Asha Transcription

School Gathering Essay In Marathi

आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन

शाळेतील स्नेहसंमेलन म्हपाने आम्ही विदयाध्यांसाठी मोठी धमाल असते. त्या काळात विद्यार्थ्यांसाठी कडक नियम नसतात. घंटा, तास, अभ्यास, गृहपाठ,
गणवेश या सर्वांना त्या काळात सुट्टी असते. त्यामुळे शाळेत जायला खूप मजा वाटते.

स्नेहसंमेलनाची सुरवात होते ती विविध स्पर्धांनी. खेळांच्या स्पर्धाच्या वेळी संपूर्ण मैदान रंगीबेरंगी कपड्यांनी खुलून दिसते. मैदानावर उत्साह नुसता ओसंडत असतो. प्रत्येक स्पर्धेत मोठी चुरस असते.

विद्यार्थी व शिक्षक यांचा क्रिकेटचा सामना रंगतो. विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांच्यात खो-खोचा सामना खेळाला जातो. रस्सीखेच, मडके फोडणे, केरम, संगीत खुर्ची,लिंबू चमचा,रांगोळी, निबंध-स्पर्धा अशा गंमतीदार स्पर्धा होतात.

नंतर रंगमंचावरचे कार्यक्रम सुरू होतात. लहान मुले आपले कार्यक्रम रंगून करतात. विद्यर्थ्यांचा सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे ‘वाद्यवृंद’! त्यात
वेगवेगळ्या गाण्यांच्या फार्मयशी होतात. सर्व शिक्षक शिक्षिकाही त्यात सहभागी होतात. गेल्यावर्षांच्या स्नेहसंमेलनात मुख्याध्यापकांनी पेटी वाजवून नाट्यगीते म्हटली होती.

स्नेहसंमेलनातील फिशपोंडचा कार्यक्रमही खूप रंगतो. शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन स्नेहसंमेलन संपते. पण याच्या आठवणी मागे खूप रेंगाळतात. अशा कार्यक्रमांमुळे विदयार्थी-शिक्षक यांच्यात प्रेम निर्माग होते. अनेक विदायांतील सुप्त गुण समजतात. आनंद लुटल्यामुळे पुन्हा अभ्यास करण्यास उत्साह वाटू लागतो..

Asha Transcription

About admin

Check Also

Indian Republic Day Essay

प्रजासत्ताक दिन निबंध आमची मातृभूमी भारत बर्‍याच वर्षांपासून ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलाम होती, त्या काळात भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published.