Tag: Maharashtra

माझे आवडते संगीतकार

माझे आवडते संगीतकार

 

“रोजा”, “बॉम्बे”, “दिल से” सारख्या संवेदनशील चित्रपटांच्या संगीतामुळे हिंदी चित्रपट सृष्टीला त्यांची ओळख झाली. ‘ताल’ सारख्या ठेका धरायला लावणाऱ्या संगीतामुळे ते लोकप्रिय झाले आणि ‘जय होsss!’ च्या वेळेस तर त्यांनी पुर्ण जगाला आपल्या संगीताने वेड लावले.

१९९० मध्ये त्यांनी आपल्या संगीत काराकिर्दीची सुरुवात केली आणि इतक्या कमी काळात त्यांनी १३ फिल्म-फेअर, ४ नॅशनल, १ बाफता, १ गोल्डन ग्लोब आणि ३ ऍकेडमी पारीतोषीक पटकावली.

सर्व तरूणाईच्या गळ्यातले ताईत बनलेले, मितभाषी, थोडेसे लाजाळु असे अल्लाह रखा रहमान, अर्थात ‘ए. आर. रहमान’ हेच माझे आवडते संगीतकार आहेत.

‘ए. आर. रहमान’ यांचा जन्म चैन्नई मध्ये एका मुडलीयार-तामीळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील आर.के.शेखर हे सुध्दा चैन्नईमधे संगीत क्षेत्रातच कार्यरत होते. ‘ए. आर. रहमान’ यांच्या तरूणपणीच त्यांच्या वडीलांचे छ्त्र हरपले आणि घर चालवण्यासाठी त्यांना घरातील संगीत-उपकरणे भाड्याने द्यावी लागली. ‘ए. आर. रहमान’ यांना त्यांच्या मातोश्री- करीमा यांनी मोठे केले.

लहानपणापासुनच ‘ए. आर. रहमान’ यांना संगीताचे वेड होते. वयाच्या ११व्या वर्षीच इलयराजा यांच्या संगीतकांमध्ये त्यांचा समावेश झाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळुन बघीतले नाही.

संगीतामध्ये तांत्रीक-क्रांतीचा, संगणकाचा, अनेक तुकड्यांत संगीत ध्वनीमुद्रीत करुन ते एकत्र जोडण्याचा पायंडा ‘ए. आर. रहमान’ यांनीच पाडला आणि एका वेगळ्याच संगीत-क्षेत्राची मुहुर्त-वेढ त्यांनी रोवली असे म्हणल्यास ते वावगे ठरु नये.

एक-दोनदा हुलकावणी दिलेल्या आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार पहिल्यांदा भारतात आणले ते आपल्या ‘ए. आर. रहमान’ यांनीच.

जगभरात भारताचे नाव दैदीप्यमान करणारे ‘ए. आर. रहमान’ हेच माझे आवडते संगीतकार आहेत यात शंकाच नाही.

Schools In Raigad Maharashtra

List Of Schools In Raigad Maharashtra

RAIGAD SCHOOLS

P E Society Shirki’s Madhy.Vidyalaya mandir
Raigad
-Ssc School
Schools
G.L.Ghosalkar Mvidhyalaya
Raigad
-Ssc School
Schools
New School
Raigad
-Ssc School
Schools
N.V.Soc.Navyug Marathi Madhy.Vidhyalaya
Raigad
-Marathi Medium School; Marathi Medium Shala; Marathi Medium Madhyamik Vidhyalaya; Marathi Medium Vi… more..
Schools
K.E.S.N.K.Gaikar Madhya.Shala
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid… more..
Schools
India First Foundation School
Raigad
-Icse School
Schools
P.N.Godase Vidyamandir
Raigad
-Ssc School
Schools
K.E.S.Adarsha M.Vidyamandir
Raigad
-Ssc School
Schools
Prabhakar Patil Edu.Soc.Madhyamik School
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid… more..
Schools
Neral Vidyabhavan Madhyamik Vidhyalaya
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid… more..
Schools
Bhimadri Vidhyalaya
Raigad
-Ssc School
Schools
Social Society’s High School
Raigad
-Higher Secondary School; High School; Madhyavidyalaya; Ssc School
Schools
Dr.A.R.Undre High School
Raigad
-Higher Secondary School; High School; Madhyavidyalaya; Ssc School
Schools
Prabhakar Patil Edu.Soc.Madhyamik Shala
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid
Schools
Dr A R Undre High School .
Raigad
-Higher Secondary School; High School; Madhyavidyalaya; Ssc School
Schools
K.E.S.Madhyamik Vidhyalaya
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid… more..
Schools
Sarvajanik Secondary & Higher Secondaryvidyalaya mandir
Raigad
-Higher Secondary School; High School; Madhyavidyalaya; Hsc School
Schools
Zenith School
Raigad
-Ssc School
Schools
Prabhakar Patil Edu.Soc.Madhya.Shala
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid..
Schools
Prabhakar Patil Edu.Soc.Madhyamik Shala
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid.
Schools
Ses Pali’s Madhyamik Vidly
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid
Schools
Madhyamik Vidhyalaya
Raigad
-Secondary School; Madhyamik School; Madhyamik Shala; Middle School; Matriculation School; Madhyavid.
Schools
J.H.Ambani Petrochemicals Vidhyamandir
Raigad
-Ssc School
Schools
St. Xavier’s High School
Raigad
-High School; Icse School
Schools
Madhuram C.Trust Adivasi Ashramshala
Raigad
-Ssc School
Schools
Adarsha Madhymik Vidyamandir
Raigad
-Ssc School
Schools
Vidyavikas Mandir
Raigad
-Ssc School
Schools
Abhinav Dnyan Mandir Prashala
Raigad
-Ssc School
Schools

महागणपती वाई

MahaGanpati Temple Wai, Maharashtra

प्रास्ताविक
मराठेशाहीत विशेषतः शिवोत्तरकाळात आणि प्रामुख्याने पेशवाईत वाईची सर्वांगीण प्रगती झाली. तीर्थक्षेत्र म्हणून वाईचे महत्त्व वाढले, तसेच पर्यटनस्थळ म्हणूनही त्यास अलीकडे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.याचे कारण म्हणजे उत्तर पेशवाईत रास्ते घराण्यातील सरदारमंडळीनी तसेच त्यांच्या मांडलिक-आश्रितांनी दानधर्माबरोबरच अनेक प्रासाद व मंदिरे बांधली.हे प्रासाद भित्तिचित्रांनी सुशोभित केले आणि मंदिरे चुनेगच्चीतील मूर्तीनी अलंकृत करण्यात आली. हे मध्ययुगीन वास्तुशिल्पशैलीने नटलेले कलावशेष पर्यटकांचे आकर्षण बनले असून त्यांचा आढावा प्रस्तुत लेखात घेतला आहे.

वाई व तिच्या परिसरात लहान-मोठी शंभराहून अधिक मंदिरे होती. यांतील काही जमीनदोस्त झाली आहेत, तर काहींची पडझड झाली आहे; मात्र काही अजूनही सुस्थितीत आहेत. यांतील बहुसंख्य मंदिरे कृष्णा नदीच्या काठी,काही प्रत्यक्ष नदीपात्रात, तर काही नदीपासून उत्तरेला नैसर्गिक सपाटीवर तसेच नदीच्या दक्षिण काठावर( सिद्धेश्वर,वाकेश्वर) बांधलेली आढळतात. यांपैकी ढुंड़िविनायक,भद्रेश्वर, वाकेश्वर, सिद्धेश्वर,महाकाली,रोकडोबा वगैरे मंदिरे शिवकालीन असून अन्य मंदिरे ही पेशवेकालीन छत्रपती शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत(इ.स.१७०८-४९ )आणि त्यानंतरच्या विशेषतः उत्तर पेशवाई काळातील आहेत. ही सर्व मंदिरे वास्तुशिल्पशैलीच्या दृष्टीने माळव्यातील भूमीज या उपवास्तुशैलीतून उत्क्रांत झालेल्या नागरशैलीत(इंडो-आर्यन)बांधलेली आहेत.ही शैली प्रथम यादव व शिलाहार वंशांतील राजांनी विकसित केली. पुढे तीत हेमाद्री उर्फ हेमाडपंथ या यादवांच्या करणाधिपमंत्र्याने काही बदल केले. या बदलांमुळे मंदिरवास्तूतील शिल्पकला जवळजवळ  संपुष्टात येऊन त्यास केवळ वास्तुरूप प्राप्त झाले आणि ती वास्तुशैली हेमाडपंती शैली  या नावाने  प्रसृत झाली. तथापि या शैलीतील काही मंदिरे ही वास्तुशिल्प  म्हणता येतील, अशी रेखीव, लक्षवेधक  आणि  आकर्षक आहेत.पुढे या शैलीस नव-यादव हे नामाभिधान मिळालेआणि त्यात इंडो-सॅरसॅनिक किंवा आदिलशाही (इस्लामशैली)  शैलीतील काही वास्तुविशेष आणि स्थानिक घटकांची सरमिसळ झाली.शिवाय दाक्षिणात्य व मुस्लिम वास्तुशैलींच्या विशेषत; आदिलशाही (इस्लामी) वास्तुशैलीच्या घटकांचे मिश्रण होऊन एक स्वतंत्र मराठा वास्तुशैली प्रचारात आली. या शैलीत शिखरांच्या रचनेत आदिलशाहीकालीन फुगीर (कलशाच्या) घुमटाचा व मनोऱ्यावर  प्रभाव अनुक्रमे आमलक , कुंभ आणि शिखराच्या उभटपणात दिसतो; तर गर्भगृहाच्या दगडी भिंतीवर चुना व विटांच्या काही शिखरांच्या   बांधकामात  दक्षिणेकडील गोपुरांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्यातील आयताकार, अष्टकोनीय वा अनेककोनीय योजनाप्रकार आढळतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तासगाव (सांगली जिल्हा) येतील गणपती मंदिराच्या प्राकारातील गोपूर होय.मात्र मूळ नागर वास्तुशैलीचे  परंपरागत घटक वा अभिलक्षणे तशीच राहिली असून शिल्पांचे अलंकरण पूर्णतः संपुष्टात आले आहे . त्यामुळे साहजिकच वास्तुशैलीला प्राधान्य प्राप्त झाले.वास्तुशास्त्रदृष्ट्या या मंदिरांचे मूळ विधान आराखडे चतुरस्त्र किंवा क्वचित तारकाकृती असून शिखरच्या बांधकामात आयताकार,अष्टकोन वा अनेक कोन दृग्गोचार होतात. बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखराच्या खालच्या भागाचे बांधकाम पायापर्यंत घडीव दगडांमध्ये केलेले  आहे आणि शिखरे वीट व चुन्यात  बांधली आहेत. मराठ्यांच्या दक्षिण व उत्तर हिंदुस्तानातील  संचारा- संपर्कामधून  इस्लामी व दक्षिणात्य वास्तुघटक  मराठा मंदिराच्या वास्तुशैलीत प्रविष्ट झाले आहेत; कारण तिकडचे  कारागीर   मराठ्यांसोबत  आल्याच्या नोंदी आहेत. या एकाच वास्तुशैलीची अनेक मंदिरे शहरात विखुरलेली आढळतात. या सर्व मंदिरांत महादेवाच्या  मंदिरांचे प्रमाण जास्त  आहे. त्यातील वाकेश्वर ,चक्रेश्वर ,त्रिशुलेश्वर,उमामहेश्वर,बानेश्वर,भद्रेश्वर, कोटेश्वर , गंगारामेश्वर,रामेश्वर, काशीविश्वेश्वर ,कालेश्वर,गोविंदरामेश्वर ही शिवमंदिरे असून इतर मंदिरांत महागणपती (ढोल्या गणपती), महालक्ष्मी, महाविष्णू,व्यंकटेश, दत्तात्रेय,ढूडीविनायक, कालीमाता वगैरे अन्य देवतांची मंदिरे  आहेत.

कालदृष्ट्या या मंदिरांचे तीन स्वतंत्र विभाग पडतात. मराठा अमलातील विशेषतः शिवकालातील(१६४७ ते १७०७), पूर्व पेशवाईतील(१७०८ ते १७४९)आणि उत्तर पेशवाईतील(१७४९ ते १८१८)व नंतरची मंदिरे होत.

वाकेश्वर, सिद्धेश्वर  व ढूडीविनायक(गणपती)ही मंदिरे त्यांवरील शिल्पे, गर्भगृहातील वितान (छत)  आणि दगडी स्तंभ यावरून शिवपूर्वकाळातील पण यादव काळानंतरची सुमारे पंधराव्या-सोळाव्या शतकांतील असावीत.शांताश्रम समाधी १७१९ बाणेश्वर (१७४२ ) काळेश्वर १७४४ कौंतेश्वर १७४८ वगैरे काही फारच थोडी पूर्व पेशवाईतील वाईतील मंदिरे असून उर्वरित बहुतेक मंदिरे उत्तर पेशवाईतील,प्रामुख्याने रास्ते घराण्याकडे सरंजाम व सरदारकी                                आल्या नंतरची किंवा त्यांच्या आश्रितांनी-सावकारांनी बांधलेले आहेत.त्यानंतरही ही मंदिरवास्तुबांधणी पुढे १९ व्या शतकात चालू होती. ह्या काळात रामेश्वर (१८०३) व्यंकटेश (इ.स.१८६१),कोटेश्वर(इ.स.१८७०),पुलाखाली दत्तात्रेय (इ.स.१८६१), राधाकृष्ण(मथुरापुरी- १९०८)वगैरे मंदिरे याच वास्तुशैलीत बांधली गेली.सामान्यतः या मंदिरातून गर्भगृह व सभामंडप ही  दोनच दालने आढळतात.काही मंदिरे तर फक्त गर्भगृह व पुढे छोटा सोपा एवढीच आहेत,मात्र काही मोठ्या मंदिरातून(काशीविश्वेश्वर)गर्भगृह,अंतराळ,रंगमंडप वा सभामंडप आणि नंदीमंडप ही प्रमुख दालने आढळतात.

पुणे-स्वारगेट येथून वाई जाण्यास दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध आहे.

ref- http://www.mahaganpatiwai.org/

Rajiv Gandhi Zoological Park, Pune, Maharashtra

Rajiv Gandhi Zoological Park, Pune

कात्रज सर्पोद्यान हे पुण्यात भारती विद्यापीठाजवळ पुणे सातारा महामार्गावर कात्रज येथे वसलेले आहे. इ.स. १९८६ मध्ये नीलम कुमार खैरे यांनी ते वसवले.ते सर्पोद्यानाचे पहिले संचालक होते. सर्व जातींचे सर्प, सरपटणारे प्राणी आणि प्राणिजगतातल्या अनेक जीवांना येथे संरक्षण देऊन त्यांचे जतन व संवर्धन केले जाते. इ.स. १९९९ मध्ये या सर्पोद्यानाचा राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी संशोधन केंद्रात समावेश केला गेला जे की पुणे महानगरपालिकेतर्फे व्यवस्थापित केले जाते.सापासारख्या प्राणघातक समजल्या जाणार्‍या प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करून सापाबद्दल त्यांच्या मनात असलेली अज्ञात भीती काढून टाकून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ही संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करते.

पर्यटक सेवा/ सुविधा | Pune Municipal Corporation

प्राणीसंग्रहालयाची वेळ

१ एप्रिल ते १५ जून – स. ९.३० ते सायं. ५.३०

(प्राणीसंग्रहालय प्रवेशद्वार सायं. ६.३०  वा. बंद)

१६ जून ते ३१ मार्च – स. ९.३० ते सायं. ५.००

(प्राणीसंग्रहालय प्रवेशद्वार सायं. ६ वा. बंद)

 

तिकीट दर

 1. क्र.

प्रवेश तपशील

तिकीट दर (रुपये)
प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे)

२५/-

लहान मुले (उंची ४ फूट ४ इंच पर्यंत)

१०/-

विदेशी नागरिक (Foreigner )

१००/-

अंध व अपंग

मोफत

विद्यार्थी (शैक्षणिक सहल- शिक्षकांसह)

अ) खासगी शाळांमधील विद्यार्थी

आ) मनपा शाळा, जिल्हा परिषद व शासकीय शाळांचे विद्यार्थी

१०/-प्रत्येकी

०५/-  प्रत्येकी

स्टील कॅमेरा

५०/-

व्हिडिओ कॅमेरा

२००/-

गाईड उपलब्धतेनुसार (प्रत्येक समूह)

५०/-

बटरी ऑपरेटेड वाहन शुल्क

प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे)

४०/-

१० लहान मुले (उंची ४ फूट ४ इंच पर्यंत)

२५/-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दर बुधवारी प्राणीसंग्रहालय बंद राहील.

बसचे मार्ग

 • स्वारगेट बस स्थानकावरून कात्रजकडे येणारी कोणतीही बस- बस नंबर १०३, ४२, ३०१ इ.
 • शिवाजीनगर बस स्थानकावरून कात्रजकडे येणारी कोणतीही बस- बस नंबर २
 • पुणे स्टेशन बस स्थानकावरून कात्रजकडे येणारी कोणतीही बस- बस नंबर २४

प्राणी संग्रहालयामध्ये खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

 • प्राणी संग्रहालयातील कोणत्याही प्राण्याला चिडविणे, इजा पोचविणे, खाऊ घालणे किंवा गोंधळ घालून त्रास देणे किंवा कचरा फेकणे कायद्याने गुन्हा आहे. असे करणार्यांना केंद्र सरकारच्या वन्यजीवन(संरक्षण) कायदा 1972(दुरुस्ती 1991) मधील कलम ३८ ज. विभाग 51(1-ब) नुसार 2000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा/आणि सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.
 • Use of plastic is banned in the zoo so please carry your eatables in cloth or paper bags.
 • प्राणी संग्रहालयात प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आहे. सोबतचे खाद्यपदार्थ कागदी किंवा कापडी पिशवीमध्ये आणावेत.
 • बाटली वापरण्यासाठी १० रुपये डिपॉझिट भरुन त्याची पावती घ्यावी. परत जाताना ही पावती दाखवून डिपॉझिट परत केले जाईल.
 • प्राणी संग्रहालयाच्या आवारात गुटखा आणि सिगरेटला बंदी आहे.
 • आग पेटवणे किंवा अन्न शिजवण्यास बंदी आहे
 • स्फोटके, शस्त्रे किंवा फटाके बाळगण्यास बंदी
 • उद्यानात जोरात गाणी लावून किंवा खेळ खेळून पर्यावरणात व्यत्यय आणू नका
 • उद्यानात पाळीव प्राण्यांना परवानगी नाही
 • प्राणी संग्रहालयातील मालमत्तेचे नुकसान करणे कायद्याने गुन्हा आहे
 • फुलांना झाडांवरच राहू द्या
 • नो एंट्री परिसरात जाऊ नका
 • नेमून दिलेल्या रस्त्यांवर चाला आणि बसण्यासाठी उपलब्ध जागांचाच वापर करा
 • तुमच्यासोबत आलेली लहान मुले आणि सामानाची काळजी घ्या
 • माहितीफलकावर दिलेल्या सूचनांचे पालन करा

Sinhagad Fort, ,Pune, Maharashtra

Sinhagad Fort, Pune

 

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

कल्याण दरवाजा

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

इतिहाससंपादन करा

सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार

याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीतहोता. [[दादोजी कोंडदेव]] हे आदिलशहाकडून सुभेदारम्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [[इ.स. १६४९]] मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोडहा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.

पुणे दरवाजा

सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.

पहा सिंहगडाची लढाई

आजचा सिंहगड

या युद्धाबाबत सभासद

बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, ‘कोंडाणा आपण घेतो’, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, ‘गड आला, पण सिंह गेला’.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

सिंहगडावरील माहितीफलकानुसारसंपादन करा

सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.
अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.
शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.
दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्‍न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.
इतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड’ झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे..
शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

छायाचित्रेसंपादन करा

गडावरील ठिकाणेसंपादन करा

दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उद्‌ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर’ : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.

उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.

राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्याा राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्च इ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

गडावर जाण्याच्या वाटासंपादन करा

सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.

मार्ग
स्वारगेट – आनंदनगर – वडगांव – खडकवासला – सिंहगड पायथा.

स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.

%d bloggers like this: