वृक्ष नष्ट झाले तर निबंध मराठी | Vruksh Nasht Jhale Tar Marathi Nibandh

वृक्ष नष्ट झाले तर निबंध vruksh nasht jhale tar marathi nibandh: “वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी” संत तुकारामांनी या आपल्या वचनाद्वारे वृक्षांचे महत्व मांडले आहे. वृक्ष ही मनुष्य जातीसाठी किती महत्वाची आहे, याची प्रचिती प्रत्येक माणसाला आलेली आहे. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की जर वृक्ष नष्ट झाले तर? हा विचारच मुळात भयंकर आहे. परंतु याविषयी चे चिंतन देखील महत्वाचे आहे.

पुढील लेखात आम्ही आपणास वृक्ष नष्ट झाले तर या विषयावरील एक मराठी निबंध देत आहोत. हा निबंध आपण वाचवा आणि यातून वृक्षांचे असलेले महत्व समजून घ्यावे.

वृक्ष नष्ट झाले तर निबंध

वृक्ष नष्ट झाले तर निबंध मराठी (350 Words)

जर वृक्ष नष्ट झाले तर असा विचार करणेच कठीण आहे. कारण वृक्ष हेच मानव जातीचे आणि पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व आहेत. वृक्ष नष्ट झाली तर मानवी जीवनाची कल्पना करणे देखील कठीण आहे. कारण वृक्षा मुळेच आपले जीवन आहे. वृक्ष पृथ्वीवरील जीवसृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजन प्रदान करतात. जर या धरतीवर ऑक्सिजनच नसला तर कोणताही प्राणी श्वास घेऊ शकत नाही. जर वृक्ष नसतील तर मनुष्य देखील राहू शकत नाही.

झाडे झुडपे आणि वृक्ष निसर्गाची ती देन आहे, ज्यासाठी इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. वृक्ष आपले सर्वात घनिष्ट मित्र असतात. एखाद्या व्यक्तीद्वारे लावण्यात आलेले वृक्ष फक्त त्याच व्यक्तीला नव्हे तर त्याचे येणाऱ्या अनेक पिढ्यांना आश्रय देते. मनुष्या शिवाय वृक्ष ही पृथ्वीवरील इतर जीवसृष्टीला देखील आशय देतात. वृक्षांवर अनेक पशुपक्षी, जीव जंतू आपले घर करून राहतात.

जर वृक्ष नष्ट झाली तर… हा विचार करूनच अंगावर काटा येतो. वर्तमान परिस्थिती पाहता लक्षात येते की, आपणास वृक्ष वाचवण्याची जेवढी आवश्यकता आहे तेवढे प्रयत्न आपण करीत नाही. आपल्याला अजून प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून वृक्ष संवर्धन होईल. व आपल्या जीवनात खाण्यापिण्याच्या वस्तू, हवा, पाणी, वस्त्र इत्यादी गोष्टींच्या तुटवडा भासणार नाही. कारण या सर्व गोष्टी शेवटी वृक्षांकडूनच मिळतात.

जर वृक्ष नष्ट झाले तर आपले काय होईल? आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे, पुस्तके इत्यादी कुठून मिळतील? आणि जर या सर्व गोष्टी मिळाल्या नाहीत तर आपले शिक्षण देखील होणार नाही. लोकांवर उपासमारीची समस्या येईल. जीवनातील अनेक आवश्यकता वृक्षांमुळे पूर्ण होतात. जर वृक्ष नष्ट झाली तर त्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण असमर्थ ठरू. आज अनेक लोक शेती आणि घर बांधण्यासाठी वृक्ष आणि जंगल तोड करतात. परंतु जरी आज ते सुखी राहत असतील तरी येत्या काळात त्यांच्याद्वारे झालेला वृक्ष तोडी मुळे संपूर्ण मानव जातीवर मोठे संकट निर्माण होणार आहे.

जर वृक्ष नष्ट झाले तर संपूर्ण मानवाचे जीवन कोरडे होईल, सर्वीकडे फक्त जमीन आणि जमीनच दिसेल. आज आपण ज्या पद्धतीने हिरवळ पाहतो ती हिरवळ दिसणार नाही. उन्हाळ्यात वृक्षा खाली बसून जो थंडावा मिळतो तो मिळणार नाही. प्रवासी उन्हात प्रवास करतांना आश्रयासाठी कासावीस होतील. परंतु त्यांना ती वृक्षाची छाया मिळणार नाही.

जर वृक्ष नसतील तर आपल्याला या सर्व समस्यांना सामोरे जावे लागेल. जर आपण या समस्यांना सामोरे जाऊ इच्छित नसाल, तर आजपासूनच तुम्हाला आणि मला सर्वांना मिळून वृक्ष लागवड करायला हवी. जर आपल्याला मानव जातीचे जीवन सुखकर आणि निरोगी करायचे असेल, तर जास्तीत जास्त झाडे लावायला हवी आणि लोकांना याविषयी जागृत करायला हवे.

—समाप्त—

तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासाठी वृक्ष नष्ट झाले तर निबंध मराठी चा समावेश केला आहे. आशा आहे आपणास हा Vruksh Nasht Jhale Tar Marathi Nibandh आवडला असेल. आणि या निबंधाद्वारे आपणास वृक्षांचे महत्व लक्षात आले असेल. धन्यवाद.

हे पण वाचा> मेष राशीचे आजचे भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *