School Leaving Application Letter

शाळेत रजेसाठी विनंती पन्न

शर्वरी जोशी
अशोक नगर भाग्यनागर रोड
नांदेड महाराष्ट्र.
दि. ११ जानेवारी,२०१९

प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
श्री शिवाजी विद्यालय, नांदेड

आदरणीय गुरुवर्य,
मी आपल्या शाळेत ७ वी अ वर्गात शिकत आहे. दि.१८ जानेवारी २०१९ रोजी माझ्या मोठ्या भावाचे लग्न आहे. लग्न औरंगाबाद येथे आहे. या लग्नासाठी
आम्ही घरांतील सर्वजण जाणार आहोत. म्हणून मी १६ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यत शाळेत उपस्थित राहू शकणार नाही. या रजा काळातील बुडालेला माझा अभ्यास मी माझ्या मैत्रिणींच्या साहाय्याने पूर्ण करीन. मी अभ्यासात मागे पडणार नाही अशी मी खात्री देते. तरी कृपया मला रजा द्यावी, ही नम्र विनंती

आपली नम्र
र.मा.जोशी
(इ.७ वी तुकडी अ)

Check Also

new year wishing letter marathi

नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र

दिनांक १५.१२.२०१८ २०४, प्रिंस हाउस, मुंबई आदरणीय काका, सप्रेम नमस्कार, तुम्हाला नव वर्षाच्या खुप खुप …

One comment

  1. Instantly got letter for my daughter

Leave a Reply