांचे दफन झाले असावे.

Check Also

Sant Narhari Sonar

Sant Narhari Sonar

संत नरहरी सोनार Sant Narhari Sonar  संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच …

Leave a Reply