सूर्य : हा सूर्यमालेचा प्रमुख आहे. हा तेजस्वी तारा आहे.
सूर्य अतितप्त वायंनी बनलेला आहे. सूर्यमालेतील सर्व घटकांना
सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या
दृष्टीने सूर्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
ग्रह : बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि
नेपच्यून अशी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहेत. हे ग्रह
साधारणपणे गोलाकार आहेत. ते स्वत:च्या विशिष्ट कक्षेतून
सूर्याभोवती परिभ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा
विशिष्ट कालावधी असतो.
उपग्रह : काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता
विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहांचे उपग्रह
म्हणतात. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा
करतात.
लघुग्रह : सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान
असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे.
या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील
सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. ।
बटुग्रह : नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा
घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत. त्यांना बटुग्रह।
म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लूटोसारख्या खगोलांचा समावेश होतो.
धूमकेतू : धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी व धूलिकणांनी
बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे
वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले
जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसार्यासारखे दिसतात.
धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात; त्यांच्या दीर्घ
लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व ब-याच काळानंतर आकाशात दिसतात.
उल्का : आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंडअसतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाच्या
घर्षणाने जळतात, त्यांना उल्का असे म्हणतात. काही वेळेस
उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना
अशनी असे म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच
अशनी आघाताने तयार झाले आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर
खगोलांवरदेखील उल्कापात होतात.
ग्रहांचे वर्गीकरण : लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे
पुढील दोन वर्ग केले आहेत. (१) अंतर्ग्रह (२) बहिर्ग्रह.
(१) अंतर्ग्रह : सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या
दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे.
त्यांचे कवच खडकांचे बनले आहे.
(२) बहिग्रह : लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना
। बहिग्रह म्हणतात. यांत गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून याचा समावेश होतो. या सर्व बहिर्ग्रहाभोवती असंख्य खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहेत. या ग्रहांचे आकारमान मोठे
आहे. त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे.
ग्रहांची वैशिष्ट्य : बुध हा सूर्यापासून सर्वात जवळ
असलेला ग्रह आहे. सर्व ग्रहात बुध हा आकारमानाने लहान
आहे. शुक्र हा आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे.
पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात,
पण शुक्र मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, त्यामुळे शुक्रावर सूर्य
पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळताना दिसेल. आपण ज्या ग्रहावर
राहतो त्याला पृथ्वी असे नाव आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीस पोषक
वातावरण व जलाचे अस्तित्व आहे. त्यामुळे या ग्रहावर सजीव
सष्टी आहे. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह म्हणजे मंगळ, हो ।
ग्रह त्याच्या लालसर रंगामुळे आकाशात सहज ओळखता येतो
गुरू हा सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे
गुरूनंतर आकारमानाने शनी हा दुस-या क्रमांकाचा ग्रह आहे. या
ग्रहाभोवती तीन कडी आहेत. ही कड़ी आपल्याला दुर्बिणीतन
दिसू शकतात. युरेनस हा ग्रह सूर्यापासून दूर आहे. याचा रंग
हिरवट निळा आहे. नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दर आहे ।
हा निळ्या रंगाचा ग्रह आहे.
आकाशगंगा : आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर
काही तान्यांभोवतीही त्यांच्या ग्रहमालिका आहेत. असंख्य तारे
व त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात.
आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा
म्हणतात. निरभ्र काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करताना
आपल्याला आकाशगंगेचा अंधुक, पांढुरका पट्टा पाहता येतो.
कृत्रिम उपग्रह व अवकाशयाने : सूर्यमाला, दीर्घिका
| इत्यादींची माहिती आपणांस आकाश निरीक्षण करून मिळवता
येते. जास्त सखोल माहिती हबलसारख्या दुर्बिणी, अवकाशात
| सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने इत्यादींच्या सहाय्याने
आपण मिळवतो. या सर्वांच्या साहाय्याने खगोलशास्त्रात नित्य
नव्या माहितीची भर पडत आहे. मंगळ व शुक्र या ग्रहाचा
अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अवकाशयाने पाठवली गेली
आहेत. चंद्रासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी भारताः
चंद्रावर २००८ साली चांद्रयान पाठवले होते.