Today’s Young Generation

आजची तरुणाई मराठी निबंध

मराठी निबंध

तरुण म्हटलं कि आठवत ते एक धगधगत सळसळत तरुण रक्त ज्याच्यामध्ये लाथ मारेल तिथ पाणी काढण्याची धमक असते. ज्याच्या जिभेतुन निघणार्या प्रत्येक शब्दाला धारदार शब्दाची पात असते, देश ज्याच्या खांद्यावर उद्याच्या विकासाची स्वप्ने पाहतो तो तरुण. पण काल एकाच दिवशी काही बातम्या वाचनात आल्या, पहिली होती कि आईने पैसे दिले नाहीत व सारखी शेतात जा काम कर अस म्हणते म्हणून २२ वर्षाच्या युवकाने स्वताच्या जन्मदात्या आईचा खून केला. वाचून खूप वाईट वाटले मन सुन्न झाले तोपर्यंत दुसरी बातमी होती कि एका अल्पवयीन मुलीला एका युवकाने लग्नाचे आमिष दाखऊन बलात्कार केला होता. तर तिसरी बातमी होती कि, भर रस्त्यात आंतरजातीय विवाह केला म्हणून एका युवकावर काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला .
या सगळ्या बातम्या वाचून मन सुन्न झाले कारण हे वाचाण्याआगोदर माझ्या हातात स्वामी विवेकानंदांचे पुस्तक मी वाचत होतो. आणि मला प्रश्न पडला कि ज्या स्वामी विवेकानंदानी म्हटले होते कि मला फक्त १०० तरुण द्या मी त्या राष्ट्राचे भवितव्य घडउन दाखवतो. त्याच स्वामींच्या देशात अशा घटना घडतातच कशा ? खरेतर आपल्या देशाचा इतिहास पाहिता तर आपल्या देशाचा खूप मोठा इतिहास घडला तो तरुणांमुळेच. जेव्हा जेव्हा देशात संकट आली तेव्हा तेव्हा तरुण एक झाले आणि संकट परतावून लावली. संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, मंगल पांडे, भगतसिंग, विवेकानंद, सावरकर, आंबेडकर, यांच्याकडे पाहिलं कि जाज्वल्य इतिहासाचा अभिमान वाटतो. पण आज मात्र खूप वाईट वाटतंय कि थोर महापुरुषांचा इतिहास घेऊन जगणारी आजची पिढी इतकी कशी भरकटली .. आजच्या तरुण पिढीला तरुण म्हणायला पण लाज वाटतेय कारण आजची तरुणाई दिसते ती दारू, गांज्या, गोवा, गुटखा, सिगारेट यासारख्या वाईट व्यसनात अडकलेली. आईवडिलांची सेवा न करता त्यांना वृद्धाश्रमात पाठवणारी. प्रसंगी त्यांच्यावर हात उचलणारी आणि हे सगळ पाहिल्यानंतर प्रश्न पडतोय कि खरच आजची तरुणाई आहे कुठे ??
एकवेळ होती जेव्हा तरुण म्हणायचे,
‘ तुम मुझे खून दो मी तुम्हे आझादी दुंगा ’
पण आजची आमची तरुणपिढी म्हणतेय,
‘ तुम मुझे तंबाखू दो मी तुम्हे चुना दुंगा ’
व्यसनेच्या आहारी गेलेली आजची पिढी पाहून खूप वाईट वाटते कारण महासात्तक भारताचे स्वप्न कलामांनी याच तरुणांच्या जीवावर पहिले असताना आजची ही तरुणाई मात्र भरकटत आहे. एकीकडे महासत्तेच्या जवळ पोहोचणारा भारत दुसरीकडे मात्र तरुण पिढीला दूर लोटतोय कि काय असा प्रश्न पडतोय. वेळ बदलालील काळ बदलला तसे दुनियाही बदलली पशात्य देशाच अनुकरण करताना आमची तरुणाई मात्र स्वताच्या देशाची आदर्श संस्कृती मात्र विसरत चाललेय. इंटरनेटने जग जवळ आले मात्र माणसातील माणुसकी मात्र संपत चालली. संवेदना हरवलेली तरुणाई अडीच अक्षरी प्रेमात वेडी झाली झाली आणि एकतर्फी प्रेमातून हल्ला करू लागली. तर दुसरीकडे कधीच न जाणारी जात डोके वर काढताना एखाद्याने जर आंतरजातीय विवाह केला तर त्याचा भरदिवसा खून होऊ लागला. जात, पात, धर्म यात अडकलेली तरुणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार असा केविलवाणा प्रश्न पडतोय. ज्या आईवडिलांनी जन्म दिला लहानाचे मोठे केले त्याच आईवडिलांना घराबाहेर काढणारी तरुणाई एक दिवस या देशाचे वाटोळे करणार असे दिसते. पण जर हे होऊ द्यायचे नसेल तर सर्व तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असे सांगितले होते ते आता तरुण शिकले आहेत यांनी देशहितासाठी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे.. जर तरुणाई एक झाली तर इथे स्वराज्य निर्माण होते तरुण एकत्र झाले तर १५० वर्षाची गुलामी नष्ट होते हा आपला इतिहास आहे पण त्यासाठी साऱ्या तरुणांनी एकत्र येऊन उद्याच्या महासत्ताक भारतासाठी जगले तर कोणचीही जीभ उचलणार नाही कि आजची तरुणाई आहे कुठे म्हणायला.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply