तरी भी जय भिम बोलतोस

Tari bhi jay bhim boltos

तरी भी जय भिम बोलतोस

देवाला मानतोस
जातोस पंढरपुरला
अंगारा आणतोस
दगडांचा बोलबाला

रात्रीचा तु टाईट
करतोस फाईट
शिव्यांचा तु दास
म्हणतोस मी खास

दादागीरी तुझी संगत
जुगारीत झालास अंधत
तोंडात घालतोस मावा
खिशात तुझ्या तंबाखु चुना

झालास तु मोठा
आहेस तु खोटा
लबाडगिरी करुनी थाटात
पैसा घातलास पोटात

कोणाला राग आला तर माफ करा
जय भिम

Leave a Reply