{चरित्र} संत तुकाराम महाराज माहिती मराठी | Sant tukaram information in marathi

Sant tukaram information in marathi: संत तुकाराम महाराष्ट्रात झालेले सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध कवी व संत होते. पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. संत तुकाराम त्यांचे अभंग आणि भक्ती कवितांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. तुकरामांनी ईश्वराची भक्ती करीत अनेक गीते लिहिली आहेत.

आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी संत तुकाराम यांची मराठी माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

 संत तुकाराम महाराज माहिती मराठी Sant tukaram information in marathi

Sant Tukaram Information in Marathi

जन्म व बालपण

संत तुकाराम यांचा जन्म इ. स. 1520 ते इ. स.1609 या दरम्यान माघ शुद्ध वसंत पंचमीला महाराष्ट्रातील पुणे जिल्हात असलेल्या देहू गावात झाला.

संत तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते. त्यांचे आराध्यदैवत पंढरपूरचे विठोबा किंवा विठ्ठल हे होते.

तुकोबा हे आपल्या कुटुंबात तीन भावंडा मध्ये मधले होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव सावजी व धाकट्या भावाचे नाव कान्होबा होते.

मोठा भाऊ सावजी याने विरक्तीमुळे घर सोडले. ज्यामुळे घराची सर्व जवाबदारी तुकोबांवर आली होती. 17-18 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील मरण पावले.

विठ्ठलाची प्राप्ती

संत तुकारामांना प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. आई वडील गेले, मोठ्या भावाची बाई गेली, तुकोबांची पाहिली पत्नी रखमाबाईही गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात. सावजी प्रमाणे घर सोडून निघून जातात किंवा कंटाळून देहत्याग करतात. परंतु तुकोबांनी असे काही केले नाही.

दुष्काळामुळे गुरेढोरे गेली, सर्व काही बुडाले मन उदास झाले. परंतु अशा परिस्थितीतही तुकोबांची विठ्ठलावरची परमभक्ती कायम राहिली.

संत तुकारामांनी देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर भगवान विठ्ठलाची उपासना सुरू केली.

ध्यान, तप व सत्याचा शोध घेत असताना त्यांना आत्मसाक्षात्काराची प्राप्ती झाली. तेथेच परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठल यांनी त्यांना दर्शन दिले.

तुकारामांचा परंपरागत व्यवसाय सावकारीचा होता. परंतु दुष्काळ पडल्याने त्यांनी सर्वांची सावकारी माफ केली.

सर्व गमिनीच्या गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून, प्रवचन आणि कीर्तने करून लोकांना ईश्वराविषयी ज्ञान देणे सुरू केले.

संत तुकाराम आणि शिवाजी महाराज यांची गोष्ट

संत तुकारामांच्या जीवनाशी संबंधित एक गोष्ट सांगण्यात येते, महाराष्ट्रात असताना एकदा शिवाजी महाराजांनी त्यांना बहुमूल्य वस्तू भेट म्हणून पाठवल्या.

या वस्तूंमध्ये हिरे-मोती, सुवर्ण आणि सुंदर वस्त्रांचा समावेश होता. परंतु संत तुकारामांनी एकही वस्तू स्वीकार न करता सर्व वस्तू परत पाठविल्या आणि सांगितले, ” हे राजे! या सर्व गोष्टी माझ्यासाठी व्यर्थ आहेत. माझ्यासाठी सोने आणि माती मध्ये काहीही फरक नाही. कारण जेव्हापासून विठ्ठलाने मला दर्शन दिले तेव्हापासून मी तीनही लोकांचा स्वामी बनलो आहे. म्हणून हे सर्व व्यर्थ समान मी परत पाठवीत आहे.

यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतः येऊन या महान संतांचे दर्शन घेतले होते.

एका साक्षात्कारी आत्म्याला कोणताही भोग विलास आणि लालसा नसते. हे तुकारामांच्या या गोष्टीवरून सिद्ध होते.

आपल्या जीवन काळात संत तुकारामांनी अनेक अभंग, कविता व प्रवचने लिहीली. जी आजही मानव जातीसाठी उपयुक्त आहेत.

संत तुकारामांचा मृत्यू

17 वर्षापेक्षा जास्त काळ लोकांना उपदेश करून सन 1649 ते 1650 दरम्यान संत तुकाराम यांचे निधन झाले.

या शिवाय काही विद्वानांचे मानणे आहे की फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून नाही ओळखला जातो. या दिवशी तुकोबा पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले.

संत तुकाराम हे संसारी असूनही त्यांनी आपले आयुष्य परमार्थाकडे वळवले. आपल्या अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला दिली. जाती धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगत असतानाही अध्यात्म, भागवत भक्ती आणि उपदेशाची कास सोडली नाही.

आशा करतो की संत तुकाराम यांचे जीवन चरित्र (sant tukaram biography marathi) तुम्हाला आवडले असेल. मित्रांसोबत शेअर नक्की करा.

READ MORE:

साईबाबा जीवन चरित्र
स्वामी विवेकानंद जीवन चरित्र
संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र
संत कबीर यांची माहिती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *