Tag: marathi essay aai sampavar geli tar

वाड्याचे आत्मवृत्त

वाड्याचे आत्मवृत्त

माझे शनिवार पेठेतील काका नविन जागी स्थलांतरीत होणार आहेत कारण त्यांच्या जुन्या वाड्याच्या जागी तो पाडुन नविन मोठ्ठी इमारत उभी रहाणार आहे. म्हणुन शेवटचं म्हणुन एकदा आम्ही काल त्यांच्याकडे गेलो होतो. हा वाडा खुप जुना म्हणजे अगदी शंभर एक वर्षापुर्वीचा तरी असेल.

लहानपणी जेंव्हा जेंव्हा मी काकाकडे रहायला यायचो तेंव्हा इथे खेळायला खुप मज्जा यायची. वाड्यात सहज एक फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. वाडा पडका झाला असला तरी जुन्या संस्कृतीच्या खुणा अजुनही दिसत होत्या. काहि दिवसांनी हा वाडा पडणार, काय चाललं असेल या वाड्याच्या मनात?

मी विचार करायचा आवकाश आणि काय आश्चर्य मला वाड्याचे आत्मवृत्त चक्क ऐकु येऊ लागले.

काही दिवसांनी माझी मोडतोड सुरु होणार. मोठ्ठ मोठ्ठी यंत्र, असंख्य माणसं दिवस-रात्र माझ्या शरीरावर जखमा करणार, माझ्या एकेकाळच्या दिमाखदार अस्तीत्वाला खिंडार पाडणार आणि त्याला पडलेल्या भगदाडातुन वर्षानुवर्ष जपलेली संस्कृती, जुन्या आठवणी, इतिहासाच्या खुणा भळभळणाऱ्या त्या जखमांतुन वाहुन जाणार. एकेकाळी वाडे हे वैभव होते. ते वैभव आता लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. कधीकाळी माझ्या या अजस्त्र विस्तारामध्ये नाही म्हणलं तरी सुमारे ६०/७० भाडेकरू किमान शंभर वर्षे ही वाडा-संस्कृती अनुभवत होते, जगत होते. वाडय़ातील ही बिऱ्हाडे केवळ वेगवेगळ्या खोल्यांत राहायची इतकेच वेगळेपण. बाकी सारा वाडा हे खरोखरच एक कुटुंब होते. प्रत्येका घरची सणं, वाढदिवस, आनंदाचे क्षण हे त्या घराचे नसुन पुर्ण वाड्याचे होते.

कुणाला दुखलं-खुपलं, कुणावर अचानक आजारपण कोसळलं, तर अख्खा वाडा मदतीला जाउन जायचा. लेकरांची आडनावं नुसती वेगवेगळी, नाहीतर कुणाचं दुपारचं जेवण एकाकडे तर संध्याकाळचा चहा दुसरीकडे असायचा. खिरापती, वाडय़ातील हनुमान जयंती, कोजागीरी पोर्णीमा, अंगणातील भेळीचा कार्यक्रम, उन्हाळ्यातील वाळवणे.. अशा कित्ती आठवणी, आणि कित्ती पिढ्यांच्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये तश्याच्या तश्या ताज्या आहेत. गेल्या कित्तेक वर्षांपासुन साजरी होणारी दिवाळी म्हणजे तर खरोखरच मोठ्ठा सण असायचा. साठ-सत्तर घरांवर जेव्हा आकाशदिवे लागत तेव्हाचे दृश्य मी आजही विसरू शकत नाही.

पेशव्यांच्या काळात बांधलो गेलो तेंव्हाचा माझा थाट.. अहाहा.. काय सांगावं. चंदनाची लाकडं, काचेची मोठ्ठाल्ली झुंबर, खिडक्यांवर वा़ऱयाच्या झुळकीने हलणारे मलमली पडदे, रात्रीच्या अंधारात असंख्य पणत्या आणि मेणबत्यांच्या प्रकाशाने उजळुन निघालेले ते अंतरंगाची बात काही औरच होती. पण आज? परिस्थिती आज पडतो का उद्या अशीच आहे. गळकी छपरे, कुजलेल्या, फुगलेल्या भिंती, फरशा तुटलेल्या अशा अवस्थेतील अनेक भाऊबंद पेठांमध्ये दिसुन येतात. वाड्याचे मालकही आजकाल वाड्याच्या डागडुजीवर पैसा खर्च करायला तयार नाहीत. उलट वाडा पाडून नवी इमारत उभारली तर त्यातून मिळणाऱ्या पैश्याचे आकर्षणच सर्वांना आहे. शिवाय सुमारे ५० ते १०० वर्षांपूवीर् बांधलेल्या वाड्यांचे आयुष्यही आता संपत आले आहे. काही वाड्यांवर कितीही पैसा ओतला तरी त्यांचे जतन अवघड आहे. त्यामुळे जीवितहानी वाचवायची असेल आणि भाडेकरूंनी चांगल्या परिस्थिती रहावे, असे वाट असेल तर लवकरात लवकर वाडे पाडणे हेच त्यावर उत्तर आहे असेच आजच्या तरूण पिढीचे मत पडत आहे.

पुढील पिढीला ही संस्कृती समजावी, यासाठी काही वाडे जतन करणे आवश्यक होते. पण त्याला आता उशीर झाला आहे. उत्तरेत अनेक हवेल्या उत्तम रीतीने जतन करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे मात्र या सांस्कृतिक ठेव्याची उपेक्षाच झाली. सामान्यांचेच नव्हे; तर पेशवे काळातील अनेक सरदारांचे सात-सात चौकी देखणे वाडेही दुर्लक्ष केल्याने पडले आहेत. पुर्वीच्या काळी जेंव्हा आम्ही बांधलो गेलो तेंव्हाचे बांधकाम माती आणि लाकडाचे होते. तेव्हा जागा मुबलक होती. पैसा होता आणि लोकसंख्या कमी होती. नंतर मात्र चित्र पालटले. भाडेकरूंची भाडी तेवढीच राहिली आणि देखभालीचा खर्च वाढत गेला. लाकूड आणि मातीच्या बांधकामामुळे एका वाड्याच्या डागडुजीचा खर्च आता लाखात गेला आहे.

काळाच्या ओघात लोकांच्या वर्तनातही फरक पडला. षटकोनी कुटूंबाचे चौकोनी आणि आता त्रिकोणी कुटुंब होत आहे. जमान्याचा वेग वाढला आणि सर्व जण आप-आपल्या व्यापात मन्ग झाली. लोकांना आपली प्रायव्हसी जास्त महत्वाची वाटु लागली आणि यामुळेच वाड्यात रहाणारा भाडेकरु बाहेर पडुन फ्लॅट्स मध्ये विसावला. एकेकाळी सर्वांच्या जिव्हाळ्याचा, एकात्मतेचा, ऐश्वर्याचा प्रतिक समजला जाणारा वाडा वाहत्या काळात ‘आऊटडेटेड’ झाला.

धोकादायक वाड्यांसाठी नवीन योजना राबवण्याचा विचार पालिका करतेच आहे. पण त्याचबरोबर जे वाडे आणखी ५० वषेर् टिकू शकतात, त्यांचे योग्य जतन करण्यासाठीही पालिकेनेच पुढाकार घेतला तर हा ऐतिहासिक ठेवा निश्चितच आकर्षण ठरू शकेल.

वाड्याच्या त्या परिपक्व विचाराने माझ्या मनावर फार मोठा परीणाम केला. एकीकडे त्याला आपल्या पडण्याचे नष्ट होण्याचे दुःख होते, तर दुसरीकडे त्याला त्या मागची कारणं सुध्दा माहीती होती आणि तो चक्क त्याचे समर्थनच करत होता. हे करत असतानाच त्याला दुर्दम्य आशावादही होता की निदान जे वाडे अजुन काही वर्ष आपली मुळे रोवुन राहु शकतात त्याबद्दल हा बदलता मानव नक्कीच काळजी घेईल.

आई-वडीलांची हाक ऐकुन मी बाहेर पडलो. कडेच्या मोकळ्या पटांगणात जेसीबी सारखी मोठ्ठी यंत्र येऊन थांबली होती, आज नाही तर उद्या असंख्य वर्षांची, असंख्य पिढ्यांची, इतिहासाच्या
आठवणी मनामध्ये साठवलेल्या त्या वाड्यावर पहिला वार करण्यासाठी.

माझे आवडते संगीतकार

माझे आवडते संगीतकार

 

“रोजा”, “बॉम्बे”, “दिल से” सारख्या संवेदनशील चित्रपटांच्या संगीतामुळे हिंदी चित्रपट सृष्टीला त्यांची ओळख झाली. ‘ताल’ सारख्या ठेका धरायला लावणाऱ्या संगीतामुळे ते लोकप्रिय झाले आणि ‘जय होsss!’ च्या वेळेस तर त्यांनी पुर्ण जगाला आपल्या संगीताने वेड लावले.

१९९० मध्ये त्यांनी आपल्या संगीत काराकिर्दीची सुरुवात केली आणि इतक्या कमी काळात त्यांनी १३ फिल्म-फेअर, ४ नॅशनल, १ बाफता, १ गोल्डन ग्लोब आणि ३ ऍकेडमी पारीतोषीक पटकावली.

सर्व तरूणाईच्या गळ्यातले ताईत बनलेले, मितभाषी, थोडेसे लाजाळु असे अल्लाह रखा रहमान, अर्थात ‘ए. आर. रहमान’ हेच माझे आवडते संगीतकार आहेत.

‘ए. आर. रहमान’ यांचा जन्म चैन्नई मध्ये एका मुडलीयार-तामीळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील आर.के.शेखर हे सुध्दा चैन्नईमधे संगीत क्षेत्रातच कार्यरत होते. ‘ए. आर. रहमान’ यांच्या तरूणपणीच त्यांच्या वडीलांचे छ्त्र हरपले आणि घर चालवण्यासाठी त्यांना घरातील संगीत-उपकरणे भाड्याने द्यावी लागली. ‘ए. आर. रहमान’ यांना त्यांच्या मातोश्री- करीमा यांनी मोठे केले.

लहानपणापासुनच ‘ए. आर. रहमान’ यांना संगीताचे वेड होते. वयाच्या ११व्या वर्षीच इलयराजा यांच्या संगीतकांमध्ये त्यांचा समावेश झाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळुन बघीतले नाही.

संगीतामध्ये तांत्रीक-क्रांतीचा, संगणकाचा, अनेक तुकड्यांत संगीत ध्वनीमुद्रीत करुन ते एकत्र जोडण्याचा पायंडा ‘ए. आर. रहमान’ यांनीच पाडला आणि एका वेगळ्याच संगीत-क्षेत्राची मुहुर्त-वेढ त्यांनी रोवली असे म्हणल्यास ते वावगे ठरु नये.

एक-दोनदा हुलकावणी दिलेल्या आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार पहिल्यांदा भारतात आणले ते आपल्या ‘ए. आर. रहमान’ यांनीच.

जगभरात भारताचे नाव दैदीप्यमान करणारे ‘ए. आर. रहमान’ हेच माझे आवडते संगीतकार आहेत यात शंकाच नाही.

vachaltrvachal marathi essay

वाचाल तर वाचाल – मराठी निबंध (Essay on Vachal Tar Vachal in Marathi)

 

vachaltrvachal marathi essayवाचाल तर वाचालहा तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध विषय आहे. खूप साऱ्या निबंध पुस्तकांत या वर निबंध मिळतील, आणि आता तर वाचाल तर वाचाल मराठी निबंध इंटरनेट वरही मिळतील. आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला थोडा वेगळा निबंध देण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा करतो तुम्हाला आवडेल. आवडला तर ५-स्टार रेटिंग नक्की द्या.सर्वसाधारण लोकांची धारणा असते कि वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट, पण हे साफ चुकीचे आहे. वाचन खूप महत्वाचे आहे, आणि आत्ताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात, वाचनाला पर्याय राहिलाच नाही. ज्याने आपने ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तो मागे राहील यात काही दुमत नाही.

“वाचाल तर वाचाल” याचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपणास पहिल्यांदा काही गैरसमज दूर करावे लागतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साधारण लोक समजतात की वाचन हे शाळा, महाविद्यालयापर्यंत मर्यादित आहे. हे समजण्यासाठी आपल्याला दोन इंग्रजी शब्द समजून घ्यावे लागतील, एडुकेशन (Education) आणि लर्निंग (Learning). तसे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले जातात, पण यांत खूप मोठा फरक आहे. एडुकेशन म्हणजे शाळेत, महाविद्यालयात जी एक औपचारिक शिक्षण प्रक्रिया असते, जी एका ठराविक वेळे नंतर थांबते ती. एडुकेशन हे दुसऱ्यांकडून मिळते, म्हणजे शिक्षक, गुरु आदी. त्याच्या परे लर्निंग जन्मापासून मृत्यू पर्यंत चालू राहते. ही अनौपचारिक शिक्षण प्रक्रिया आहे, यात परीक्षा नसते, गुण नसतात. मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. एडुकेशन महत्वाचे आहेत, पण लर्निंग खूप महत्वाचे आहे. आणि दोन्ही मध्ये प्रगती करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. एडुकेशन आपणास गणित, विज्ञान, समाजशाश्त्र आदी शिकवते, नोकरी मिळवण्यास मदत करते. पण लर्निंग आयुष्य जगायला शिकवते, आनंदी राहायला शिकवते.

नोकरी आयुष्यात महत्वाचा भाग आहे पण नोकरी पलीकडे पण खूप काही शिकावे लागते. चार लोकांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलावे, इंटरनेट वापराने, बिल भरणे, जागा, घर नावावर करणे, योगा, डाएट, बँक, कर व्यवहार अश्या हजार गोष्टी शिकाव्या लागतात. आणि या शाळेत शिकवल्या जात नाहीत, त्यासाठी वाचन करावेच लागते. किंवा कोणी तज्ज्ञ व्यक्तीकडून ते अर्जित करावे लागते. पण असे तज्ज्ञ दरवेळी मिळतीलच असे नाही, त्यामुळे वाचन हे करावे लागतेच.

आत्ताच्या तांत्रिक प्रगतीमुळे “वाचाल वर वाचाल” या म्हणीचा अर्थच बदलला आहे. जेव्हा ही म्हण प्रचलित झाली तेव्हा माहिती किंवा ज्ञान वाटपाचे नेमकेच प्रकार होते. मुख्य म्हणजे शाब्दिक प्रकार, पुस्तक, कादंबरी आदी च्या रूपात. आजच्या डिजिटल क्रांतीने ज्ञान वाटपाचे नव-नवीन प्रकार सादर केले आहेत. आज ज्ञान हे इमेजेस, विडिओ, इन्फोग्राफिक्स, चार्ट्स, ऍनिमेशन, सिम्युलेशन, वर्चुअल रिऍलिटी च्या माध्यमात प्रसारित केले जाते. त्यामुळे वाचन म्हणजेच ज्ञानार्जन खूप सोपे झाले आहे, आता वाचनालयात जावे लागत नाही; सर्व काही मोबाईल फोन वर मिळते.

आताच्या जगात फक्त वाचनापर्यंत मर्यादित राहून जमणार नाही, मिळालेल्या ज्ञानावर विचार, मनन केले पाहिजे आणि त्याच्यावर अमल सुद्धा केले पाहिजे. मिळालेले ज्ञान वाटले पाहिजे,त्याने ते वाढते; त्यावरती कृतीही केली पाहिजे.

वाचनासाठी नवीनतम सोयी आता उपलब्ध आहेत, आणि आजच्या बदलत्या आणि माहिती प्रधान जगात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाहीच. वाचाल तर वाचाल या पेक्षा मी तर म्हणेन वाचाल तरच वाचाल”.

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays निबंध लेखन हा विद्यार्थ्याच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे, अगदी प्राथमिक शाळेपासून MPSC च्या परीक्षेपर्यंत निबंध लिहावे लागतात. एवढेच नाहीतर काही फॉरेन युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन साठी सुद्धा निबंध लिहायला लागतात. पुढे, जाऊन काही जॉब्स मध्ये देखील निबंध, थिसीस, लेख, स्टोरीज लिहाव्या लागतात.

माणूस हा विचारशील प्राणी आहे, खूप सारे विचार त्याच्या मनात सतत दवडत असतात. पण जर का ते विचार दुसऱ्याला सांगायचे असतील, पटवून द्यायचे असतील तर त्या विचारांची सुयोग्य गुंफण करता येणे खूप गरजेचे असते. आणि हेच काम निबंध करते, म्हणून निबंधाला शैक्षणिक क्षेत्रात एवढे महत्व आहे. विद्यार्थी निबंध लेखनाने लेखन शैली, विचारांची मुद्देसूद मांडणी शिकतात. हे कौशल्य तुम्हाला तुमच्या भविष्यातही उपयोगी पडू शकते. पण विचारांची, मुद्दे, त्यातही, मत, अनुभवांची मांडणी योग्य भाषेत आणि योग्य संरचनेत करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays

आज इथे आपण शिकणार आहोत कि मराठी निबंधांचे किती प्रकार आहेत, आणि ते कसे लिहायचे. तसे तर निबंधाचे खूप प्रकार आहेत, पण इथे आपण त्यांना मोजक्या श्रेणीत मांडण्याचा प्रयत्न करूयात.

  • वर्णनात्मक निबंध (Descriptive Essay)

वर्णनात्मक निबंधामध्ये लेखकाला शब्दांनी चित्र रंगवायचे असते, लेखक यातून व्यक्ती, भावना, जागा, अनुभव, वस्तू, परिस्थिती, आठवणी यांचे वर्णन करू शकतो. वर्णनात्मक निबंधामध्ये फक्त नावापुरते वर्णन न करता, शब्दांतून वाचकाच्या हृदयात हात घालायचा असतो. इथे विषयाचे वर्णन शब्दांनी रंगवावे लागते, आणि ते चित्र वाचकाला दिसून आलं पाहिजे.
उदाहरणे : माझा पहिला प्रवास, मला पडलेलं स्वप्न, माझा मित्र

  • कथा निबंध (Narrative Essay)

कथा निबंधामध्ये लेखक स्वतःच्या अनुभवातून गोष्ट सांगतो. तसा हा निबंध प्रकार वरकरणी सोपा वाटतो पण या मध्ये लेखकाला आपल्या अनुभवांबद्दल विचार करावा लागतो, त्यांची योग्य सांगड घालून योग्य शब्दांचा वापर करावा लागतो. अधिकांश वेळा कथा निबंध प्रथम पुरुषामध्ये लिहतात, मी, माझा असे शब्द वाचकाला तुमच्या निबंधातल्या गोष्टीत गुंतवून ठेवतात.
उदाहरणे: शाळेचा पहिला दिवस, उन्हाळ्याची सुट्टी,

  • विवरनात्मक निबंध (Expository / Explainotary Essay )

विवरनात्मक निबंध या प्रकारामध्ये लेखक दिलेला विषय मांडतो व तथ्ये आणि योग्य उदाहरणे, पुराव्यानी पटवून देतो. हा निबंध प्रकार तुम्हाला थोडासा वर्णनात्मक निबंधाचा सारखा वाटेल पण या प्रकारमध्ये तुम्हाला तथ्ये आणि पुरावे द्यायचे असतात; यात लेखक आपल्या भावना नाही दाखवू शकत. सोदाहरण आणि दृष्टांतयुक्त, तुलना आणि विरोधाभास, कारण आणि परिणाम, श्रेणीकरण आणि वर्गीकरण निबंध सुद्धा या प्रकारात मोडतात.
उदाहरणे: जीएसटी चे परिणाम, विमुद्रिकरण: शाप कि वरदान, इंटरनेट चे महत्व आदी

  • प्रेरक निबंध (Persuasive Essay)

या प्रकारामध्ये वाचकाला तुमचा विषय किंवा मुद्दा पटवून द्यायचा असतो, पण तथ्ये आणि पुराव्यांसोबत. यात तुम्ही दिलेला विषय मांडता आणि तो उदाहरणे, डेटा, रेफेरेंन्सस द्वारे पटवून देता. यात तुम्ही मुद्द्याच्या दोन्ही बाजू मांडू शकता पण त्या पटवून देता आल्या पाहिजेत. थोडक्यात लेखकाला वाचकाचे मन वळवायचे असते.
उदाहरणे: जातीवाद, आरक्षण, जीएसटी, सोशिअल मीडिया आदी

निबंधांचे आणखी काही पोट प्रकार आहेत, जसे व्याख्या, कारकीर्द, एडिटोरिअल्स, ओपेड्स, पिक्टोरल ऐसे इत्यादी पण ते वर दिलेल्या मूळ प्रकारांमध्ये मोडतात.

आम्ही आशा करतो कि या लेखामध्ये तुम्हाला विवीध निबंधांचे प्रकार कळले असतील आणि याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात उपयोग होईल. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर खालीदिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता, किंवा हि माहिती शेअर हि करू शकता. धन्यवाद!!

 

My Favourite Festival Diwali Marathi Essay

My Favourite Festival Diwali Marathi Essay

माझा आवडता सण दिवाळी – मराठी निबंध ,भाषण, लेख

अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण असतो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दीपावलीच्यावेळी अनेक दिव्यांची किंवा दीपांची झगमगाट आणि लख्ख असा प्रकाश सगळीकडेच पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळीकडे रंगबेरंगी फटाके आणि सर्वांच्या घरोघरी विद्युत रोषणाई,आकाशकंदील पाहायला मिळतात. त्यामुळेच तर या सणाला दीपावली असे म्हणतात. दिवाळी हा सण जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. असे पुर्वजांना आढळले आहे. परंतु काहीलोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यादिवशी दिवाळी हा सण साजरा करतात. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एका वेगळ्याच आनंदात हा सण येतो. यावेळी शेतकरीसुद्धा सुखावलेले असतात कारण त्यांच्या हाती नवीन पिके आलेली असतात. त्यामुळे शेतकरी पण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीच्या वेळेस लक्षमीपूजनाच्या दिवशी शेताची आणि शेतीच्या अवजारांची ते पूजा करतात. गुरांचीसुद्धा पूजा करतात आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला आपल्या भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते. My Favourite Festival Diwali

 

My Favourite Festival Diwali - Marathi Essay,Speech, Writing

My Favourite Festival Diwali Marathi Essay

 

सहामाही परीक्षा झाल्यानंतर आम्हाला दिवाळीची सुट्टी असते. परीक्षेच्याआधी जेव्हा शिपाईकाका वेळापत्रक आणतात तेव्हा आम्ही सर्वच मित्र-मैत्रिणी परीक्षेचे वेळापत्रक पाहताना परीक्षा कधी आहे हे पाहण्याआधी दिवाळीची सुट्टी कधी आहे हे पाहतो. सहामाही परीक्षा झाल्यांनतर मोठ्या उत्साहाने आम्ही सर्वजण दिवाळीच्या तयारीला लागतो. मी घरातील साफसफाई करण्यात आईला मदत करते. त्यानंतर दिवाळीच्या ४-५ दिवस अगोदर सर्व फराळ बनवण्यास मदत करते. आम्ही दोघी मिळून सर्व फराळ बनवतो कारण सर्व नातेवाइकांना फराळ द्यायचा असतो. तसेच दिवाळीच्या अगोदर आम्ही आमच्या सोसायटीच्या परिसरात सर्व मित्र-मैत्रिणी मिळून किल्ला बनवतो. आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतो. त्या किल्ल्यावर आम्ही धान्यसुद्धा पेरतो त्यामुळे दिवाळीपर्यंत किल्ला खूप मस्त दिसतो कारण पूर्ण गावात उगवलेले असते. किल्ल्यावर आम्ही वेगवेगळी चित्रे मांडतो.

त्यामध्ये शिवाजी महाराजांसाठी आसन तयार करतो त्यावर दरवर्षी शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ठेवतो. किल्ल्याच्या आजूबाजूला गुहा,विहीर तयार करतो. किल्ल्याचे दरवाजे आणि तटरक्षक भिंती तयार करतो. खूप मजा येते किल्ला बनविताना. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आम्ही भाऊ-बहिणी सकाळी लवकर उठतो. दररोज आई आम्हाला सर्वांना उटणे लावून अंघोळ घालते. नंतर दिवाळीसाठी घेतलेले नवीन कपडे घालून आम्ही फटाके उडविण्यासाठी जातो. सर्व मित्र-मैत्रिणी नवीन नवीन कपडे घालून मस्त आवरून आलेले असतात आम्ही खूप धमाल मस्ती करतो आणि सायंकाळीसुद्धा आम्ही खूप फटाके वाजवतो. त्यानंतर सायंकाळी एकत्र बसून आम्ही फराळाचा आस्वाद घेतो.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारसेला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. आपल्या भारताची संस्कृती ही कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाचे महत्व फार विशेष आहे. वसुबारसपासूनच सर्वांच्या घरोघरी दारामध्ये दिवे लावले जातात तसेच विद्युत रोषणाई केली जाते. या दिवशी गाईची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी यादिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करतात. घरातील सुवासिनी बायका या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालतात त्यानंतर गाईची पूजा करतात गाईंना हार घालतात. त्यानंतर गाय आणि वासरू दोघानांही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. ह्या दिवशी बऱ्याच स्त्रियांचा उपवास असतो. आपल्या मुलांना आणि घरातील सर्वांना चांगले आरोग्य लाभावे आणि सुख-समाधान लाभावे म्हणून ही पूजा करतात. वसुबारसेच्या दिवशी गाईला बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी याचासुद्धा नैवेद्य दाखवतात. मी माझ्या आईसोबत गाईची पूजा करण्यासाठी जाते. आम्ही गाईची पूजा करतो तिला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखवतो. या दिवसापासूनच मी दारात रांगोळी काढण्यास सुरुवात करते. दिवाळीचे सर्व दिवस आम्ही दारात रांगोळी काढतो.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवशी धने आणि गुळाच्या प्रसादाला खूप महत्व आहे. या दिवशी पूजेसाठी घरातील धन,दागिने आणि धने अशा वस्तू पूजेसाठी ठेवल्या जातात. त्यानंतर येते ती नरकचतुर्दशी या दिवशी सर्व लहान मुले लवकर उठून सुगंधी उटण्याने अंघोळ करून नवीन कपडे घालतात आणि सर्वजण मिळून फटाके वाजवतात. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा आहे. श्रीकृष्णांनी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीखान्यातल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस दुष्ट नरकासुराचा वध करून आनंद साजरा करण्याचा. या दिवशी भारतात अनेक ठिकाणी नरकासुराचा पुतळा जाळतात,फटाकेसुद्धा वाजवतात आणि उत्साह साजरा करतात. नरकचतुर्दशीनंतर येते ते लक्ष्मीपूजन यादिवशी आम्ही घरी पुरणपोळी बनवतो. देवाला पुरणपोळीचा आणि फराळाचा नैवेद्य दाखवतो. यादिवशी आरोग्यलक्ष्मी(केरसुणी) हिची पूजा खूप महत्वाची असते. तसेच यादिवशी पूजेमध्ये लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती,दागिने,सोने-नाणे,पैसे,धने अशा सर्व वस्तू पूजेमध्ये ठेवतात. देवीची पूजा आई मनोभावे मांडते आणि तिची पूजा करते. ११ किंवा २१ पणत्या एका ताटामध्ये लावून देवीसमोर ठेवते. मग आम्ही सर्वजण मिळून पूजा आरती करतो. मनोभावे नमस्कार करतो. मग मी देवीला पुरणपोळी आणि फराळाचा नैवेद्य दाखवते. मग आम्ही पूजा झाल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी मिळून खूप फटाके वाजवतो.

  My Favourite Festival Diwali Marathi Essay

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त. ह्या दिवशी अनेक नवीन प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी बरेच लोक सोने खरेदी करतात,तर कोणी नवीन घर घेत,कोणी नवीन वस्तू खरेदी करत. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला भेट म्हणून एखादी वस्तू,दागिना किंवा साडी भेट देतो. त्यानंतर येते ती भाऊबीज. भाऊबीजेचा दिवस म्हणजे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावांसाठी दिव्यांची आरास करतात आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करतात. ओवाळून झाल्यानंतर आपल्या भावाला नारळ आणि करदोरा देतात. अशी ही दिवाळी पाच दिवसांची असते. दिवाळी कधी संपते ते उत्साहाच्या भरात कळतही नाही.

आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या प्रदूषणामुळे बरेच लोक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करतात.तसेच शाळा आणि काही सामाजिक संस्थासुद्धा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संदेश देतात. आपला देश हे आपले घर किंवा आपला परिसर समजून आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर फटाके कमी आवाजाचे वाजवले पाहिजेत आणि फटाक्यांचा वापर कमीत कमी करून दिवाळी साजरा केली पाहिजे. तरच ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण रोखता येईल. आणि आपल्या सर्वांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करता येईल.

for more information – https://marathiinfopedia.co.in

%d bloggers like this: