Amazon Big Sell

वाक्याचे प्रयोग

वाक्याचे प्रयोग

प्रयोग – वाक्याचे महत्त्वाचे घटक तीन आहेत. कर्ता, कर्म व क्रियापद. क्रिया करणारा कर्ता. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म.
कर्ता व कर्म ह्यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुष ह्या संदर्भात असतो. क्रियापदाचे कर्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय.
मुरव्य प्रयोग तीन आहेत –
१) कर्तरी प्रयोग
२) कर्मणी प्रयोग
३) भावे प्रयोग
  
१) कर्तरी प्रयोग – कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथमा असते
 ब) कर्माची विभक्ती दुवितीया असते.
 क) कर्त्याच्या लिंग, वचनाप्रमाणे क्रियापद बदलते.
कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार – अ) सकर्मक कर्तरी ब) अकर्मक कर्तरी
आ) सकर्मक कर्तरी प्रयोग – कर्तरी प्रयोगात जर कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय –
उदा. सलोरव पुस्तक वाचतो. कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापद बदलते.
स्नेहल पुस्तक वाचते.
मुलगा चित्र काढतो. कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते.
मुले वित्र काढतात.
ब) अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगात कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग
उदा. स्नेहा हसते. नेहा झोपते. (कर्म नाही)
२) कर्मणी प्रयोग कर्माचे जे लिंग, वचन तेच लिंग, वचन क्रियापदाचे असते. अशा रचनेस कर्मणी प्रयोग म्हणतात.
कर्म प्रथमात असते. कर्माप्रमाणे क्रियापद चालते. कर्त्याची विभक्ती तृतीया असते.
उदा. अ) मिलापने पेरू र्वाल्ला. ब) कविताने सफरचंद रवाल्ले. क) अंकुशने काकडी रवाल्ली. (कर्मच्या लिंगबदलानुसार क्रियापद बदलते).
मिलापने पेरू रवाल्ला.
कविताने (तृतीया विभक्ती) सफरचंद (प्रथमा) रवाल्ले (लिंगबदल)
अंकुशने काकडी रवाल्ली.
आईने पेढा दिला. आईने पेढे दिले.
आईने – (तृतीया) पेढा (प्रथमा) दिला, (वचनबदल)
आईने पेढे दिले.
कर्माच्या क्चनानुसार क्रियापदाचे वचन बदलते.
३) भावे प्रयोग – जेव्हा क्रियापदाचे रूप कर्ता, कर्म यांच्या लिंग, वचन व पुरुष इ. वर अवलंबून नसते, तेव्हा ते नेहमी तृतीया पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असे स्वतंत्र असते. अशा रचनेला “भावे प्रयोग” म्हणतात.
उदा. तिने घरात रहावे. त्याने नोकरीस जावे.
भावे प्रयोगाचे प्रकार दोन आहेत.
अ) अकर्मक भावे 
ब) सकर्मक भावे
अ) अकर्मक भावे – ज्या भावे प्रयोगात कर्म नसते. तो अकर्मक भावे प्रयोग. त्याने उठावे. कर्ता तृतीयेत आहे.
समुद्रावर जाण्यास त्याला उजाडले. “त्याला” हा कर्ता चतुर्थीत आहे.
ब) सकर्मक भावे – ज्या भावे प्रयोगात कर्म असते, त्यास सकर्मक भावेप्रयोग असे म्हणतात.
उदा.
१) शिपायाने चोरास पकडले.
२) शिपायांनी चोरांना पकडले.-क्रियापद “पकडले” स्वतंत्र. कर्म-चोरास, चोरांना (द्वितीयेत).
कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात रूपांतर
कर्तरी                                                     कर्मणी
१) गाय गवत रवाते.                              गाईने गवत रवाल्ले.
२) सलोरव अभ्यास करतो.                    सलोरवने अभ्यास केला.
कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात रूपांतर
कर्मणी                                                            कर्तरी
१) स्नेहलने कविता लिहिली.                     १) स्नेहल कविता लिहिते.
२) मिलापने चित्र काढले.                        २) मिलाप चित्र काढतो.
स्वाध्याय – रवालील वाक्यांचा प्रयोग ओळरवा –
१) गाय चारा रवाते. २) मिलापने आंबा रवाल्ला. 3) स्नेहल दूध पिते. ४) सलोरव गोष्टीचे पुस्तक वाचतो.
५) अक्षयने नाटक पाहिले. ६) शिल्पा अभ्यास करते. ७) कोमलने चित्र पाहिळे
Asha Transcription

About admin

Check Also

वाक्य आणि वाक्याचे प्रकार

वाक्‍य वाक्‍य – पुऱ्या अर्थाच्या बोलण्यात दोन किंवा अधिक शब्द असतात. केव्हा केव्हा एका शब्दाने देखील …

Leave a Reply

Your email address will not be published.