Shreeram Lagu

Shreeram Lagu

Shreeram Lagu

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (shreeram lagu) हे मराठी हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते दिग्दर्शक आहेत. देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.

जन्म डॉ.श्रीराम लागू
नोव्हेंबर १६ १९२७
सातारा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ १९७२-पासून
भाषा मराठी
हिंदी
प्रमुख नाटके नटसम्राट
सूर्य पाहिलेला माणूस
मित्र
प्रमुख चित्रपट सामना
पिंजरा
सिंहासन
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार१९७८, संगीत नाटक अकादमी फेलोशिप२०१०
वडील डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
आई सत्यभामा लागू

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.

१९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि

टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबईयांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकरलिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.

श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते. नंतर ‘देवाला रिटायर करा’ नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.

ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

चित्रपट

 • अगर… इफ (१९७७)
 • अग्निपरीक्षा (१९८१)
 • अनकही (१९८५)
 • अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
 • आखरी मुजरा (१९८१)
 • आज का ये घर (१९७६)
 • आतंक (१९९६)
 • आपली माणसं (मराठी)
 • आवाम (१९८७)
 • इक दिन अचानक (१९८९)
 • इनकार (१९७७)
 • इमॅक्युलेट कन्सेप्शन
 • इंसाफ़ का तराजू (१९८०)
 • ईमान धर्म (१९७७)
 • एक पल (१९८६)
 • औरत तेरी यही कहानी (१९९२)
 • करंट (१९९२)
 • कलाकार (१९८३)
 • कामचोर (१९८२)
 • Common man (१९९७) (टी.व्ही.)
 • काला धंदा गोरे लोग (१९८६)
 • काला बाज़ार (१९८९)
 • कॉलेज गर्ल (१९७८)
 • किताब (१९७७)
 • किनारा (१९७७)
 • किशन कन्हैया (१९९० )
 • खानदान (१९८५) (टी.व्ही.मालिका)
 • खुद्दार (१९९४)
 • गजब (१९८२)
 • गलियों का बादशाह (१९८९)
 • गहराई (१९८०)
 • गाँधी (१९८२)
 • गुपचुप गुपचुप (१९८३)
 • गोपाल (१९९४)
 • घरद्वार (१९८५)
 • घर संसार (१९८६)
 • घरोंदा (१९७७)
 • घुँघरूकी आवाज़ (१९८१)
 • चटपटी (१९८३)
 • चलते चलते (१९७६)
 • चिमणरांव गुंड्याभाऊ (मराठी)
 • चेहरे पे चेहरा (१९८१)
 • चोरनी (१९८२)
 • ज़माने को दिखाना है (१९८१)
 • जीवा (१९८६)
 • जुर्माना (१९७९)
 • ज्योति बने ज्वाला (१९८०)
 • ज्वालामुखी (१९८०)
 • झाकोळ (१९८०)
 • तमाचा (१९८८)
 • तरंग (१९८४)
 • तराना (१९७९)
 • तौहेँ (१९८९)
 • थोडीसी बेवफाई (१९८०)
 • दाना पानी (१९८९)
 • दामाद (१९७८)
 • दिलवाला (१९८६)
 • दिल ही दिल में (१९८२)
 • दीदार-ए-यार (१९८२)
 • दुश्मन देवता (१९९१)
 • दूरीयाँ (१९७९)
 • देस परदेस (१९७८)
 • देवता (१९७८)
 • दो और दो पाँच (१९८०)
 • दौलत (१९८२)
 • ध्यासपर्व -मराठी(२००१)
 • नया दौर (१९७८)
 • नसीबवाला (१९९२)
 • नामुमकीन (१९८८)
 • ‘नीयत (१९८०)
 • पिंजरा (१९७२/I)
 • पिंजरा (१९७२/II)
 • पुकार (१९८३)
 • पोंगा पंडित (१९७५)
 • प्यार का तराना (१९९३)
 • प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
 • फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
 • फूलवती (१९९१)
 • बडी बहन (१९९३)
 • बद और बदनाम (१९८४)
 • बिन माँ के बच्चे (१९८०)
 • बुलेट (१९७६)
 • भिंगरी (मराठी)
 • मकसद (१९८४)
 • मगरूर (१९७९)
 • मंज़िल (१९७९)
 • मर्द की ज़बान (१९८७)
 • मवाली (१९८३)
 • माया (१९९२/I)
 • मीरा (१९७९)
 • मुकद्दर का सिकंदर (१९७८)
 • मुक्ता (१९९४)
 • मुकाबला (१९७९)
 • मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
 • मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
 • मेरा रक्षक (१९७८)
 • मेरी अदालत (१९८४)
 • मेरे साथ चल (१९७४)
 • मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
 • रास्ते प्यार के (१९८२)
 • लव मैरिज (१९८४)
 • लावारिस (१९८१)
 • लॉकेट (१९८६)
 • लूटमार (१९८०)
 • शंकर हुसेन (१९७७)
 • शालीमार (१९७८)
 • शेर शिवाजी (१९८७)
 • श्रीमान श्रीमती (१९८२)
 • सदमा (१९८३)
 • संध्याछाया (१९९५) (टी.व्ही.)
 • सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
 • समय की धारा (१९८६)
 • सम्राट (१९८२)
 • सरगम (१९७९)
 • सरफ़रोश (१९८५)
 • सरफिरा (१९९२)
 • सवेरे वाली गाड़ी (१९८६)
 • साजन बिना सुहागन (१९७८)
 • सामना -मराठी (१९७४)
 • सितमगर (१९८५)
 • सिंहासन -मराठी(१९८०)
 • सुगंधी कट्टा(मराठी)
 • सौंतन (१९८३)
 • स्वयंवर -मराठी(१९८०)
 • हम तेरे आशिक हैं (१९७९)
 • हम नौजवान (१९८५)
 • हम से है ज़माना (१९८३)
 • हाहाकार (१९९६)
 • हेराफेरी (१९७६)
 • होली (१९८४)
 • फिल्मफेअर पुरस्कार – १९७८ – ‘मुख्य सहायक अभिनेता’ घरोंदा (हिंदी)
 • १९९७, कालिदास सन्मान
 • २००६, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.
 • २०१०, संगीत नाटक अकादमी फेलोशिप
 • २०१२, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार

Check Also

Upendra Limaye

Upendra Limaye Marathi Actor उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ – हयात) हे मराठी चित्रपट, …

Leave a Reply