Tag: भाषण

वाड्याचे आत्मवृत्त

वाड्याचे आत्मवृत्त

माझे शनिवार पेठेतील काका नविन जागी स्थलांतरीत होणार आहेत कारण त्यांच्या जुन्या वाड्याच्या जागी तो पाडुन नविन मोठ्ठी इमारत उभी रहाणार आहे. म्हणुन शेवटचं म्हणुन एकदा आम्ही काल त्यांच्याकडे गेलो होतो. हा वाडा खुप जुना म्हणजे अगदी शंभर एक वर्षापुर्वीचा तरी असेल.

लहानपणी जेंव्हा जेंव्हा मी काकाकडे रहायला यायचो तेंव्हा इथे खेळायला खुप मज्जा यायची. वाड्यात सहज एक फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. वाडा पडका झाला असला तरी जुन्या संस्कृतीच्या खुणा अजुनही दिसत होत्या. काहि दिवसांनी हा वाडा पडणार, काय चाललं असेल या वाड्याच्या मनात?

मी विचार करायचा आवकाश आणि काय आश्चर्य मला वाड्याचे आत्मवृत्त चक्क ऐकु येऊ लागले.

काही दिवसांनी माझी मोडतोड सुरु होणार. मोठ्ठ मोठ्ठी यंत्र, असंख्य माणसं दिवस-रात्र माझ्या शरीरावर जखमा करणार, माझ्या एकेकाळच्या दिमाखदार अस्तीत्वाला खिंडार पाडणार आणि त्याला पडलेल्या भगदाडातुन वर्षानुवर्ष जपलेली संस्कृती, जुन्या आठवणी, इतिहासाच्या खुणा भळभळणाऱ्या त्या जखमांतुन वाहुन जाणार. एकेकाळी वाडे हे वैभव होते. ते वैभव आता लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. कधीकाळी माझ्या या अजस्त्र विस्तारामध्ये नाही म्हणलं तरी सुमारे ६०/७० भाडेकरू किमान शंभर वर्षे ही वाडा-संस्कृती अनुभवत होते, जगत होते. वाडय़ातील ही बिऱ्हाडे केवळ वेगवेगळ्या खोल्यांत राहायची इतकेच वेगळेपण. बाकी सारा वाडा हे खरोखरच एक कुटुंब होते. प्रत्येका घरची सणं, वाढदिवस, आनंदाचे क्षण हे त्या घराचे नसुन पुर्ण वाड्याचे होते.

कुणाला दुखलं-खुपलं, कुणावर अचानक आजारपण कोसळलं, तर अख्खा वाडा मदतीला जाउन जायचा. लेकरांची आडनावं नुसती वेगवेगळी, नाहीतर कुणाचं दुपारचं जेवण एकाकडे तर संध्याकाळचा चहा दुसरीकडे असायचा. खिरापती, वाडय़ातील हनुमान जयंती, कोजागीरी पोर्णीमा, अंगणातील भेळीचा कार्यक्रम, उन्हाळ्यातील वाळवणे.. अशा कित्ती आठवणी, आणि कित्ती पिढ्यांच्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये तश्याच्या तश्या ताज्या आहेत. गेल्या कित्तेक वर्षांपासुन साजरी होणारी दिवाळी म्हणजे तर खरोखरच मोठ्ठा सण असायचा. साठ-सत्तर घरांवर जेव्हा आकाशदिवे लागत तेव्हाचे दृश्य मी आजही विसरू शकत नाही.

पेशव्यांच्या काळात बांधलो गेलो तेंव्हाचा माझा थाट.. अहाहा.. काय सांगावं. चंदनाची लाकडं, काचेची मोठ्ठाल्ली झुंबर, खिडक्यांवर वा़ऱयाच्या झुळकीने हलणारे मलमली पडदे, रात्रीच्या अंधारात असंख्य पणत्या आणि मेणबत्यांच्या प्रकाशाने उजळुन निघालेले ते अंतरंगाची बात काही औरच होती. पण आज? परिस्थिती आज पडतो का उद्या अशीच आहे. गळकी छपरे, कुजलेल्या, फुगलेल्या भिंती, फरशा तुटलेल्या अशा अवस्थेतील अनेक भाऊबंद पेठांमध्ये दिसुन येतात. वाड्याचे मालकही आजकाल वाड्याच्या डागडुजीवर पैसा खर्च करायला तयार नाहीत. उलट वाडा पाडून नवी इमारत उभारली तर त्यातून मिळणाऱ्या पैश्याचे आकर्षणच सर्वांना आहे. शिवाय सुमारे ५० ते १०० वर्षांपूवीर् बांधलेल्या वाड्यांचे आयुष्यही आता संपत आले आहे. काही वाड्यांवर कितीही पैसा ओतला तरी त्यांचे जतन अवघड आहे. त्यामुळे जीवितहानी वाचवायची असेल आणि भाडेकरूंनी चांगल्या परिस्थिती रहावे, असे वाट असेल तर लवकरात लवकर वाडे पाडणे हेच त्यावर उत्तर आहे असेच आजच्या तरूण पिढीचे मत पडत आहे.

पुढील पिढीला ही संस्कृती समजावी, यासाठी काही वाडे जतन करणे आवश्यक होते. पण त्याला आता उशीर झाला आहे. उत्तरेत अनेक हवेल्या उत्तम रीतीने जतन करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे मात्र या सांस्कृतिक ठेव्याची उपेक्षाच झाली. सामान्यांचेच नव्हे; तर पेशवे काळातील अनेक सरदारांचे सात-सात चौकी देखणे वाडेही दुर्लक्ष केल्याने पडले आहेत. पुर्वीच्या काळी जेंव्हा आम्ही बांधलो गेलो तेंव्हाचे बांधकाम माती आणि लाकडाचे होते. तेव्हा जागा मुबलक होती. पैसा होता आणि लोकसंख्या कमी होती. नंतर मात्र चित्र पालटले. भाडेकरूंची भाडी तेवढीच राहिली आणि देखभालीचा खर्च वाढत गेला. लाकूड आणि मातीच्या बांधकामामुळे एका वाड्याच्या डागडुजीचा खर्च आता लाखात गेला आहे.

काळाच्या ओघात लोकांच्या वर्तनातही फरक पडला. षटकोनी कुटूंबाचे चौकोनी आणि आता त्रिकोणी कुटुंब होत आहे. जमान्याचा वेग वाढला आणि सर्व जण आप-आपल्या व्यापात मन्ग झाली. लोकांना आपली प्रायव्हसी जास्त महत्वाची वाटु लागली आणि यामुळेच वाड्यात रहाणारा भाडेकरु बाहेर पडुन फ्लॅट्स मध्ये विसावला. एकेकाळी सर्वांच्या जिव्हाळ्याचा, एकात्मतेचा, ऐश्वर्याचा प्रतिक समजला जाणारा वाडा वाहत्या काळात ‘आऊटडेटेड’ झाला.

धोकादायक वाड्यांसाठी नवीन योजना राबवण्याचा विचार पालिका करतेच आहे. पण त्याचबरोबर जे वाडे आणखी ५० वषेर् टिकू शकतात, त्यांचे योग्य जतन करण्यासाठीही पालिकेनेच पुढाकार घेतला तर हा ऐतिहासिक ठेवा निश्चितच आकर्षण ठरू शकेल.

वाड्याच्या त्या परिपक्व विचाराने माझ्या मनावर फार मोठा परीणाम केला. एकीकडे त्याला आपल्या पडण्याचे नष्ट होण्याचे दुःख होते, तर दुसरीकडे त्याला त्या मागची कारणं सुध्दा माहीती होती आणि तो चक्क त्याचे समर्थनच करत होता. हे करत असतानाच त्याला दुर्दम्य आशावादही होता की निदान जे वाडे अजुन काही वर्ष आपली मुळे रोवुन राहु शकतात त्याबद्दल हा बदलता मानव नक्कीच काळजी घेईल.

आई-वडीलांची हाक ऐकुन मी बाहेर पडलो. कडेच्या मोकळ्या पटांगणात जेसीबी सारखी मोठ्ठी यंत्र येऊन थांबली होती, आज नाही तर उद्या असंख्य वर्षांची, असंख्य पिढ्यांची, इतिहासाच्या
आठवणी मनामध्ये साठवलेल्या त्या वाड्यावर पहिला वार करण्यासाठी.

मराठी दिन २७ फेब्रुवारी माहिती, निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये

मराठी दिन २७ फेब्रुवारी माहिती, निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये

मराठी माणूस आता जगाच्या काणा कोपऱ्यात पोहचला आहे; कोणी शिक्षणासाठी, व्यवसायासाठी तर कोणी नोकरी साठी. आपली मुले हिंदी, इंग्रजी आणि दुसऱ्या भाषेमधील चित्रपट, कार्यक्रम, वेबिसोडस पाहतात. दुसऱ्या भाषेची पुस्तके, मॅगझीन वाचतात, या सर्वांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. इंग्रजी ला भारतात खूप प्राधान्य दिले जाते, ते काही तसे चुकीचेही नाही, इंग्रजी आता शिक्षणात, व्यवसायात, संसदेमध्ये सुद्धा वापरली जाते. विविध भाषांतून विविध गोष्टी, संस्कृती, प्रथा, साहित्य, इतिहास शिकता येतो. याला विना कारण विरोध करण्यात काहीच अर्थ नाही.

पण, या सर्वात, जागतीकरानाच्या स्पर्धेत आपण आपली मातृभाषा, मराठी विसरता कामा नये. मराठी भाषा हि खूप श्रीमंत भाषा आहे, तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. संतांच्या कीर्तने, भजन, भारुडानी ती सजवली आहे. छत्रपती महाराजांनी आपल्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले.

आपल्या शिक्षित शहरी पिढीला मराठी भाषेची लाज वाटते, ते हिंदी किंवा इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात. त्यांना आपली मराठी भाषेची सुंदरता आणि संपत्ती समजावून द्यावी लागेल. काही राजकीय गट याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतात, ते ही चुकीचे आहे. आपली मराठी भाषा इतकी सामर्थवान आणि प्रेमळ आहे कि ती कोणावर जबरदस्ती थोपण्याची गरज नाही. आपल्याला आपल्या नवीन पिढी मराठी भाषेची सुंदरता दाखवून देण्याची गरज आहे फक्त.

मराठी भाषा दिनाचे महत्व

या जागरूकतेचे काम करते वार्षिक “मराठी भाषा दिन’. जगभरातील मराठी माणसे दर वर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा करतात. महान मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचं जन्मदिसावाच्या निमित्ताने हा दिवस “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी जागतिक मराठी अकादमीने याचा पुढाकार घेतला. या दिवसाला विविध प्रकारे संबोधले जाते, जसे “मायबोली मराठी भाषा दिन”, “मराठी भाषा गौरव दिन”, “जागतिक मराठी राजभाषा दिन ” इत्यादी.

२७ फेब्रुवारी च्या दिवशी महाराष्टात आणि देशभरात व जगभरात जिथे जिथे मराठी माणसे आहेत हा दिवस साजरा केला जातो. विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, कार्यक्रम आयोजित केले जातात.

कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यामधले योगदान

विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ ला पुणे इथे झाला त्यांना त्यांच्या टोपण नावाने जास्त ओळखले जाते. कुसुमाग्रजांनी कवितांसोबत कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमय ही लिहले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होणाऱ्या पाच दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १६ खंडांची कविता, तीन कादंबरी, लघुकथेचे आठ खंड, निबंधांचे सात खंड, १८ नाटकं आणि सहा एकांकिका लिहिल्या. १९४२ च्या “विशाखा” ग्रंथांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तरुण पिढीला प्रेरित केले आणि आजही भारतीय साहित्याचे उत्कृष्ट काम म्हणून या ग्रंथाला ओळखले जाते. नाट्यसम्राट हे नाटक त्यांनीच लिहले आहे, यावर आधारित नाना पाटेकरांच्या सिनेमा खूप प्रशंसा मिळवून गेला. ते राज्य आणि राष्ट्र सरकारच्या खूप साऱ्या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९७४ मध्ये मराठी नाटक नटसम्राट साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८७ मध्ये ज्ञानपीठपुरस्कार आणि १९९१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.

Essay on Shivaji Maharaj in Marathi

Essay on Shivaji Maharaj in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध, भाषण, लेख

Essay on Shivaji Maharaj in Marathi, Chhatrapati Shivaji Maharaj is not just a great king but he is like God to Indian people, especially Marathi people. Every school or college in Maharashtra will have an essay, speech, article, paragraph writing assignment or homework on this topic. Shivaji Maharaj topic will be in almost every speech, essay competition. So, here were trying to write a sample essay on great Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi.

Information given here is in essay format but with little modification, one can use it for speech, article or practice paragraph writing too. This sample essay may too big and complicated for students of class 1,2,3,4,5 but it is suitable for kids of class 6,7,8,9,10. Let’s jump to core content then.

shivaji maharaj

                           shivaji maharaj

Essay on Shivaji Maharaj in Marathi

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”

हि ओळ तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकली असेलच. हे शब्द आहेत राजमुद्रेतले, जे शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यच प्रतीक आहे. हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी त्यांचा अर्थ हि आहे, तो असा,

प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…

एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्टीत अशा मराठा साम्राज्याला. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जगातील महान अशा मराठा साम्राज्याचे अधिपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणार आहोत. दरवर्षी १९ फेब्रुवारी ला आपण शिव जयंती साजरी करतो. शाळा आणि कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर निबंध अथवा भाषणद्यावे लागते. ह्या आर्टिकल द्वारे तुम्हाला शिवाजी महाराज्यांसारख्या थोर राजाबद्दल माहित मिळेल आणि हि माहिती तुम्हाला तुमच्या निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेत नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योध्या आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात. शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे. एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते आणि प्रचंड मोठे, सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभारू शकले.

शिवाजी महाराजांचे बालपण

शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे मुघलांनी त्रासलेल्या जनतेसाठी एक शुभ शकुनच होता. त्रस्त जनतेला शिवरायांच्या जन्मानंतर एक आशेचा किरण दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुलिअन दिनदर्शिकेनुसार १९ फेब्रुवारी १६३०, हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन कृष्ण तृतीयेला पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते. जिजाबाई शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा हि म्हणत. शहाजी महाराज विजापूर च्या राजाच्या सेवेत होते आणि पुण्यातही काही भागाचे ते जहागीरदार होते. शिवरायांची आई जिजाबाई ह्या सिंदखेड च्या लाखोजी जाधवांची कन्या. त्या अतिशय धार्मिक आणि महत्वाकांक्षी होत्या. लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले आणि शेवटी सत्याचाच विजय होतो हे त्यांना पटवून दिले. मोठे होत असताना आई जिजाऊंची हि शिकवण कायम शिवाजी महाराज्यांचा सोबत होती आणि त्याचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता.

शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मतःच नेतृत्व क्षमता होती. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सह्याद्रीच्या कडेकपार्या फिरून काढल्या आणि आपल्या प्रदेशाबद्दल सर्व माहिती आत्मसात करून घेतली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. हेच मावळे त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात त्यांचे सोबती होते. हे मावळे स्वराज्य भावनेने प्रेरित होते आणि स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला हि तयार होते. १६४० मध्ये शिवरायांच्या विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला.

अस्सल राजा आणि नेता म्हणून शिवाजी महाराजांची कामगिरी

१६४५ पर्यंत शिवाजी महाराजांनी आदिल शहा च्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूच्या चाकण, कोंढाणा, तोरणा, तसेच सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. शिवाजी महाराजांच्या ह्या यशस्वी लढायांमुळे आदिल शहा अस्वस्थ होऊ लागला आणि त्याला शिवाजी महाराजांकडून मुघल साम्राज्याला धोका आहे ह्याची जाणीव झाली. आदिल शहा ने शिवरायांचे वडील शहाजीना कैद केले आणि एकाच अटीवर मुक्त केले कि शिवाजी महाराज यापुढे आदिल शहा च्या प्रदेशावर चढाई करणार नाही. काही वर्षांनी शहाजी राजेंचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड पुन्हा सुरु करून जावळी च्या दरीखोऱ्यातला प्रदेश चंद्रराव मोरे जो विजापूर चा जहागीरदार होता त्याकडून जिंकुण घेतला. ह्या घटनेने आदिल शहा चा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या शक्तिशाली सरदारांपैकी एक सरदार अफजल खान ह्याला शिवरायांना पराभूत करण्यात धाडले.

अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी षडयंत्र रचले आणि त्यांना भेटीसाठी प्रतापगडावर बोलवले. पण अफजल खानाला माहित नव्हते कि शिवाजी महाराज त्याच्या एक पाऊल पुढे आहेत. महाराजांनी खानाचा डाव ओळखला आणि त्यांनी गनिमी काव्याचा डाव रचला. जेव्हा ते प्रतापगडावर भेटले तेव्हा खानाने शिवरायांना आलिंगन देण्यासाठी जवळ बोलावले आणि जवळ येताच शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्यावरच उलटा पडला. शिवरायांनी आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले होते. राजेंनी चपळाईने लपवलेला वाघनख्या बाहेर काढल्या आणि खानाच्या पोटात खुपसल्या. खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान कोसळला. शिवाजी महाराजांवर हल्ला झाला हे समजताच जंगलात लपलेल्या मावळ्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे खानाचं सैन्य बिथरले आणि मारले गेले. ह्याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. गनिमी कावा हि पद्धत ज्याला इंग्रजी मध्ये गुरिल्ला वॉरफेर असं म्हणतात हि आजही जगातल्या मोठमोठ्या देशांच्या लष्करामध्ये वापरली जाते. प्रतापगडाच्या घटनेवरून शिवाजी महाराजांची चपळाई, दूरदृष्टी आणि शोर्य दिसून येते.

जेव्हा शिवाजीराजे छत्रपती झाले | शिवराज्याभिषेक सोहळा

समर्थशाली असे मराठा साम्राज्य दूरवर पसरवल्यांनतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. जुन ६, १६७४ रोजी रायगडवर आयोजीत राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचा राजा छत्रपती म्हणून गौरव करण्यात आला. ह्या राज्याभिषेक सोहळ्यात सुमारे ५०००० लोक हजर होते आणि पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. ह्या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, शककर्ते, क्षत्रिय कुलावतंस आणि हिंदू धर्मोद्धारक अशा नावांनी गौरव करण्यात आला.

एक कुशल राज्यकर्ता, एक धर्मनिरपेक्ष नेता आणि लष्करी दूरदृष्टी असणारा राजा

शिवाजी महाराजांची एक कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती होती. त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरु केले ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीस एक ठराविक जबाबदारी देण्यात आलेली. पेशवा, मजुमदार, डबीर, पंडितराव,सेनापती, सचिव, मंत्री, न्यायाधीश अशी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची पदे असत.

शिवाजी महाराजांची प्रशासकीय धोरणे अतिशय अनुकूल आणि मानवी होती. त्यांनी चौथ आणि सरदेशमुखी ह्या दोन प्रकारच्या कर पद्धतींची सुरुवात केली. त्यांनी राज्याची ४ विभागांमध्ये विभागणी केली आणि प्रत्येक विभागाचा प्रमुख मामलतदार असे. त्यांनी कायम स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि ते कायम स्त्रियांचा आदर करत. त्यांनी त्य्यांच्या मावळ्यांना देखील कोणत्याही स्त्री ला इजा किंवा अनादर होईल असं ना वागण्यास सक्त ताकीद दिली होती. शिवाजी महाराक हिंदुत्व, मराठी आणि संस्कृत भाषेचे समर्थक होते परंतु त्यांनी नेहमी दुसऱ्या धर्मांचा आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे सैनिक होते.

शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सुरक्षिततेबद्दल खूप सावध होते. त्यांना गड किल्ल्यांची ची ताकद माहित होती आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतामध्ये खूप किल्ले उभारले. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रू पासून सुरक्षा करण्यासाठी महाराजांनी समुद्री किल्ले आणि आरमार हि उभारले.

शिवाजी महाराजांचा मृत्यू आणि त्यांचा वारसा

४ दशके स्वराज्यासाठी लढल्यांनतर एप्रिल ३, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मुघलांसोबतची मराठ्यांची लढाई चालूच राहिली. शिवाजी महाराज्यांनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजेंनी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली. पण दुर्दैवाने मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. शिवाजी महाराजांचे चरित्र सभासद बखर मध्ये लिहले गेले.

आज एकविसाव्या शतकात हि लोक शिवाजी महाराजांचा तेवढाच आदर करतात. शिवरायांच्या जीवनावर खूप चित्रपट, पोवाडे, नाटके, गाणी, बनवली गेली. खूप अशी ठिकाणे, संग्रहालये, स्टेडियम्स, शिवाजी राजांच्या नावाने नावाजली गेली. मुंबई मधील विमानतळाला देखील शिवाजी महाजारांचं नाव देण्यात आलं. शिवजयंती आपण खूप खूप उत्साहात साजरी करतो. लेझीम च्या तालावर शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक निघते, एकमेकांना शिवाजी महाराजांचे फोटोस, व्हिडिओस सोसिअल मीडिया वर पाठवले जातात.

मुंबई मध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम जोमात सुरु आहे. शिवाजी महाराजांचा  २१० फुटांचा हा पुतळा जगातील सर्वाधिक उंच पुतळा असेल. हे स्मारक बांधण्यासाठी ४००० करोड इतका खर्च येणार आहे. म्हणून काही लोक ह्यास विरोध हि करत आहेत. जर जे पैसे शिवाजी महाराजांनी बनवलेल्या किल्ल्याचा नूतनीकरण व डागडुजीसाठी वापरले तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा सन्मान होईल असं त्यांचं म्हणणं आहे.

सारांश

शिवाजी महाराज एक उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे योद्धा होते. ते जनतेच्या कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा संबोधण्यात येते. राजेंबद्दलचा मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो. जर आज शिवाजी महाराज जिवंत असते तर ह्या जनतेचं त्याच्याबद्दलच प्रेम बघून भारावून गेले असते. पण त्याचबरोबर देशात चाललेल्या भ्रष्टाचार, गुन्हे, दंगली बघून उदास हि झाले असते. अशा ह्या थोर राज्याला माझं शत शत नमन.

शिवाजी महाराज निबंध साठी टिप्स

 • निबंधांचे वेगवेगळे प्रकार असतात. आणि त्या प्रकारानुसार निबंधाची रचना बदलते. त्यामुळे निबंध लिहायला सुरुवात करण्याआधी कोणत्या प्रकारचा निबंध आहे हे तपासून घ्या
 • निबंधाचे ३ प्रमुख घटक असतात- विषयाबद्दल ओळख, मुख परिचछेद, आणि सारांश..निबंध लिहताना ह्याप्रमाणेच लिहा.
 • गडद शाही च्या पेन चा उपयोग करा.

शिवाजी महाराज भाषण साठी टिप्स

 • भाषणांचा रट्टा मारू नका. मनापासून बोललेले भाषण जास्त प्रभावी ठरते.
 • स्टेज वर आत्मविश्वासाने उभे राहा आणि नजर प्रेक्षकांकडे ठेवा.
 • बोलताना अडखळू नका, घाई करू नका, शांतपणे बोला.
 • योग्य तिथे हातवारे वापरा.
 • तुमचा आवाज सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा त्यामुले मोठ्याने व स्पष्ट बोला.

for more information – https://mr.wikipedia.org

होळी मराठी निबंध, भाषण

होळी हा महाराष्ट्रातील एक खूप मोठा सण आहे, याला कोकणात शिमगा म्हटले जाते. होळीच्या काळात या विषयावर निबंध किंवा लेख लिहण्याचा होमवर्क मुलांना मिळतो आणि कधी कधी हा विषय वक्तृत्व (भाषण) स्पर्धेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. So, here we are giving you 2 sample essays on Holi in Marathi, first one is suitable for school students of class 5,6,7,8,9,10 and the second essay is good for kids of class 1,2,3,4,5. Hope you will like it.

होळी वर मराठी निबंध, भाषण – Essay, Speech on Holi in Marathi.

होळी हा एक हिंदू सण आहे, तो पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, वाईटावर चांगलेपणाचा विजय. वसंत ऋतू च्या स्वागतासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सगळे वातावरण खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असते. होळीच्या दिवशी लोक एकत्र येतात, आपले रुसवे फुगवे विसरून जातात.

होळी हा २ दिवसांचा सण आहे, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या सायंकाळी याची सुरवात होते. इंग्रजी पंचांगानुसार होळी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येऊ शकते. या वर्षी, साल २०१८ मध्ये होळी २ मार्चला आहे. होळीच्या पहिल्या दिवसाला छोटी होळी म्हणतात, या दिवशी लोक होलिका दहन करतात, पूजा करतात.

खूप वर्षां पूर्वी गावचे सगळे लोक वादविवाद विसरून होलिका दहन साठी एकत्र येत असत. त्या साठी लागणारी लाकडं, गवात मिळून जमा करत असत. सर्व स्त्रिया एकत्र नैवद्य बनवत, पूजेची तैयारी करत असत. होळी म्हणजे फक्त एक सण नसून समाजाचा एक महत्वाचा घटक सुद्धा होता, तो लोकांना एकत्र आणायचा. पण आजकाल, लोक एकत्र येत नाहीत. जो तो आपल्या अंगणात स्वतःची होळी बनवतो. त्यामुळे होळीची पहिल्या सारखी मजा येत नाही आणि होळीची खरी परंपरा, संदेश नवीन पिढीकडे पोहचतच नाही.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला रंग पंचमी बोलतात, कोणी या दिवसाला रंगावली, सुद्धा म्हणतात. रंगपंचमी खर तर होलिकादहनाच्या राखेपासून खेळत असत, पण आजकाल आपण कृत्रिम, रासायनिक रंगच वापरतो. पुरातन काळात होळीचा रंग हा गुलाल, हळद, कुंकू, चंदन पूड आणि सुवासिक वनस्पतींपासून बनवत असत. आजकाल आपण रंगबिरंगी पावडर, पाण्याचे फुगे आणि पिचकारी सोबत रंगपंचमी खेळतो. या दिवशी कोणीही कुणालाही रंगात भिजवून टाकते, आणि लोक सुद्धा हसत हसत रंग खेळतात.

होळीचे महत्व आणि शिकवण – Significance and Teachings of Holi

होळीच्या सणामागे आजच्या वेळेनुरूप अशी शिकवण आहे. होळीच्या दिवशी होलिका राक्षसणीचा वध झाला, हिरण्यकशिपू चा बेत फसला, चांगल्याचा वाईटावर विजय झाला. आजच्या या जगात जिथे गुन्हे, चोऱ्या, भ्रष्टाचार वनव्यासारखा पसरतोय तिथे होळी चा संदेश आपणास आशा देऊन जातो. सरतेशेवटी सत्यच जिंकणार.

होळी सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा साजरा केला जातो. झाडे, झुडपे असह्य उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंताची वाट पाहत असतात. वसंतामध्ये नवी पालवी फुटते, त्यांची वाढ होते, रंग बेरंगी फुले उमलतात, वातावरण खूप अल्हद असते. माणसाचे आयुष्य हि असेच असते, कधी सुख तरी कधी दुःख, कधी आराम तर कधी मेहनत. होळी आपल्याला शिकवते कि अंधाऱ्या समयी टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्य किरणांची वाट पाहायची असते. प्रत्येक रात्री नंतर दिवस येतोच. होळी पुरातन काळापासून साजरी केली जाते पण होळीचा संदेश आजही तितकाच संबंधित आहे. होळीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, होळी कुठल्या एक धर्माची नाही तर ती सर्व मानवजातीची आहे.

होळीची कथा – Mythological stories and Religious Importance of holi

होळीच्या तश्या खूप कथा आहेत, पण सगळ्यात जास्त प्रचलित ती म्हणजे भक्त प्रल्हाद ची. हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता, त्याला एक मुलगा होता प्रल्हाद. हिरण्यकशिपूला देव आवडत नसत आणि प्रल्हाद हा भगवान विष्णू चा खूप मोठा भक्त होता. दिवस रात्र देवाचे नाव जपायचा. हिरण्यकशिपू प्रल्हादच्या भक्तीने, जपाने संतापात असे, म्हणून त्याने स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याचे ठरवले. त्याची होलिका नावाची असुर बहीण होती. तिच्या कडे एक जादुई वस्त्र होते, जे तिला भयानक आगीपासून वाचवू शकत होते.

होलिकाने भक्त प्रल्हाद ला आगीत जाळून मारण्याचा कट केला. ती त्याला घेऊन धगधगत्या चिते वर बसली, हिरण्यकशिपूला वाटले कि आता प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका सुखरूप आगीतून बाहेर येईल. पण भगवान विष्णूच्या कृपेने उलटे झाले, होलिका आगी मध्ये जाळून गेली आणि भक्त प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर आला.

याच विजयाच्या स्मरणार्थ होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होळी म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजयाचे प्रतीक होय, हा या कथेचा सारांश आहे.

होळी बद्दलचे विवाद

राजनैतिक किंवा इतर कारणांसाठी काही लोक होळी ला धार्मिक विवादात पाडतात. तसेच, रंग पंचमी साठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नुकसान होते, असाही विवाद होळी सणाच्या दरम्यान उठतो. होळी, रंग पंचमी साठी वापणारे कृत्रिम, रासायनिक रंग विषारी असतात. त्यामुळे तवतेचे रोग होऊ शकतात, डोळ्यांना इजा होऊ शकते.

होळीची झेप – Holi in Foreign Countries

होळी आता भारताची सीमा पार करून विदेशातही पोहचली आहे. अमेरिका, कॅनडा सारख्या देशामध्ये भारतीय आणि गोरे लोक रंगांसोबत होळी साजरी करतात. ते लोक मोठे म्युझिक फेस्टिवल ठेवतात त्यामध्ये कदाचित मद्य प्रसशं सुद्धा केले जाते, त्यांची होळी म्हणजे एक पार्टी असते. हे खूप चुकीचे आहे. होळीचा खरा अर्थ जाणणे तर दूर राहिले, हे लोक तर होळी सणाचा सरासर अपमान करत आहेत. होळी सण काय आहे, त्याच्या मागची कथा काय, या सणाचा अर्थ काय, महत्व काय हे पहिले त्यांनी जाणून घेतले पाहिजे.

 

निष्कर्ष – Conclusion

होलिका दहन सोबत मनुष्याच्या मनातील वाईट विचारांचेही दहन होते, अशी धारणा आहे. रंगपंचमी रंग चे वसंत ऋतू मध्ये खुलणारे रंग दर्शवतात. आपल्याला या सुंदर सणा मागची शिकवण, संदेश समजून घ्यायला हवा. होळी लोकांना एकत्र आणण्यासाठी असते, सामाजिक बांधीलकी वाढवण्यासाठी असते. तिचा एक थिल्लर खेळ, किंवा पार्टी म्हणून आपण ऱ्हास नाही केला पाहिजे. पाण्याचा दुरुपयोग न करता नैसर्गिक रंगांसोबत होळी खेळली पाहिजे.

Please note that Holi is celebrated across India and have different names, traditions, rituals as per place. As this information is in Marathi, we tried to make it relevant to Maharashtra school students.

Holi Short 10 to 15 Lines Essay in Marathi – होळी शॉर्ट निबंध, भाषण

This short essay is good for kids of class 1,2,3,4,5 etc. We have used very simple Marathi for this section.

 1. होळीला रंगांचा उत्सव ही म्हटले जाते.
 2. हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
 3. होळी २ दिवसीय सण आहे.
 4. पहिल्या दिवशी रात्री होलिका दहन केली जाते.
 5. होळीच्या पहिल्या दिवसाला लहान होळी देखील म्हटले जाते.
 6. होळीच्या दुस-या दिवसाला रंगवाली होली, धुलेटी, धुलंडी, फगवा किंवा रंग पंचमी असे म्हणतात.
 7. दुसऱ्या दिवशी, लोक रंग आणि रंगीत पाण्याने रंग पंचमी खेळतात.
 8. रंगपंचमीचे रंग वसंत ऋतूच्या रंगांचे प्रतीक आहे.
 9. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी देखील होळी साजरी केली जाते.
 10. होळी म्हणजे, वाईटावर चांगुलपणाचा विजय होय.
 11. असे मानले जाते, होळीदहना सोबत आपल्या मनातील वाईट विचारही दहन होऊन जातात.
 12. या दिवशी, भगवान विष्णूंनी आपला भक्त प्रल्हादला होलिका पासून वाचवले.

महात्मा गांधी- निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये

MAHATMA GANDHI MARATHI ESSAY

ब्रिटीशांनी भारतावर दोनशे वर्षे राज्य केले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानीनी आपल्या घराचा त्याग केला, प्राणाची आहुती दिली. अशाच महान स्वातंत्र्य सेनानी पैकी एक म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते होते. महात्मा गांधींच्या कार्याची आणि किर्तीची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून शाळा आणि महाविद्यालये महात्मा गांधी या विषयावरती निबंध, वक्तृत्व, पेंटिंग आणि ड्रॉइंग स्पर्धा भरवतात. या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला महात्मा गांधींवरती निबंध स्वरुपात माहिती देणार आहोत. थोडेशे बदल करून ही माहिती तुम्ही भाषण लिहिण्यासाठीही वापरू शकता. आम्ही आपणास अशीही सूचना देऊ इच्छितो की हा निबंध जसाच्या तसा कॉपी करण्यापेक्षा तुम्ही महात्मा गांधीचा इतिहास समजून घ्या आणि स्वतःचा निबंध किंवा भाषण लिहा.

महात्मा गांधी- निबंध, भाषण (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi)

महात्मा गांधी एक महान स्वतंत्र सैनिक होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांना वाचनाची आवड होती, त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम ही करत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी महात्मा गांधींचे लग्न तेरा वर्षीय कस्तुरबा कपाडिया यांच्याशी झाले, नंतर त्यांना कस्तुरबा गांधी म्हणून ओळखू जाऊ लागले. महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधींनीही त्यांना विविध चळवळीमध्ये साथ दिली, गांधीजी जेलमध्ये असताना त्यांनी चळवळींचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळले. त्यांनी महात्मा गांधीजींना शेवटपर्यंत साथ दिली, पुढे जाऊन पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

१८८८ मध्ये महात्मा गांधी समलदास विद्यालयात दाखल झाले पण ते महाविद्यालय सोडून पोरबंदर ला परत आले. एका कौटुंबिक मित्राच्या सल्ल्यावरून ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले आणि १८९१ मध्ये ते भारतात परत आले. ते लंडनमध्ये असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला पण त्याची बातमी त्यांना कुणीही कळवली नाही जेणेकरून त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे.

बॅरिस्टर बनून भारतात परत आल्यानंतर त्यांनी बॉम्बेमध्ये (मुंबई) वकिलीची सुरुवात केली. पण त्यामध्ये ते तेवढेसे यशस्वी झाले नाहीत म्हणून ते पोरबंदरला परतले. त्यावेळी त्यांना दक्षिण आफ्रिकेतून नोकरीची संधी मिळाली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेमध्ये तेव्हा नाटाल ब्रिटिश सरकार होते. तिथे भारतीय वंशाच्या लोकांना वर्णभेदाचा त्रास होत असे. या सर्व अनुभवातून महात्मा गांधींनी याबद्दल विरुद्ध लढा देण्याचे ठरवले. इथूनच महात्मा गांधींचा खरा प्रवास सुरू झाला. महात्मा ही पदवी त्यांना दक्षिण आफ्रिकेतच मिळाली.

गोपाळ कृष्णा गोखले यांच्या विनंतीला मान देऊन ते भारतात परत आले. १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्यांनी स्थानिक शेतकरी आणि कामगार यांच्या उच्च कर आणि भेदभावाच्या विरोधात लढा देण्यास सुरुवात केली. पुढे १९२१ मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले आणि तिथून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान देण्यास सुरुवात केली. १९३० मध्ये काँग्रेसने स्वतंत्र भारताची घोषणा केली, पण ती ब्रिटिश राजने मान्य केली नाही पण काही वाटाघाटी करण्यात आल्या, ज्यानुसार भारतीयांना प्रांतीय सरकार मध्ये भाग घेण्यास परवानगी मिळाली.

यादरम्यान महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी, सत्याग्रह, आंदोलने केली. १९१७ मध्ये बिहारच्या चंपारण सत्याग्रहात त्यांना यश मिळाले. १९१८ मध्ये गांधीजींनी उच्च महसूलाविरुद्ध खेडामध्ये असहकार सत्याग्रह पुकारला. वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व केले आणि ब्रिटिशांसोबत वाटाघाटी करून राजस्व संकलन निलंबित केले व सर्व कैद्यांना सोडवले.

१९१९ मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारले. या दरम्यान जमलेल्या लोकांनी सर्वानजीक मालमतेची नासाडी केली. याच दरम्यान जालियनवाला बाग हत्याकांड झाले. लोकांकडून होणारी हिंसा थांबवण्यासाठी गांधीजी अमरण उपोषणाला बसले. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष स्वदेशी मोहिमेकडे वळवले. ज्या नुसार त्यांनी परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला, स्वदेशी खादीची वस्त्र वापरण्याचे आवाहन केले. या सोबत त्यांनी जनतेस ब्रिटिश सरकारच्या नोकऱ्या, पदव्यांचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. पुढे जाऊन हे असहकार आंदोलन वाढले, ब्रिटीशानी गांधीजींना ६ वर्षांची सजा सुनावली. या दरम्यान काँग्रेस मध्ये फूट पडू लागली. १९२४ मध्ये, २ वर्षानंतर गांधीजींना अॅपेन्डिसाइटिसच्या शश्त्रक्रियेसाठी सोडण्यात आले. पुढे त्यांनी आपला लढा चालू ठेवला.

इंग्रजांशी लढा देताना महात्मा गांधींनी अहिंसा, असहकार आणि सत्याग्रहाचा वापर केला. बऱ्याच वेळा त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले, परंतु ते निराश न होता ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू ठेवला. पुढे जाऊन त्यांनी विदेशी वस्तू त्यागल्या, ते फक्त खादीचे धोतर आणि शाल परिधान करत असत. १९३० मध्ये त्यांनी दांडी यात्रे द्वारा त्यांनी मिठावरच्या कराविरुद्ध सत्याग्रह पुकारले. १२ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान गांधीजी हजारो जनसमुदयासहअहमदाबाद ते दांडी अशी ३८८ किलोमीटरची पायी यात्रा केली. ब्रिटिशांनी या दरम्यान ६०,००० लोकांना जेल मध्ये टाकले.

१९४२ मध्ये गांधीजींनी “भारत छोडो” अभियान सुरु केले. याच दरम्यान त्यांनी “करो या मरो” चा नारा दिला. ब्रिटीशानी त्यांना पुण्यातील आगा खान पॅलेस मध्ये नजरकैदेत ठेवले. या दरम्यान त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींचे निधन झाले, आणि गांधीजींनाही मलेरिया झाला होता. गांधीजींना ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. तेव्हा काँग्रेसचे राजनैतिक वातावरण बदलले होते, मुहम्मद अली जिन्नाह स्वतंत्र मुस्लिम देशाची मागणी करू लागले.

ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग केला. त्यांनी जनतेच्या एकोप्याची शक्ती जाणली होती म्हणून त्यांनी विविध जाती, धर्म, समाज, वर्ण, वय किंवा लिंग सर्व मतभेद विसरून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी एकत्र आणले. अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज भारत सोडून निघून गेले पण भारत आणि पाकिस्तान असे विभाजन करून.

पण त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य पाहण्यासाठी ते खूप वर्ष जगू शकले नाहीत. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे नावाच्या युवकांनी त्यांची दिल्लीतील बिर्ला मंदिर येथे हत्या केली. महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्त्व होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले. त्यांनी दाखवून दिले की अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गानेही देशाला स्वतंत्र मिळवून देता येते. त्यांची शिकवण आणि आयुष्य जगातील अनेक नेत्यांना प्रेरणादायी ठरले. महात्मा गांधी आपल्या शिकवणी आणि मार्गदर्शनाच्या रूपाने प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत. आपण त्यांचे बलिदान केव्हाच विसरू शकत नाही.

सूचना: जर तुम्हाला हा निबंध, भाषण आवडले तर या आर्टिकल ला चांगली रेटिंग द्या. तुम्ही तुमचे मत, विचार कंमेंट बॉक्स मध्ये मांडू शकता. धन्यवाद!!

%d bloggers like this: