Swapnil Joshi

Swapnil Joshi

स्वप्नील जोशी (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; मुंबई, महाराष्ट्र– हयात) हा मराठी चित्रपट-अभिनेता आहे. याने हिंदी मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.

जन्म स्वप्नील जोशी
१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट चेकमेट (चित्रपट), टार्गेट, मुंबई-पुणे-मुंबई
पत्नी अपर्णा
(इ.स. २००५ – इ.स. २००९ घटस्फोटित)

  • लीना

Swapnil Joshi स्वप्नील जोशी याचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी आपले शिक्षण बीजेपीसी या मुंबई-गिरगावातील शाळेतून, व नंतरचे शिक्षण सिडनहॅम काॅमर्स काॅलेजातून केले. स्वप्नीलने २००५ साली अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, पण ते अयशस्वी ठरले. त्याने १६ डिसेंबर २०११ रोजी औरंगाबादमधल्या ताज हॉटेलमधील लीना आराध्येशी दुसरे लग्न केले. तीसुद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.
वयाच्या नवव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात छोट्या रामपुत्र कुशची भूमिका साकारली. तेथूनच स्वप्नीलची अभिनयाची कारकीर्द सुरू केली.

चित्रपट

Check Also

Upendra Limaye

Upendra Limaye Marathi Actor उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ – हयात) हे मराठी चित्रपट, …

Leave a Reply