सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती | vallabhbhai patel information in marathi

sardar vallabhbhai patel information in marathi: सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांनी केलेल्या साहसिक कार्यामुळे त्यांना लोहपुरुष म्हटले जाते. आज आपण याच लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची मराठी माहिती मिळवणार आहोत.

मित्रांनो आज आपण काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या ज्या विशाल भारताला पाहतो, या भारताची सर्वप्रथम कल्पना सरदार वल्लभ भाई पटेल यांनी केली होती. व त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपला देश एकजूट झाला. त्यांनी देशातील लहान-मोठे राजवाडे एकत्र करून एक सशक्त भारत निर्माणासाठी अखंड कार्य केले.

या लेखात देण्यात आलेली vallabhbhai patel information in marathi ही माहिती सखोल अभ्यास आणि तज्ज्ञ मंडळी च्या मार्गदर्शनात लिहिण्यात आली आहे. तर चला सुरू करुया…

vallabhbhai patel information in marathi
sardar vallabhbhai patel in marathi

Vallabhbhai patel information in marathi

जन्म व बालपण

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांचा नाडियाद या गुजरातमधील एका गावी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही परंतु त्यांच्या शालेय दाखल्यावरून त्यांची जन्म तारीख 31 ऑक्टोंबर 1875 सांगितली जाते.

वल्लभभाई पटेल यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई पटेल तर आईचे नाव लाड बाई होते. झवेरभाई हे एक साधारण शेतकरी होते. आपल्या पाच भाऊ बहिणीपैकी सरदार पटेल हे तिसरे होते. या शिवाय त्यांच्या कुटुंबात सर्वात लहान व सर्वांची लाडकी बहीण ‘दहिबेन’ होती.

लहापणापासुनच सरदार पटेल यांच्या शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सरदार पटेल आपल्या भावंडांसह शेतात वडिलांना सहायता करीत असत.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिक्षण

घरची आर्थिक स्थिती खराब असतांनाही सरदार पटेल यांच्या वडिलांना त्यांना उच्च शिक्षित करण्याचा निर्णय घेतला.

लहान असताना पटेल आपल्या वडिलांसोबत पेटलाद येथील एन. के. हायस्कूल मध्ये जात असत. तेथूनच त्यांनी 1896 मध्ये आपले हायस्कूल चे शिक्षण पूर्ण केले. शालेय दिवसात ते अतिशय हुशार व विद्वान होते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर, घराची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पटेल यांनी कॉलेज न जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर जवळपास 3 वर्षांपर्यंत त्यांनी घरीच राहून कठीण मेहनत व अभ्यास केला. यानंतर त्यांनी जिल्हा एडवोकेट ची परीक्षा दिली व या परीक्षेत ते चांगल्या गुणांनी पास झाले. नंतरच्या काळात त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली व देशसेवेसाठी आपले कार्य सुरू केले.

विनोबा भावे यांचे जीवनचरित्र वाचा येथे

सरदार वल्लभभाई पटेल यांचा विवाह

1891 साली 16 वर्षाच्या वयात पटेल यांचा विवाह जहावरबा पटेल यांच्याशी करण्यात आला. सरदार पटेल व जहावरबा बाई यांना दोन अपत्य झाली. यातील धायाभाई पटेल हे एका इन्शुरन्स कंपनीत काम करीत असत व दुसऱ्या मनिबेन पटेल या स्वातंत्र्य सेनानी होत्या.

सरदार वल्लभ भाई पटेल यांचे राजकीय कार्य Sardar Patel Marathi Mahiti

सरदार पटेल यांना आपल्या वकिलीच्या व्यवसायात कमालीची प्रसिद्धी प्राप्त झाली. नोव्हेंबर 1917 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनीही ब्रिटिश शासना विरुद्ध च्या आंदोलनात सहभाग घेण्यास सुरुवात केली.

खेडा सत्याग्रह

1917 साली त्यांनी असहकार आंदोलना साठी खेडा, बरसाड आणि बारडोली या गावातील गुजरातच्या शेतकऱ्यांना एकत्रित केला. त्याकाळात फक्त शेती हाच एकमेव भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले होते. परंतु इंग्रज प्रशासनाने शेतीवरील कर माफ न करता जसाच तसा ठेवला. अशा या बिकट परिस्थितीत गांधीजींसोबत मिळून सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांना एकत्रित केले. व शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ब्रिटिश शासनाविरुद्धच्या या आंदोलनाला ‘खेडा सत्याग्रह’ म्हटले जाते.

बारडोली सत्याग्रह

1928 साली सायमन कमिशन भारतात आले. या दरम्यान शासनाने शेतीवरील करही वाढविला होता. सायमन कमिशनच्या विरोधात सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनापुढे ब्रिटिश व्हाइसरॉय ला झुकावे लागले व त्याने शेतीवरील अत्याधिक कर माफ केला.

सरदार पटेल यांच्या सत्याग्रहामुळे लोकांमध्ये उत्साहाची लहर निर्माण झाली. बारडोली येथील महिलांनी त्यांना ‘सरदार’ ही उपाधी दिली.

सरदार पटेल यांचे स्वातंत्र्या नंतर चे कार्य (sardar patel biography in marathi)

15 ऑगस्ट 1947 ला देशाच्या स्वातंत्र्या नंतर भारताची परिस्थिती खूप गंभीर होती. पाकिस्तानाच्या वेगळे झाल्याने अनेक लोक बेघर झाली होती. त्याकाळात वेगवेगळे राजवाडे व रियासत राहत असत. प्रत्येक राज्य एक स्वातंत्र्य देशाप्रमाणे होते, ज्यांना भारतात सामील होणे पसंत नव्हते. या राज्यांना भारतात सामील करणे मोठे दिव्य होते. कारण अनेक वर्षांच्या गुलामगिरी नंतर राजवाड्याच्या राज्यांना कोणत्याही प्रकारची पराधीनता स्वीकार नव्हती.

सरदार पटेल यांनी आपल्या कूटनीती च्या बळावर सर्व राजवाड्यांना राष्ट्रीय एकीकरणासाठी तयार केले. परंतु जम्मू-काश्मीर, हैदराबाद व जुनागड या रियासाती भारतात एकत्रित होण्यास तयार नव्हत्या. शेवटी यांच्या विरूद्ध सैन्य कारवाई करून यांनाही भारतात एकत्रित करून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात आले.

देशातील सर्व राजवाड्यांचे एक संघीकरण करण्याचे हे कार्य नोव्हेंबर 1947 मध्ये, म्हणजेच स्वातंत्र्याच्या काही महिन्यातच पुर्ण करण्यात आले. या कार्याचा उल्लेख करताना गांधीजींनी म्हटले, “हे कार्य फक्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे शक्य झाले आहे”.

संपूर्ण विश्वाच्या इतिहासात सरदार पटेल यांच्या सारखे व्यक्ती झाले नाहीत, ज्यांनी कोणतीही हिंसा न करता सर्व देशांना एकत्रित केले. त्याकाळात संपूर्ण विश्वातील वृत्तपत्रांनी सरदार पटेल यांच्या बद्दल लेख छापले होते.

असे म्हटले जाते की जर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान सरदार वल्लभाई पटेल राहिले असते, तर आज असलेली भारत-पाकिस्तान समस्या राहिली नसती. परंतु स्वतंत्र भारताच्या प्रथम पंतप्रधान निवडणुकीत सरदार पटेल यांना बहुमत मिळालेले असतानाही महात्मा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना देशाचे प्रधान मंत्री बनवले. पंडित जवाहरलाल यांचे जीवचरित्र वाचा येथे.

सरदार वल्लभाई पटेल यांचा मृत्यू

1948 साली गांधीजींच्या मृत्युने व्यथित होऊन, सरदार पटेल यांचेही काही महिन्यातच 15 डिसेंबर 1950 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

देशाला एकत्रित करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या या महान नेत्याला जिवंतपणी तसेच मृत्यू नंतरही अनेक सन्मानानी गौरवण्यात आले.

सरदार पटेल यांना मिळालेले सन्मान

1947: सरदार पटेल यांना प्रसिद्ध अमेरिकन मासिक टाईम च्या प्रथम पृष्ठावर स्थान देण्यात आले.
1991: भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला.
2014: सरदार पटेल यांचा वाढदिवस, 31 ऑक्टोंबर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
2018: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोंबर 2018 ला स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण केले.

तर मित्रांनो हे होते सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांचे मराठी जीवन चरित्र. आशा करतोकी sardar patel marathi biography तुम्हाला आवडली असेल. या महितीला इतरासोबत ही शेअर करा.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *