[चरित्र] स्वामी विवेकानंद मराठी माहिती | swami Vivekananda information Marathi

आपल्या देशातील महान संत व समाज सुधारक स्वामी विवेकानंद, यांनी आपल्या लहानश्या जीवन काळात फक्त देशातच नव्हे तर देशाबाहेरही प्रसिद्धी प्राप्त केली. आजच्या या लेखात आपण स्वामी विवेकानंद यांची मराठी माहिती प्राप्त करणार आहोत. हि swami Vivekananda Marathi information तुम्हाला फार उपयुक्त ठरेल. तर चला सुरू करूया.

स्वामी विवेकानंदांचे विचार वाचा येथे

swami vivekananda yanchi mahiti

Swami Vivekananda information in Marathi

जन्म व प्रारंभिक जीवन

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी 6:35 च्या सुमारास कोलकत्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे जन्म नाव नरेंद्रनाथ होते. नरेंद्र यांची बुद्धी लहान पणापासून तीव्र होती. ते आपला अधिकांश वेळ परमेश्वराचे ध्यान करण्यात घालवत असत.

त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे एक प्रसिद्ध वकील होते. व ते भारतीय पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित होते. त्यांची इच्छा होती की नरेंद्र यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे. याउलट नरेंद्रनाथांच्या आई श्रीमती भुवनेश्वरी देवी या एक धार्मिक विचारांच्या स्त्री होत्या. त्या भगवान शंकराच्या भक्त होत्या व आपला जास्तीतजास्त वेळ त्या परमेश्वराच्या भक्तीत लावीत असत. नरेंद्रनाथांना आपल्या आईकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. धार्मिक ग्रंथ, महाभारत, रामायण या सारख्या अनेक धार्मिक गोष्टी त्या त्यांना सांगत असत.

स्वामी विवेकानंदांचे शिक्षण

जगातील अन्य आई वडिलांप्रमाणेच नरेंद्रनाथांचे आईवडिलही त्यांना शिकवून काहीतर मोठे बनवण्याचे स्वप्न पाहत असत. आठ वर्षाच्या वयात त्यांचा प्रवेश ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मेट्रोपोलिटिअन इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आला. सन 1877 पर्यंत त्यांनी येथे शिक्षण प्राप्त केले. 1877 नंतर 1879 पर्यंत त्यांचे कुटुंब रायपूर मध्ये वास्तव्यास राहिले.

सन 1879 मध्ये पुन्हा कलकत्ता आल्यावर नरेंद्रनाथांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि कलकत्ता केस प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. याच्या एका वर्षानंतर त्यांनी कलकत्त्यातील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि फिलोसोफी वाचणे सुरु केले. येथे त्यांनी पश्चिमेकडील तर्क फिलॉसॉफी आणि युरोपीय देशांच्या इतिहासाविषयी माहिती प्राप्त केली.

नरेंद्र अनेक विषय शिकत असत, परंतु या सर्वांमध्ये त्यांचा आवडता विषय तत्त्वज्ञान हा होता. या शिवाय हिंदू धर्मातील वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण-महाभारत इत्यादींमध्ये त्यांची विशेष आवड होती. 1884 साली बी ए ची डिग्री प्राप्त केली. वाढत्या वयासोबत परमेश्वरा विषयी असणारे त्यांचे कुतूहल वाढत गेले. त्यांच्या मनात ईश्वराचे अस्तित्व आहे? की नाही? इत्यादी प्रश्न उठू लागले.

Vivekananda yanchi Marathi Mahiti

स्वामी विवेकानंद व श्रीरामकृष्णाची भेट

ईश्वराच्या अस्तित्वाविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी नरेंद्र नाथांना त्यांच्या एका नातेवाईकाने श्रीरामकृष्णाची भेट घेण्यास सांगितले. श्रीरामकृष्णाच्या प्रथम भेटीत आपल्या सवयी नुसार त्यांनी प्रश्न केला की “तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का”? नरेंद्र यांच्या या प्रश्नावर श्री रामकृष्णांनी सांगितले त्यांनी परमेश्वर पाहिला आहे व जर नरेंद्रांची इच्छा असेल तर ते त्यांनाही परमेश्वर दर्शन घडवू शकतात.

नरेंद्रांनी प्रथमच श्रीरामकृष्णा सारखे व्यक्ती पाहिले होते. श्रीरामकृष्णांनी स्वताला जिंकले होते. त्यांनी नरेंद्रांमध्ये अध्यात्मिकता जागृत केली व नरेंद्रांनी त्यांना आपले गुरू म्हणून स्वीकार केले. काही काळानंतर 1886 साली श्रीरामकृष्णाचे घश्याच्या रोगाने निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी नरेंद्रांना आपले उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

स्वामी विवेकानंद यांची यात्रा

गुरूंच्या मृत्यू नंतर सन 1890 साली नरेंद्र यांनी संन्यास धारण करून भारत भ्रमण सुरू केले. आपल्या पायदळ यात्रेदरम्यान त्यांनी अयोध्या, वाराणसी, आग्रा, वृंदावन, अल्वर अश्या अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली. या प्रवासा दरम्यान त्यांची भेट माउंट अबू चे राजा अजित सिंह यांचाशी झाली. अजित सिंह नरेंद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले व त्यांनी त्यांचे नाव ‘स्वामी विवेकानंद’ ठेवले.

24 डिसेंबर 1892 ला ते भारतभ्रमण करून कन्याकुमारी ला पोहचले. या ठिकाणी त्यांनी तीन दिवस गहन समाधीत ध्यान केले.

स्वामी विवेकानंद आणि विश्व धर्म परिषद

सन 1893 साली अमेरिकेतील शिकागो मध्ये विश्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. या काळात स्वामीजी मद्रास मध्ये होते. तेथील काही तरुणांनी पैसे गोळा करून स्वामीजींना या परिषदेत जाऊन सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करण्याचा सल्ला दिला. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला पोहचले तेव्हा त्यांच्या वेशभूषेची खिल्ली उडवण्यात आली.

परंतु जसेही विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली तसा संपूर्ण हॉल टाळ्यांचा आवाजाने गुंजला. कारण विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या अमेरिकेतील भाऊ बहिनीनो अश्या पद्धतीने केली होती. यानंतर तेथील सर्व लोक त्यांच्या भाषणामुळे भारावून गेले.

स्वामी विवेकानंदांचा मृत्यू

4 जुलै 1902 ला आपल्या मृत्यूच्या दिवशी ते सकाळी लवकर उठले. आपल्या बेलूरच्या मठात गेले. तेथे त्यांनी 3 तास ध्यान व आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या खोलीत जाऊन महासमाधी धारण केली. रात्री 09:10 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

स्वामी विवेकानंद माहिती PDF Download

स्वामी विवेकानंदांची मराठी माहिती पीडीएफ च्या रूपात मिळण्यासाठी पुढील डाउनलोड बटणावर क्लिक करा:

तर मित्रांनो ही होती swami vivekananda marathi mahiti आशा करतो की ही swami vivekananda information in marathi तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. व स्वामी विवेकानंद यांची माहिती आपल्या मित्रांसोबतही शेअर करा धन्यवाद..

READ MORE:

डॉ एपीजे अब्दुल कलाम जीवन चरित्र
सर आयझॅक न्यूटन यांचे जीवन चरित्र
महात्मा गांधी मराठी माहिती

Related Posts

3 thoughts on “[चरित्र] स्वामी विवेकानंद मराठी माहिती | swami Vivekananda information Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *